Aurangabad Crime News: उद्याची भावी पिढी घडवणार व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकांकडे बघितले जाते. मात्र औरंगाबाद मधील एका गुरुजींनी भलतंच काही केल्याने त्यांची जिल्हाभर चर्चा पाहायला मिळत आहे. कारण शहरातील एका महाविद्यालयात झालेल्या दहा लाखांच्या चोरी प्रकरणात त्याच महाविद्यालयातील प्राचार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. धक्कादायक म्हणजे, यातील तीन लाख रुपये आरोपी प्राचार्याने ऑनलाइन रमीत घातले. सोबतच चोरीच्या पैशांवरच दिवाळी साजरी केली. नीलेश नामदेव आरके (32, रा. गल्ली क्र. 6, आंबेडकरनगर) असे अटकेतील प्राचार्याचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री साई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 21 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. ज्यात दहा लाख रुपये चोरीला गेले होते. त्यामुळे संस्थाचालक विक्रांत जाधव यांच्या फिर्यादीवरून 22 ऑक्टोबरला एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी समांतर तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन वॉचमन, कॉलेजमधील स्टाफ, संशयितांची चौकशी केली. तपास करत असतानाच चोरी ही कॉलेजमधील व्यक्तीनेच केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे अधिक माहिती घेतली असता चोरी झालेल्या रात्री नीलेश आरके हा रात्री 12 वाजेपर्यंत कॉलेजात थांबल होता. संस्थाचालकाच्या सांगण्यावरूनच तो ऍडमिशनच्या कामासाठी तांबला होता असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी त्याचे संगणक तपासल्यावर त्याने रात्री 8 वाजेपर्यंतच काम केल्याचे समोर आले. 


अन् पोलिसांसमोर बोबडी वळाली... 


पोलिसांना नीलेश आरके संशय होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण रात्री 8 वाजेपर्यंत काम केले असतांना 12 वाजेपर्यंत कशासाठी थांबला असे विचारातच त्याची बोबडी वळाली आणि पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. पण तो कबूल करायला तयार नव्हता. दरम्यान तो घरातील रोकड घेऊन बुलढाणा येथे पळून जाणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी आंबेडकर चौकात त्याला सापळा रचून पकडले. यावेळी त्याच्याकडे 5 लाख 18 हजार रुपयांची कॅश मिळून आली. 


ऑनलाइन रमीमध्ये लाखो रुपये उडवले...


पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन तपास केला असता, निलेश आरके आणि संस्थाचालक यांच्यातही मागील काही दिवसांपासून बिनसल्याचे समोर आले. आरकेने त्यांना पैसे मागितले होते. तेव्हा जाधव यांनी नकार दिला होता आणि याचाच त्याच्या मनात याचा राग होता. त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये 10 लाखांची चोरी केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासाला त्याने ऑनलाइन रमीमध्ये लाखो रुपये उडवल्याचे देखील समोर आले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Crime News: दारूच्या नशेत वृध्दाने केलं असे काही भयंकर..., क्षणातच सर्व काही संपलं