पंढरपूर : उद्या माघी एकादशीचा (Maghi Ekadashi) सोहळा होत असताना आज पंढरपूरमध्ये (Pandharpur) तब्बल चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. मग यात्रेच्या तुलनेने जवळपास दुपटीने भाविक दाखल झाल्याने ही यात्रा विक्रमी होणार आहे. उद्या एकादशी दिवशी पहाटे विठ्ठलाचे नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या सोहळ्या सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले असून विठुरायाच्या (Vittahal Rukmini) पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत (Gopalpur) गेल्याने दर्शनाला अठरा ते वीस तास एवढा अवधी लागत आहे . 


 माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, चहा आणि उपवासाची खिचडीचे वाटप मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. तासंतास  दर्शनासाठी  रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे.
 
माघी यात्रेमध्ये (Maghi Yatra)  औसेकर महाराज यांच्या फडाला मोठे महत्त्व असते.  औसा (Ausa)  येथून प्रतिपदेला निघालेल्या या दिंडी सोहळ्यात जवळपास 18 ते  20 हजार वारकरी सामील झालेले आहेत. माघी यात्रा ही वाळवंटातील यात्रा म्हणून ओळखली जात असल्याने सर्व पारंपरिक फडांची कीर्तन प्रवचन सेवा हे चंद्रभागा (Chandrabhaga River) वाळवंटात होत असते. यात गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाला हजारोंचा समाज येत असतो. औसेकर फडाचे चक्रीभजन हा माघी यात्रेतील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.  या यात्रेसाठी मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidharbha) , मुंबई (Mumbai), कोकणसह (Kokan) कर्नाटक (Karnatak) आणि आंध्रप्रदेश (Andhra Pradesh)  या भागातून भाविक दाखल झाले आहेत.


माघी यात्रेला राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या सध्या पंढरीची वाट चालू लागले आहेत . दिवसेंदिवस पायी दिंड्यात गाड्या घुसून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने सोलापूर पोलीस प्रशासनाने पायी चालत येणाऱ्या दिंड्यांसाठी आवाहन केले असून सुरक्षेचे नियम पाळत फक्त दिवस रस्त्याच्या कडेने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.  सुरक्षित पायी वारी होण्यासाठी दिवस पायी चालत असताना दिंडीच्या पुढे आणि मागे स्वयंसेवक ठेवावेत. याशिवाय विसाव्याला अथवा भोजनासाठी थांबताना रस्त्याच्या कडेला विश्रांती घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या :


Pandharpur News : विठुरायाला अज्ञात भाविकाकडून आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण, कोणकोणत्या वस्तूंचा समावेश?