Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढली आहे त्यामुळे परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे परंतु या उलट भिवंडी शहरालगत असलेली कामवारी नदी मध्ये जीव धोक्यात टाकून पोहण्याचा आनंद घेत असतात मात्र याकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे अशातच पोहण्याचा आनंद घेत असताना शहरातील अवचित पाडा येथील राहणारा 19 वर्षाचा तरुण अंसारी आसिफ हा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले असून नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती परंतु अजूनही या मुलाचे मृतदेह सापडलेले नाही त्यामुळे अंधार झाल्याने सध्या शोध कार्य थांबवण्यात आले असून उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 08 जुलै 2022 ते 12 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीच्या आणि उप नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चार पूल पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिकोडी तालुक्यात देखील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. चार पुलांवर पाणी आल्यामुळे त्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथे बॅरिकेड्स लावून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उप नद्या असणाऱ्या वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. येडुर - कल्लोळ, मांजरी - सौंदत्ती, मलिकवाड - दत्तवाड आणि एकसंबा - दानवाड मार्गावरील पूल हे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आपले पंप सेट हलवण्यास प्रारंभ केला आहे. कृष्णा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने एनडीआरएफची पथके खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आली आहेत.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र आज सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पावसाला सुरुवात झाली असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी धूर पेरणी केली होती. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले होते .मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून आज झालेल्या पावसामुळे काही अंशी पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावर पुराचे पाणी साचल्याने वाहनचालकांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या महामार्गावर सालोरी येथे पूल निर्मितीसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उंच महामार्गामुळे लगतच्या शेतातील पाणी सालोरी नाल्याजवळ वेगाने प्रवाहित झाले आणि पर्यायी रस्ता वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने या महामार्गावर जवळपास एक तास वाहतूक ठप्प होती. पाणी उतरल्याने आता वाहतूक पूर्ववत झाली मात्र गेली अनेक वर्षे चिमूर-वरोरा हा महामार्ग रखडल्याने या मार्गावर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महामार्गा लगतच्या शेतांना देखील पावसाचे पाणी जमा झाल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे धीम्या गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून हा महामार्ग तातडीने पूर्ण करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.
तीन दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा, नऊ तारखेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे.
त्यामुळे चिपळूणमध्ये प्रशासन आणि एनडीआरफचे पथक सज्ज झाले आहे..
या पथकाने गतवर्षीच्या महापुराचा आढावा घेत शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठीचे पाणी ज्या सखल भागात पाणी शिरते त्या भागाची पहाणी केली..
Nashik Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जवळपास सर्वदूर पावसाने हजेरी लावली असतानाच नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली होती. मात्र नाशिककरांची पावसाची ही प्रतिक्षा अखेर संपली असून आज पहाटेपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. या पावसाचा नाशिककर मनसोक्त आनंद लुटताना दिसून येत आहेत. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटून देखील नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती आणि यामुळे पेरण्या तर खोळंबल्या होत्याच सोबतच नाशिककरांवर पाणीकपातीचे संकटही ओढावले होते. जिल्ह्याचा पाणीसाठा 24 टक्क्यांवर आला होता, सोबतच शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा 22 टक्क्यापर्यंत आल्याने 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागणार होतं. मात्र आता हे संकट देखील दूर होईल अशी आशा आहे.
किरीट सोमय्यांनी मविआ सरकारवर बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला, किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये की आता शिवसेना संपली , ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा - शिवसेना युती म्हणून काम करतोय , आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ,उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये , अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही , असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजपा व शिंदे गटात ही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.
Belgaon Rain : गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीच्या आणि उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चार पूल पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्रातील कोकणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिकोडी तालुक्यात देखील दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. चार पुलावर पाणी आल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून तेथे बॅरिकेड्स लावून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्या असणाऱ्या वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. येडुर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड आणि एकसंबा-दानवाड मार्गावरील पूल हे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आपले पंप सेट हलवण्यास प्रारंभ केला आहे. कृष्णा आणि अन्य नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने एनडीआरएफची पथके खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आली आहेत.
Nandurbar Rain LIVE : नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पावसाला सुरुवात, अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, अनेक भागातील शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले, रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार..
