Sindhudurg News : बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी सिंधुदुर्गहून आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अकडल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 2 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. 


बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याचा तपास करताना घेतली लाच
याबाबत माहिती अशी की, एका महिला डॉक्टरने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. सिंधुदुर्गच्या महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं नलिनी शंकर शिंदे असं नाव आहे. नलिनी या मालवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याच्या तपासासाठी निगडीत आल्या होत्या. त्यांनी महिला डॉक्टरकडे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करते असे सांगून 5 लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 2 लाख घ्यायचे ठरले, ते पैसे घेताना एसीबीने पोलीस अधिकारी नलिनी यांना रंगेहाथ पकडले आहे. 


 


हे देखील वाचा -