Farmer Suicide: एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैरोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पहिला संकल्प केला होता. मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपासून म्हणजेच गेल्या 23 दिवसांत राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक संख्या मराठवाड्यातील असून, गेल्या 23 दिवसांत मराठवाड्यातील 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे.
शेतकरी आत्महत्या आकडेवारी जिल्हानिहाय
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | शेतकरी आत्महत्या |
1 | औरंगाबाद | 15 |
2 | बीड | 13 |
3 | यवतमाळ | 12 |
4 | अहमदनगर | 07 |
5 | परभणी | 06 |
6 | जळगाव | 06 |
7 | जालना | 05 |
8 | बुलडाणा | 05 |
9 | उस्मानाबाद | 05 |
10 | अमरावती | 04 |
11 | वाशिम | 04 |
12 | अकोला | 03 |
13 | नांदेड | 02 |
14 | भंडारा-चंद्रपूर | 02 |
एकूण | 89 |
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय नाहीच...
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून तीनदा मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत. ज्यात अनेक निर्णय घेण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारे असे महत्वाचे कोणताही अद्याप निर्णय झाला नाही. शहराचे नामांतर, थेट जनतेतून सरपंच-नगराध्यक्ष निवड यासह अनेक निर्णय घेण्यात आले आहे. पण शेतकऱ्यांसाठी कोणतेही मोठी घोषणा करण्यात आली नाही, हे विशेष आहे.
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत
Aurangabad: आवक वाढताच मोसंबीचे दर कोसळले; आठवडाभरातच 23 हजारांहून 12 हजारांवर