Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपाच्या शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेंतर्गत पाच वसुली पथकांकडून 11 लाख 56 हजार 81 रुपये वसूल करण्यात आले आहेत. या पथकाकडून 19 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत शहर व ग्रामीण परिसरातील पाडळी, शिंगणापूर, बोंद्रेनगर, जरगनगर, आर के नगर, राजेंद्रनगर, शाहुनाका, सरनाईक वसाहत, उद्यमनगर, सम्राटनगर, मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका, कदमवाडी व विक्रमनगर भागातील नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करुन 11 लाख 56 हजार 81 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचबरोबर थकित 43 नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. यामध्ये गोरखनाथ भालकर, महावीर तिप्पाण्णावार, प्रदिपकुमार चौगले, सुनिल साळोखे, सतिश पोवार, एस डी कांबळे, कल्लाप्पा जाधव, रंजना कारजगे, कपिल प्रभावळे, शालीनीबाई पसारे, अक्काताई जोंधळे, बाळकृष्ण आयवाळे, बाळाबाई साळवी, अशोक भोसले, बाळू भोसले, संगीता लोंढे, रवींद्र लोंढे, सिध्दू केसरकर, कबुल लोंढे, सुरेश कांबळे, विठल तेजम, सुरेश नावळे, सुनिता मुंगळे, दिनकर चौगुले, सायमन यडपारा, संजय आंबले, सतिश यादव, रामा सरीकर, महादेव सुकते, बाबासाहेब पठाण, मालन नलवडे, वसंत कांबळे, अक्कताई पाटील, अशोक कांबळे, नाथा चंदणशिवे, शामराव कांबळे, चाटे कोचिंग क्लासेस, गोपीचंद चाटे, प्रमोद कामीरे, शकील मुजावर, देवकीबाई चव्हाण, महादेव पाटील, लक्ष्मण बापट यांचा समावेश आहे.
एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेजच्या व 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी अंतर्गत मिनी मॅरेथॉनचे, राष्ट्रीय एकते संदर्भात शपथ व मार्चपास असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेज, जी.के.जी कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल, जय हनुमान हायस्कूल इस्पूर्लीमधील एन.सी.सी.चे विद्यार्थी व एन.सी.सी.चे तीन ऑफिसर सहभाग झाले होते. या मिनी मॅरेथॉनची नोंद फिट इंडिया 3.0 मध्ये करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्र.प्राचार्य डॉ.अरुण पोडमल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन लेफ्टनंट डॉ. अमित रेडेकर, प्रा.डी.के.नरळे, ऑफिसर अजित कारंडे, संग्राम सोनार, राजाराम चौगुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी.एस सायना, कर्नल विजयंत थोरात, प्र.प्राचार्य डॉ.भोयेकर यांचे सहकार्य लाभले.
इतर महत्वाच्या बातम्या