Aurangabad Crime News: तृतीयपंथीयाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका 29 वर्षीय तरूणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज परिसरातील सावतानगरमध्ये समोर आली आहे. पैशांची मागणी करीत लग्न कर नाही, तर तुझ्या घरी माझ्या बिरादरीच्या लोकांना आणून गोंधळ घालून तुझी बदनाम करणार असं ब्लॅकमेल तृतीयपंथीयाकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे झालेल्या त्रासाला कंटाळून या तरूणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री कमळापूर रस्त्यावरील रांजणगाव परिसरातील सावतानगर येथे घडली. सागर बाबुराव कोंगळे (वय 29 वर्षे, रा.न्यू हनुमानगर, गारखेडा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कोंगळे हा वाळूज औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्यात कामाला होता. दरम्यान दोन महिन्यापूर्वी तो ओएसिस चौकात ज्यूस पित असताना त्याची ओळख एका तृतीयपंथीसोबत झाली होती. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सागर हा तृतीयपंथियासोबत रांजणगाव परिसरातील सावतानगर येथे राहत होता. सुरूवातील काही दिवस तो तृतीयपंथी सागर सोबत चांगला वागला. मात्र काही दिवसांपासून तृतीयपंथी हा सागरकडे पैशांची मागणी करू लागला होता. त्यामुळे सागरने त्याला आतापर्यत तीस हजार रूपये दिले होते. तरी देखील तृतीयपंथी आणखी पैशांची मागणी करून, त्याला ब्लॅकमेल करत असल्याने सागर कंटाळला होता.


एकीकडे पैशांची मागणी करत असतानाच, गेल्या आठ दिवसांपासून या तृतीयपंथीयाने सागरवर लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र सागरने लग्नासाठी नकार दिला असता, त्याला लग्न नाही केले तर माझ्या साथीदारांना घेऊन तुझ्या घरी येऊन गोंधळ घालून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. त्यामुळे सागर हा तणावात होता.


सुसाईड नोट लिहून घेतला गळफास...


तृतीयपंथियाने लग्नासाठी धमकी दिल्याने, त्यातून सागरने सुसाईड नोट लिहून रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास तृतीपंथीच्या घरी सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर तृतियपंथीने आणि आणखी एकाने सागरला बेशुद्ध अवस्थेत घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


पोलिसात गुन्हा दाखल करणार... 


माझ्या मुलाने एका तृतीपंथीयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याने तसं सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूला तृतीयपंथीय कारणीभूत आहे. मुलाच्या अंतविधीनंतर आपण त्याच्याविरूद्ध तक्रार देणार असल्याचे सागरचे वडील बाबुराव कोंगळे यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; औरंगाबादच्या वडजी गावातील घटना