खड्डयात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांबरोबरच गावकऱ्यांना यांचा मोठा त्रास होतो. अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांकडून वाहन चालकांकडून करण्यात आली, मात्र एमआयडीसी प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. सध्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने या रस्त्यातुन प्रवास करणे अवघड झाले आहे. रोज या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते, शिवाय या रस्त्यावर अनेक शाळा असल्याने शाळेच्या बस देखील याच खड्ड्यातुन रोज विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास करतात. इतका त्रास असताना एमआयडीसी प्रशासन आता तरी हे खड्डे भरेल का असा सवाल विचारला जातोय. तर बदलापूरमध्ये भाजपच्या आमदार ते जिथे राहतात तोच रस्ता दुरुस्त होत नसेल तर काय करावं असा प्रश्न वाहन चालकांनी केलाय,
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सततच्या पावसाने वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालगतच्या नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे वर्धा नदीत जाणारा नाला अरूंद झाल्याने कोसरसार गावात पावसाचे पाणी शिरले आहे. कोसरसार गावातील ग्रामपंचायत-आठवडी बाजार आणि स्मशानभूमी पाण्याखाली आले असून लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. वारंवार निवेदने देऊनही नाल्याचे खोलीकरण झाले नसल्याने गावालगतच्या सखल भागात पुराचे पाणी शिरल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तहसील प्रशासनाने घटनेची दखल घेत परिस्थिती सामान्य करण्यासाठी गावात पथक रवाना केले आहे.
चंद्रपूर : वरोरा-चिमूर मार्गावर पुराचे पाणी, महामार्ग निर्मिती दरम्यान सालोरी येथे पूल निर्मितीसाठी तयार करण्यात आला होता पर्यायी रस्ता, उंच महामार्गामुळे लगतच्या शेतातील पाणी सालोरी नाल्याजवळ वेगाने प्रवाहित झाल्याने पर्यायी रस्ता गेला वाहून, रस्ता वाहून गेल्याने जवळपास एक तास वाहतूक होती ठप्प, पाणी उतरल्याने आता वाहतूक झाली पूर्ववत, मात्र गेली अनेक वर्षे चिमूर -वरोरा हा महामार्ग रखडल्याने या मार्गावर वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास, महामार्गा लगतच्या शेतांना देखील पावसाचे पाणी जमा झाल्याने नुकसान
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, शहाड स्टेशन जवळील घटना, मालगाडीचे कपलिंग तुटले, एक डब्बा बाजूला, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
चंद्रपूर : सततच्या पावसाने वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालगतच्या नाल्याला आला पूर... वर्धा नदीत जाणारा नाला अवरुद्ध झाल्याने कोसरसार गावात शिरले पाणी, कोसरसार गावातील ग्रामपंचायत-आठवडी बाजार आणि स्मशानभूमी पाण्याखाली, वारंवार निवेदने देऊनही नाल्याचे खोलीकरण झाले नसल्याने गावातल्या सखल भागात पुराचे पाणी शिरल्याचा गावकऱ्यांचा आरोप, तहसील प्रशासनाने घटनेची दखल घेत पथक केले रवाना
Mumbai Rain News : मुंबईकरांसाठी गूड न्यूज, जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा 25 टक्क्यांवर, गेल्या चार दिवसांतील दमदार पावसामुळं 47 दिवसांचा पाणीसाठा वाढला, सात तलावांमध्ये 3 लाख 75 हजार 514 एमएलडी इतका पाणीसाठा. रोज मुंबईला 3850 एमएलडी पाणीपुरवठा होतो. मुंबईतील 10 टक्के पाणीकपात लवकर बंद होणार अशी शक्यता, तलाव क्षेत्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने गेल्या केवळ चार दिवसांत १ लाख ८२ हजार एमएलडी पाणी वाढले, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलावांमध्ये अधिक पाणीसाठा
Palghar Rain Live : पालघर जिल्हा पावसाची तालुकानिहाय अहवाल
1)वसई:- 60 मिमी
2)जव्हार:- 98 मिमी
3) विक्रमगड:- 69.5 मिमी
4) मोखाडा:- 73.8 मिमी
5) वाडा :- 157.25 मिमी
6)डहाणू :- 45.9 मिमी
7) पालघर:- 62.77 मिमी
8) तलासरी :- 88.50 मिमी
एकूण पाऊस :- 655.72 मिमी
एकूण सरासरी 81.96 मिमी
Bhandara Rain : सलग तीन दिवसांपासून गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले असून अद्यापही गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली नसल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या 33 पैकी 9 दरवाजे उघडले असून या 9 दरवाजातून 1124.55 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Bhandara Rain : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली नसल्याने धरण प्रशासनाने सलग तीन दिवसांपासून धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या 33 पैकी 9 दरवाजे उघडले असून यामधून 1124.55 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत असून नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Washim Rain Update : वाशिम जिल्ह्यात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात , गेल्या 30 मिनिटांपासून पाऊस सुरू, ढगाळ वातावरण, दिवसभर रिपरिप सुरू राहण्याचा अंदाज
परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू व्हायला यंदा जुलै महिना उजडलाय.मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस बरसतोय.आज पहाटेपासून जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरू आहे.मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पेरणी केलेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे.जिल्हाभरातील रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे.पालम तालुक्यातील लेंडी नदीचा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल पाण्याखाली गेलाय ज्याने स्थानिक 13 गावांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून ग्रामस्थांना वाहतूक करावी लागत आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात रात्रभर सर्वत्र पावसाची रिपरिप, धानाचे कोठार समजले जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना होती अशाच दमदार पावसाची प्रतीक्षा, काल रात्री सुरू झालेली पावसाची संततधार सकाळ पर्यंत आहे सुरू, जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने नदी नाल्यांच्या पातळीत झाली मोठी वाढ, पावसामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामात अडथळा, चंद्रपूर शहरातील झरपट नदीचा सांडवा भरून वाहू लागला, सोयाबीन- कापूस व धान पिकासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला, संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी पडलेल्या या पावसाने शेती हंगाम सुरळीत होण्याच्या आशा झाल्या पल्लवीत.
