Maharashtra NCP Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजच्या बैठकीत बोलताना अनेक मोठे गौप्यस्फोट केले. तसेच, याच बैठकीत बोलताना अजित पवारांनी थोरल्या पवारांवर हल्लाबोलही केला आहे. तसेच, 2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर आम्हाला का तिथे पाठवलं? असा सवालही अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी एका आमदाराला धमकावल्याचाही गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला आहे. 


अजित पवारांच्या शपथविधीनंतर आज एमएनटी येथील बैठकीत बोलताना थोरल्या पवारांवर थेट टिकास्त्र डागलं. 2014 साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणविसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं, तर का तिथे आम्हाला पाठवलं? असा सवाल अजित पवारांनी थेट शरद पवारांना विचारला आहे. तसेच, 


2017 मध्येही युतीसाठी भाजपसोबत बैठक : अजित पवार 


"2017 वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणालं आम्ही 25 वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, बाहेर काहीच बोलायचं नाही.", असं म्हणत अजित पवारांनी गौप्यस्फोट केला. 


उपमुख्यमंत्री असतानाही दिलेलं 53 विधानसभेच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र : अजित पवार 


महाविकास आघाडीच्या काळातही भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं, असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेलांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, "मी उपमुख्यमंत्री असताना, माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती सर्व आमदारांनी केली होती."


वय 82 झालं, कधी थांबणार आहात की नाही? शरद पवारांना सवाल 


शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं... तरूणांना संधी कधी देणार? तुम्ही आशीर्वाद द्या ना, मार्गदर्शन करा, चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा... मार्गदर्शन करा, असं अजित पवार म्हणाले. तसेच, शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.