Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कोरोनाच्या आकडेवारीत आज (बुधवारी ) कमालीची वाढ होताना दिसत आहे. आज थेट 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मंगळवारच्या (29 डिसेंबर) तुलनेत ही आकडेवारी कमालीची वाढलेली आहे. मंगळवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 1,377 होती. ज्यामध्ये मोठी वाढ होऊन आज 2 हजार 510 रुग्ण समोर आले आहेत. कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मागील आठवड्याभरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी
- 29 डिसेंबर - 2510 रुग्ण
- 28 डिसेंबर – 1377 रूग्ण
- 27 डिसेंबर – 809 रूग्ण
- 26 डिसेंबर – 922 रूग्ण
- 25 डिसेंबर – 757 रूग्ण
- 24 डिसेंबर – 683 रूग्ण
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये 2510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत सात लाख 48 हजार 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. मुंबईत 3 हजार 227 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुपटीचा दर 682 दिवस इतका झालाय. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबरदरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णाचा दर 0.10 टक्के इतका झालाय. मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही मुंबईत सध्या सील केलेल्या इमारतींची संख्या 14 आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :