Amaravati Bachhu Kadu News : निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. 


बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे. 


प्रकरण काय?


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांनी मुंबईतील आपल्या फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती


2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढतेवेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती. त्यामुळे या विरोधात चांदूरबाजार भाजपचे गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू विरोधात 27 डिसेंबर 2017 रोजी चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, यात तब्बल पाच वर्षा नंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना 2 महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड दिला आहे, तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांच विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha