मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा दिला आहे. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर पोलिस थोड्याच वेळात आर्थर रोड कारागृहाकडे रवाना होणार आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. अकोला पोलिसांकडून देखील ताब्यासाठी अर्ज, मात्र जोपर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडीत जात नाही तोपर्यंत ताबा मिळणार नाही. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसंच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच दरम्यान साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा झाल्याने त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सातारा न्यायालयाने सोमवारी (18 एप्रिल) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणण्यात आलं आहे. आज त्यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याचवेळी सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र गिरगाव कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :