Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवरच बहिणीच्या नवऱ्याने अत्याचार केला आहे. कन्नड तालुक्यातील एका गावातील ही घटना असून, वीस वर्षीय विवाहित असलेल्या भाऊजीने आपल्या सख्या अल्पवयीन मेहुणीला 'चल आपण पळून जाऊन लग्न करू' असे आमिष दाखवून बाहेरगावी नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यातील आरोपी हा सासुरवाडीला येत असे. याच दरम्यान तो पीडितेसोबत जवळीक साधत असे. ऊसतोडणी करून आल्यानंतर आरोपी हा पत्नीसोबत नांदगीरवाडी येथे आलं काढणीचे, लागवडीचे काम करू लागला. दरम्यान, यावेळी पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न त्यानं सुरु केले. यानंतर 22 मे रोजी कन्नडचा आठवडी बाजाराच्या निमित्ताने आरोपी पीडितेस शहरात घेऊन आला. त्यानंतर 'चल आपण पळून जाऊन लग्न करू' अशी पीडितेस फुस लावून आपल्या मोटार सायकलवरुन दौंडजवळील लिंबगाव याठिकाणी घेऊन गेला. एक दिवस मित्राकडे मुक्काम करून पीडितेस दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील एका गावात घेऊन गेला. तेथील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालनवर काम करायला सुरुवात केली. रात्री आराम करत असताना आरोपीने अल्पवयीन मेहुणीवर वारंवार बलात्कार केला.


पीडितेस घरच्यांची आठवण येऊ लागल्याने परतले...


एकीकडे जावई, आणि मुलगी बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी ग्रामीण स्टेशनमध्ये तक्रार दिली. पीडितेस घरच्यांची आठवण येऊ लागल्याने आरोपी पीडितेस 2 जुलै रोजी बनशेंद्रा येथे गावी घेऊन आला. नातेवाईकांना माहिती मिळताच आरोपी आणि पीडितेस ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कन्नड ग्रामीण ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक राम बारहाते, सहाय्यक फौजदार के. एफ. पटेल, आर. एन. छत्रे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, महिला पोलिस रेखा चव्हाण (गायकवाड) आदी पथक करत आहेत.


लग्नाचे आमिष दाखवून फसवले...


पीडितेच्या बहिणीचे आरोपीसोबत लग्न झाले आहेत. त्यामुळे आरोपी नेहमी सासुरवाडीला येत होता. त्यामुळे पीडिता आणि आरोपींमध्ये बोलणे होत होते. मात्र याच काळात आरोपीची नियत फिरली आणि त्याने आपल्या मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एवढंच नाही तर तिला आपलं पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष देखील दाखवले. त्यानंतर मेहुणीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला.


इतर महत्वाच्या बातम्या : 


विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना