Student agitation in Rahuri  Krishi Vidyapeeth : विविध मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहुरी ‌येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परिक्षेच्या‌ अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या आंदोलनात शेकडो विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत.


या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमचे हक्क परत द्या, चार वर्षाचा खर्च परत द्या, कृषी अभियांत्र्यांना न्याय द्या अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. आमच्यावर अन्याय झाला असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. आमच्यावर झालेला अन्याय दूर करुन आम्हाला न्याया मिळावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. 


आंदोलकांच्या प्रमुख मागण्या



  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी घोषीत केलेला असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तत्काळ रद्द करावा.

  • कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा व ज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी व कृषी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे.

  • कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना कृषी पदवीधराप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर-1 व पेपर-2 च्या अभ्यासक्रमात गुण भारांकानाची समान संधी निर्माण करून द्यावी.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) इतर पदाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाप्रमाणे कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधीत कर्तव्य व जबाबदाऱ्याशी संबंधित असावा.

  • नवीन संतुलित अभ्यासक्रम निर्माण होईपर्यंत जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी. परंतू नवीन न्यायीक अभ्यासक्रम लवकरात लवकर तयार करण्यात यावा. 

  • नवीन कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तयार करताना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधीत अभ्यासक्रम असावा.


महत्त्वाच्या बातम्या: