Marathwada Teacher Constituency Election: राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या, मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान झाले आहे. आज झालेल्या मतदानानंतर 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. तर 2 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता मतदारांनी कुणाला कौल दिला आणि कोणाच्या अंगावर गुलाल उधळला जाणार हे चित्र 2 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.
अंतिम मतदान आकडेवारी...
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | एकूण मतदान | टक्केवारी |
1 | औरंगाबाद | 11008 | 79.46 टक्के |
2 | जालना | 4130 | 81.99 टक्के |
3 | परभणी | 4119 | 90.17 टक्के |
4 | हिंगोली | 2793 | 91.27 टक्के |
5 | नांदेड | 7752 | 86.45 टक्के |
6 | लातूर | 9687 | 85.76 टक्के |
7 | उस्मानाबाद | 4816 | 92.38 टक्के |
8 | बीड | 8763 | 90.27 टक्के |
एकूण | 53068 | 86.01 टक्के |
असा रंगला सामना...
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरा सामना राष्ट्रवादीचे उमदेवार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या झाला. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, अंतिम निकाल तेव्हाचं समोर येणार आहे.
मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा प्रयत्न...
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, विक्रम काळे गेल्या 18 वर्षापासून नेतृत्व करत आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरण पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात बैठका घेतला होत्या. तर मराठवाड्यातील अनेक भाजप नेत्यांनी देखील किरण पाटील यांच्या प्रचारासाठी मेहनत घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: