Maharashtra Monsoon Rain LIVE : अखेर मुंबईत मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2022 08:26 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Updates LIVE : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. राज्यात मान्सूनपूर्व...More

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. आडगाव जावळे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, यावेळी सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची बहीण सरुबाई शहादेव लांडे ( वय 40 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत केकत जळगाव येथे गजानन दराडे (वय 27 वर्षे ) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातील उटाडेवाडी येथील शेतकरी संजय उटाडे ( वय 40 वर्षे) शेतात ठिबक सिंचनचे पाइपलाइन करत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.