पुण्यातील पर्यटकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. पर्यटकांसाठी भुशी धरणाच्या धर्तीवर फडके बंधारा उभारण्यात आलाय. हाच बंधारा आता पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागलाय आणि तो पर्यटकांना खुणावतोय. यासाठी पर्यटकांना पुण्यापासून 120 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात आलं की घाटघर गावात येऊन पर्यटकांना या बंधाऱ्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळं लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची तोबा गर्दी झाली की पर्यटकांचा आता हिरमोड होणार नाहीये. त्यांच्यासाठी फडके बांधाऱ्याच्या रूपाने हुबेहूब तसाच पर्याय उपलब्ध झालाय. ब्रिटिश कालीन हा बंधारा मोडकळीस आला होता. त्याचं नव्यानं बांधणी करण्याचं ठरलं अन या बंधाऱ्याचं असं रूप पालटलं. जलसंधारण विभागाने हा बंधारा उभारला तर खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनकेच्या प्रयत्नांनी ते सत्यात अवतरलं. यासाठी 78 लाखांचा निधी खर्च झालाय. आदिवासी शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा वर्षभर फायदा होणार आहे.
जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू, जायकवाडी धरणात 2 हजार 168 क्यूसेकने आवक सुरू , जायकवाडी धरणाची पाणीपातळी 33.87 टक्क्यांवर , जायकवाडी धरणात जिवंत पाणीसाठा 735 दलघमी असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे

मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जात असताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा-नाशिक रोड पोगाव परिसरातील रस्त्यांचे कॉक्रिटीकरणचे काम ही सुरू असून ते अर्धवट आहे. मात्र रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे पहाटेच्या सुमारास खड्डे चुकवत असताना भरधाव ट्रकला खड्ड्याचा अंदाज न मिळाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक पलटी झालाय. या ट्रकच्या मागे येणारे दोन ट्रक ही पलटी होत होता वाचले. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे . शिवाय शहरातील मुंबई महानगरपालिकेने बनवलेले पाईपलाईन रस्त्यावर देखील प्रचंड खड्डे पडले आहेत आणि त्यामुळे तिथे देखील एक चार चाकी खड्ड्यात जाऊन अडकली होती मात्र त्या ठिकाणी कोणी जखमी झालेले नाही. परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर जाताना खड्ड्यांचा सामना करत असताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस, कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना नवसंजीवनी, पावसामुळे डवरणी, खुरपणी, निंदणीची शेतीची कामे खोळंबली
लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळं या मोसमातील उच्चांकी म्हणजेच तब्बल 180 मिलिमिटर पावसाची नोंद झालीये. आत्तापर्यंत लोणावळ्यात 907 मिलिमिटर पाऊस बरसला आहे, पैकी गेल्या तीन दिवसांतच 492 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 1132 मिलिमिटर इतका पाऊस झाला होता. दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात परिसरात पावसाने जोर कायम ठेवलाय. गेल्या चोवीस तासात इथं 76 मिलिमिटर पाऊस कोसळला असून धरण साठ्यातील पाणी 22.18 टक्क्यावर येऊन पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा टक्के पाणी साठा कमी असली तरी तूर्तास शहरावरील पाणी कपात टळणार आहे. त्यामुळं शहरवसीयांना हा दिलासा मानला जातोय. तर मावळ तालुक्यातील शेतकरी ही चांगलाच सुखवलाय. त्यांची रखडलेली भात लागवड आता जोमाने सुरु झालीये, सर्व शेतकऱ्यांचे पाय आता शेताकडे वळले आहेत.
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पार्श्वभूमी

'या' भागात आज रेड अलर्ट!
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतूकीसाठी बंद
मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -