Jalna News: जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कंपनीत स्फोट झाल्याची घटना काही तासांपूर्वी समोर आली आहे. दुर्दैवाने या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.  स्टील कंपनीतील लोखंड वितळनाऱ्या भट्टीत हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोट एवढा भयंकर होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12  वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीत अचानक स्फोट झाला. स्फोटाची क्षमता एवढी होती की, ज्यात भट्टी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.  त्यामुळे आजूबाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर हा वितळलेलं लोखंड पडले. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र यातील दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून, आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. 


चौघांची प्रकृती चिंताजनक...


जालना येथील औद्योगिक वसाहतीतल्या स्टील कंपनीत झालेला स्फोट एवढा भयंकर होता की, दोघांचा मृत्यू झाला. तर आणखी चार जण गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी चौघांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहे.