मुंबई : नवी मुंबईत डान्स बारमध्ये सुरु असलेला वेश्याव्यवसाय एबीपी माझानं उघड केला आणि काही तासांमध्येच सरकारी हालचाली वाढल्या. थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले आहेत. आता याची दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतली आहे. सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार डान्स बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिले आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, एबीपीच्या माध्यमातून काल डान्स बारची घटना समोर आली. त्यापैकी 6 बारवर गुन्हे दाखल केले आहेत आणि चार बारचे परवाना रद्द केले आहेत. तसेच 10 बारला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली आहे. चौकशीत जे दोषी आढळणार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पेपरफुटी प्रकरण
पेपरफुटी प्रकरणावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, पेपर फुटला हे खरं आहे. पेपर फुटीला कोण जबाबदार आहे याचा विचार न करता आम्ही पूर्णपणे लक्ष घातलं. आम्हाला राहुल कवठेकर यांनी माहिती दिली यातून माहिती समोर आली की परीक्षेपूर्वी 92 प्रश्न टेलिग्रामवर व्हायरल झाले. त्याकाळात न्यासा कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आम्हाला पेपर फुटी बाबत तक्रार द्यायची आहे असं सांगितलं. परंतु पोलिसांनी त्याला नकार दिला कारण प्राथमिकदृष्ट्या ते देखील गुन्हेगार होते. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर बाब लक्षात आलं की म्हाडाचा पेपर देखील फुटण्याची शक्यता आहे त्यावेळी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाही. शेवटचा आरोपी मिळेपर्यंत कारवाई सुरू राहणार आहे.
महिला सुरक्षा
महिला सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहे. आतापर्यंत एकूण हरवलेल्या 104 मुलींपैकी 84 मुली सापडल्या आहेत.
अमरावती दंगल
अमरावती, मालेगाव दंगलबाबत उल्लेख झाला होता. बंदमध्ये सहभागी संघटनांमध्ये रझा अकादमी नाही. त्यामध्ये इतर संघटना आहेत. नांदेड, भिवंडी मध्ये अशीच परिस्थिती आहे. राज्यात विकासाच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर सामाजिक सलोखा राखणे गरजेचं आहे. अमरावती आंदोलनात 474 लोकांना अटक करण्यात आला आहे. मालेगाव 90, नांदेड 80, यवतमाळ 7, भिवंडी 10, आत्तापर्यंत 688 लोकांना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस भरती
50 हजार पदे काढणार असं आश्वासन देऊन देखील भरती केली नाही असा आरोप करण्यात आला होता. पाच हजार पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे तर 7 हजार पदे भरण्यासाठी देखील कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आहे.
संबंधित बातम्या :