सांगली : ओमायक्राँनच्या भीतीने राज्यभर निर्बध वाढले असताना सांगली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढू लागलाय. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातीलच 82 जण कोरोनाबधित झालेत. त्यामुळे मिरज वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचं स्पष्ट झालं आहे. 


महाविद्यालयातील रिपोर्टचा मंगळवारपर्यंतचा आकडा 32 इतका होता. गुरुवारी त्यात आणखी 50  जणांची भर पडली आहे. यातील बहुतांश विद्यार्थिनी असून काही शिकाऊ डॉक्टरचा देखील समावेश आहे. सर्वांना कोरोनाची सामान्य लक्षणे, यातील काही रिपोर्ट ओमायक्राँनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठवले गेलेत. या रिपोर्टकडे आता सर्वांचं लक्ष आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयच कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने खळबळ उडाली असून यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाचा आलेख देखील वाढला आहे.


मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी आणि काही शिकाऊ डॉक्टर मिळून 82 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी ही माहिती दिलीय.


मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणि मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करीत असलेल्या सर्व 210 जणांचे स्वँब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालापैकी 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. अद्याप 50 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 


कोरोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वँब ओमायक्राँन तपासणी साठी पुणे व दिल्ली प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यास अद्याप दोन ते दिवस लागतील. बाधित रुग्णांना कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना कोरोनाची कोणतीही तीव्र लक्षणे नसल्याचे डॉ. रुपेश शिंदे म्हणालेत. आता ओमायक्राँनच्या रिपोर्टकडे सर्वाचे लक्ष आहे.


महत्त्वाच्या बातम्या :