नवी मुंबई :  नवी मुंबईत डान्स बारमध्ये  सुरु असलेला वेश्याव्यवसाय  एबीपी माझानं उघड केला आणि काही तासांमध्येच सरकारी हालचाली वाढल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सतेज पाटील दोघांनीही तातडीनं कारवाईचं आश्वासन दिलं. इतकंच नाही, तर थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले आहेत


 नवी मुंबईतल्या डान्सबारच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. एबीपी माझानं काल यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केलेय.  अधिवेशन सुरू असल्याचीही भीतीही अधिकाऱ्यांना नाही का? असा प्रश्न विचारत त्यांनी चिंता व्यक्त केलेय. माझाच्या बातमीनंतर नवी मुंबई पोलिसांची बैठक बोलावण्यात आली आहेय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात यासंदर्भात माहिती दिली आहे.


एबीपी माझाचं स्टिंग पाहून विरोधकांनीही आज सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र केल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीही ठाण्यातल्या डान्सबारचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं, प्रशासनानं कारवाई केली.  ते सगळे डान्सबार, अजूनही बंद आहेत. सरकार सत्तांध झाले, म्हणून अशी वेळ आली आहे.  डान्सबारबाबत कारवाई करणार की नाही याचं उत्तर द्या,  असे म्हणत  विनायक मेटे विधानसभेत  आक्रमक झाले. 


भारती बार (नवी मुंबई),  राजमहाल बार (नवी मुंबई),  एमएस 43 बार (नवी मुंबई),  सी क्वीन बार (बेलापूर),   मॅग्नेट बार (नवी मुंबई),  मेट्रो बार व्हाईट हाऊस बार येथे चालणारा वेश्याव्यवसाय एबीपी माझानं जगासमोर आणला त्यावरुन विरोधकही आक्रमक झाले. आणि आता सरकारनं कारवाईचं आश्वासन दिलं. त्यामुळे आता तरी हा सगळा काळा बाजार बंद होईल ही अपेक्षा आहे. 


 



संबंधित बातम्या :