MNS President Raj Thackeray LIVE : उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा हल्लाबोल

MNS President Raj Thackeray melava LIVE Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर धडाडणार आहे. गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Nov 2022 07:24 PM
उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आजा राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय.   
  

मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार : राज ठाकरे

Raj Thackeray : मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरूय; राज ठाकरेंचा टोला  

अजूनही वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरू आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. 
 

घरात बसलेला माणून एक नंबरचा मुख्यमंत्री कसा? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"उद्धव ठाकरे यांच्या एका गोष्ठीसाठी मी नतमस्तक होतो. कारण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की ते घरातून बाहेर न पडता देशातील मुख्यमंत्री झाले. चार संस्थांनी सर्व्हे केला. त्या संस्थेचं नाव कधी तुम्ही ऐकलं का? त्यामुळं घरात बसलेला माणून एक नंबरचा मुख्यमंत्री कसा? असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.  

तुमच्या खोके, गद्दार याने आम्हाला काय करायच?  संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला 

मुंबई महापालिकेत जे 25 वर्ष सत्तेत असतील ते केलेल्या कामाचं सांगतील. मात्र ते कामाचं न सांगता गद्दार, खोके आणि  पाठात खंजीर खुपसला हे वारंवार सांगत आहेत. परंतु, आम्हाला त्याचं काय करायचं आहे, अशा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

गोरेगावमधील नेस्को मैदानावरील गट अध्यक्षांच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थवरून रवाना

गोरेगावमधील नेस्को मैदानावरील गट अध्यक्षांच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थवरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते येथून गट अध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत. 

सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे मत मांडतील : राजू पाटील

सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे मत मांडतील अशी माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.  



राज ठाकरे यांच्या मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्राऊंडपर्यंत सोडण्यासाठी रिक्षाची सोय

राज ठाकरे यांच्या या मेळाव्याला येण्यासाठी मुंबईच्या विविध भागातून बसची सुविधा करण्यात आली होती.  तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते जे लोकल ट्रेन ने येणार आहेत त्यांच्यासाठी ऑटो रिक्षाची सुविधा करण्यात आली आहे.  हे 15 ते 20 ऑटो रिक्षा कार्यकर्त्यांना राम मंदिर ते नेस्को ग्राउंड पर्यंत सोडणार आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते लोकल ट्रेनने देखील येत आहेत. वरळी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ऑटो रिक्षामधून नेस्को ग्राउंड पर्यंत सोडण्यात आले आहे.  

राज ठाकरेंच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यासाठी अंधेरीतून कार्यकर्ते रवाना 

Raj Thackeray Nesco Sabha :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोरेगावच्या नेस्को ग्राउंडमध्ये मनसेच्या गटाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्तांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला आता गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्सुकता पाहायला मिळत आहे. अंधेरी विधानसभा भागातून सर्व कार्यकर्ते आता रवाना होत आहे. अंधेरी, आंबोली, जुहू, इर्ला, विलेपार्ले व इतर भागातून मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यास कार्यकर्ते  निघाले आहेत. 

पार्श्वभूमी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर धडाडणार आहे. गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.  या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. सध्या अनेक विषयांवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या मेळाव्यासाठी कार्यकर्ते मेदानावर जमायला सुरूवात झाली आहे. या 


मराठी आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या बाबींवर राज ठाकरे बोलणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या या मेळाव्याला येण्यासाठी मुंबईच्या विविध भागातून बसची सुविधा करण्यात आली होती.  तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते जे लोकल ट्रेन ने येणार आहेत त्यांच्यासाठी ऑटो रिक्षाची सुविधा करण्यात आली आहे.  हे 15 ते 20 ऑटो रिक्षा कार्यकर्त्यांना राम मंदिर ते नेस्को ग्राउंड पर्यंत सोडणार आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते लोकल ट्रेनने देखील येत आहेत. वरळी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ऑटो रिक्षामधून नेस्को ग्राउंड पर्यंत सोडण्यात आले आहे.  


   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.