Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 11 डिसेंबरला नागपूर दौरा (Nagpur) करणार आहे. यावेळी ते मेट्रोने (Metro) प्रवास करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे. पंतप्रधानांच्या (PM Modi Visit To Nagpur) मेट्रो प्रवासाच्या शक्यतेनंतर आता प्रशासन जोरात कामाला लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बर्डी परिसरातील झिरो माईल स्टेशन ते खापरी स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता आहे. नागपुरात आल्यावर पंतप्रधान सर्वात आधी अजनी रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमास जाणार आहे. तिथून ते मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान ते खापरी येथून समृद्धी महामार्गावर जाणार आहे आणि तिथून टेस्ट ड्राइव्ह करत ते परत एम्स परिसरात होणाऱ्या मुख्य कार्यक्रम सोहळ्यास येतील.


नागपूरात पंतप्रधान मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता
सुत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्ग तसेच मेट्रोच्या कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू मार्गाचेही लोकार्पण करण्याची शक्यता आहे.  पंतप्रधानांच्या दौऱ्यात आणखी काही कार्यक्रम जोडण्यात आले आहे. त्यामध्ये नागपुरातील एम्स रुग्णालयाला राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील मुख्य सोहळा समृद्धी महामार्ग ऐवजी एम्स रुग्णालय होणार आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यात नागपूर तसेच अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा कार्यक्रमही जोडण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात नागपूरकरांना एक 'वंदे भारत एक्सप्रेस' मिळण्याची ही शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 11 डिसेंबरला पंतप्रधान समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी तिथे जातील, त्या ठिकाणी ते टेस्ट ड्राईव्ह ही घेण्याची शक्यता आहे. तिथून परत आल्यानंतर एम्स रुग्णालयाच्या परिसरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यातूनच ते नागपूरसाठीच्या सर्व योजनांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहे.


प्रशासनात जोरदार हालचाली सुरू
पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावरून महामेट्रो प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्धा मार्गावरील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या डबर डेकर पुलाचे डांबरीकरण, येथील दुभाजकांवर लावलेल्या झाडांची कापणी आदी कामे करण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील ट्रॅक, स्टेशनची स्वच्छता आदी करण्यात येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी पंतप्रधानांच्या मेट्रोतून प्रवासाबाबत अद्याप ठरलेले नाही, कार्यक्रमाची जुळवाजुळव सुरू आहे, येत्या एक दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या


8th December Headlines: गुजरात-हिमाचलवर सत्ता कोणाची याचा फैसला आज, सीमाप्रश्नी मविआचे खासदार अमित शाहांची भेट घेणार