Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jun 2022 01:31 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे....More

पुढच्या तीन दिवसात उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

जूनच्या अखेरीस हरियाणा, पूर्व राजस्थान, पंजाबचा काही भाग आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ राज्यांमध्येही मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढच्या तीन दिवसात उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.