Unseasonal Rain in Marathwada : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागांत अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. सोबतच जोरदार गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर जीवित हानी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या एप्रिल महिन्यात 29 जण जखमी  झाले आहेत. तर 452 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 1593 कोंबड्या दगावल्या आहेत. सोबतच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. 

पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?

नुकसानग्रस्त जिल्ह्याचे नाव जखमी व्यक्तींची संख्या  मयत व्यक्तींची संख्या  मृत लहान जनावरे  मृत मोठे जनावरे  मृत कोंबड्या  पूर्णत पक्क्या- कच्च्या घरांची पडझड  अशंत पक्क्या-कच्च्या घरांची पडझड  पडझड-नष्ट झालेल्या कच्च्या घरांची संख्या  बाधित गोठ्याची-झोपड्यांची संख्या 
छत्रपती संभाजीनगर  5 2 2 27 00 17 45 87 00
जालना  0 0 4 43 388 6 0 0 1
परभणी  8 3 44 13 0 0 0 8 0
हिंगोली  1 1 2 19 30 0 0 0 2
नांदेड  6 4 68 19 0 0 77 170 0
बीड  6 6 34 63 200 0 1 417 5
लातूर  0 5 22 49 20 0 0 0 0
धाराशिव  3 4 8 35 955 0 0 95 10
एकूण  29 25 184 268 1593 23 123 777 18

नुकसानभरपाई देण्याची मागणी...

आधीच अतिवृष्टीमुळे खरीपाचे हंगाम हातून गेले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात काहीतरी हातात येईल अशी अपेक्षा असताना मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहेत. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर 

दरम्यान, अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचे पाहायला मिळाले आहे. सत्तार यांनी शनिवारी सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तर झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. सोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा देखील प्रयत्न केला. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Video: कोणी चटई पकडत होतं, तर कोणी मंडपाचे पाईप धरून होतं; लग्नाच्या मुहूर्तावर पावसाची एन्ट्री