Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज पाचवा दिवस आहे. प्रत्येक अपडेट्ससाठी लाईव्ह ब्लॉग फॉलो करा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Aug 2022 02:50 PM
8 हजार संगणक शिक्षकांवर उपासमारीची वेळ, आझाद मैदानात धरणे आंदोलन

राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करूनही राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील संगणक लॅब बंद असल्याने त्यावर उपजीविका करीत असलेल्या 8 हजार संगणक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे . त्यामुळे शासनाने संगणक शिक्षकांना धोरण ठरवून विनाअट सेवेत घ्यावे अश्या इतर मागण्यासाठी  महाराष्ट्र राज्य संगणक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शिक्षक आणि शिक्षिका आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत . या अधिवेशनात तरी या सरकारनं अमच्या मागण्यांवर लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विचाराचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी - आमदार महेश शिंदे

आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं की,  आम्ही आंदोलन करत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्च भाषेत बोलत होते, गाजर आणले होते. आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होतो. अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विचाराचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी, आम्ही शांतपणे आलो होतो, अमोल मिटकरींनी आम्हाला ढकललं. अमोल मिटकरी लोकशाहीवादी विचारांचे नेते नाहीत. अशा विचारांच्या लोकांवर त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी. असे लोक लोकशाहीसाठी घातक आहेत. एखादं प्रकरण दुसऱ्या दिशेला कसं न्यायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली. लवासाचे खोके-बारामती ओक्के या घोषणा त्यांना लागल्या. आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत. आम्ही आंदोलन करताना त्यांनी येणं चुकीचं होतं. आम्ही त्यांच्या आंदोलनावेळी तिथं गेलो नव्हतो. आमच्या गद्दारीचे आरोप केले, आम्ही आंदोलन केलं तर का चिडले. आमची आंदोलनं दाबत आहेत. महाराष्ट्राशी गद्दारी तुम्ही केली आहे. अर्थ खातं असताना महाराष्ट्राला लुटलं. बारामतीला जे पैसे गेले ते बघा. ते बाहेर येतील याची यांना भीती वाटत आहे. सचिन वाझेच्या रुपातून गद्दारी तुम्ही केली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहूनच आम्ही आंदोलन केलं आहे, असं आमदार शिंदे यांनी म्हटलं आहे. 

अधिवेशनातच भर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापलं

अधिवेशनातच भर सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापलं. प्रश्नोत्तरांची उत्तर योग्य पद्धतीने देण्याच्या सूचना. उत्तर देताना हे खरे नाही अशी उत्तर देऊ नका. यापुढे असे उत्तर खपवून घेणार नाही. हे खरे नाही असे उत्तर चालणार नाही. बऱ्याच प्रश्नांच्या लेखी उत्तरात हे खरे नाही असे उत्तर दिले जाते. यावरून फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापलं

सभागृहात शिस्त पाळली जात नाही- छगन भुजबळ 

सभागृहात शिस्त पाळली जात नाही. मी 1985 ला या सभागृहात आल्यानंतर नियम कडक होते. मात्र या ठिकाणी आता नियम पाळले जात नाही-  छगन भुजबळ 

अजित पवार काय म्हणाले...

या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, भरत गोगावले यांचा इशारा

हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.

आमदार दिलीप लांडे म्हणाले की, आम्ही लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीनं करत होतो. खरी परिस्थिती आम्ही लोकांसमोर ठेवत होतो. त्यांचे कपडे उतरले जात होते, ते त्यांना नको होतं, त्यामुळं त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असं लांडे यांनी म्हटलं. यात कुणीही कुणाला धमकावलेलं नाही, विरोधकांप्रमाणे आम्हालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जो कुणी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेतलं जाईलच, असं ते म्हणाले. 

अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. 

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.

Ajit Pawar Live : विरोधी पक्षनेते अजित पवार LIVE; पवार म्हणाले की, भाजपचं आंदोलन म्हणजे चोराच्या मनात चांदणं, विरोधकांच्या घोषणा जिव्हारी लागल्या...

Maharashtra Monsoon Session LIVE : सत्ताधारी आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळ थांबत केलं बोर्डचं वाचन

Maharashtra Monsoon Session LIVE : सत्ताधारी आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळ थांबत केलं बोर्डचं वाचन 

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांचं आंदोलन, कोविड काळात मविआ सरकारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलन

धर्म परिवर्तनासाठी 'रेटकार्ड', भाजप आमदार नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले, जबरदस्ती धर्मांतराबाबतच्या कायद्यातील तरतुदी टोकणार करणार

धर्म परिवर्तनासाठी रेटकार्ड, भाजप आमदार नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, रेटकार्ड वाचून दाखवलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले, राणे यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर, जबरदस्ती धर्मांतराबाबत कायदा आहे, या कायद्यातील तरतुदी टोकणार करणार, असं फडणवीस यांनी म्हटलं

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात सत्ताधारी आमदारांचे आंदोलन

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात सत्ताधारी आमदारांचे आंदोलन

मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या विषयासंदर्भात केंद्राशी पाठपुरावा सुरु - देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या विषयासंदर्भात केंद्राशी पाठपुरावा सुरु आहे. या झोपडपट्ट्यांना विमानतळ अॅथोरिटीने पुनर्वसनासाठी जागा दिली तर त्याचं ही पुनर्वसन होईल आणि विमानतळाच्या विस्ताराला ही जागा मिळेलया प्रस्तावाला केंद्राने तत्वत: मान्यता दिली आहे. निर्णय होणं आणखी बाकी आहे

आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी कामकाज उरकून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर काल चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडलं. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे.  हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

काल चौथ्या दिवशी काय काय घडलं...

काल विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रुप महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत असताना विरोधकांना चांगलेच टोले हाणले. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलं. दुष्काळावरुन सुरु झालेली चर्चा सभागृहातून वॉकआऊटपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.

भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणाचे (Bhandara gang rape case) काल सभागृहात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. पीडितेसोबत घडलेल्या गुन्ह्याची फडणवीसांनी सभागृहात काल माहिती दिली.  या घटनेबाबत बेजबाबदार पोलिसांचे निलंबन केलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशी काय काय झालं

नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022  संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं. 

बेरोजगारांना प्रति महिना 5 हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी

विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं निवेदन 

किती नर आणि किती मादी डास सापडले?' आधी अजित पवार आता छगन भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी 

मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये; धनंजय मुंडेंची विधानसभेत फटकेबाजी

दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  

विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती.  

25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.   

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी कामकाज उरकून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे.  हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

काल चौथ्या दिवशी काय काय घडलं...

काल विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रुप महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत असताना विरोधकांना चांगलेच टोले हाणले. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलं. दुष्काळावरुन सुरु झालेली चर्चा सभागृहातून वॉकआऊटपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.

भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणाचे (Bhandara gang rape case) काल सभागृहात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.  पीडितेसोबत घडलेल्या गुन्ह्याची फडणवीसांनी सभागृहात काल माहिती दिली.  या घटनेबाबत बेजबाबदार पोलिसांचे निलंबन केलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशी काय काय झालं

नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022  संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं. 

बेरोजगारांना प्रति महिना 5 हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी

विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं निवेदन 

किती नर आणि किती मादी डास सापडले?' आधी अजित पवार आता छगन भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी 

मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये; धनंजय मुंडेंची विधानसभेत फटकेबाजी

दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  

विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती.  

25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं लवकरात लवकर भरीव मदत करावी : अजित पवार

Devendra Fadnavis : भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना लाजिरवाणी, आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.