Nana Patole on BJP : राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी अत्युंत चुरशीची लढत झाली, यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर आरोप केले आहेत. 


ही निवडणूक गेम हा गेम प्लॅनची होती - नाना पटोले


राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती लागला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. यावर नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आरोप केलेत. ते म्हणाले, खरं तर चारही उमेदवार निवडून आणणं हे कठीण काम नव्हतं. ही निवडणूक गेम प्लॅनची होती. असा आरोप नाना पटोले यांनी भाजपावर केला आहे. ते म्हणाले, या निवडणुकीसाठी पैशांचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गेम प्लॅनचा भाग होता  यामधून आम्हाला शिकण्याजोगे आहे. यातून आम्ही शिकून मोठी भरारी घेऊ, आत्ता आम्ही गेम प्लान मध्ये फेल झालो. यात देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे. 


पवार-फडणवीस कौतुक
पवारांच्या मनात काय हे माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा.


नियोजनानुसार लढवली निवडणूक
संपूर्ण निवडणूक नियोजनानुसार लढवली गेली. आम्ही त्यांच्या गेम प्लॅनमध्ये अडकलो. आम्ही फसलोय असे नाना पटोले म्हणाले


एमआयएमची मतं कुठं गेली माहित नाही
पटोले म्हणाले, एमआयएमनं आधी काँग्रेससोबत आहे असं सांगितलं, नंतर आम्ही महाविकास आघाडीसोबत असं म्हटलं. आम्ही काही त्यांची मतं मागितली नव्हती. ती मते कुठे गेली माहित नाही.


पण हा अधिकार शिवसेनेचा होता - नाना पटोले


संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी द्यावी ही काँग्रेसची सुरुवातीपासूनच भूमिका होती, पण हा अधिकार शिवसेनेचा होता. पैशाची गर्मी आणि सत्तेचा दुरुपयोग भाजपकडून केला जातोय हे लोकशाहीसाठी घातक आहे.विधानपरिषदेत 6 उमेदवार राहतील ते सर्व निवडून येतील. या गेम प्लॅनचा वापर करुन भाजप जिंकलेय. आम्हीही यातुन शिकतोय असे पटोले म्हणाले.


भाजपला तीन जागा, महाविकास आघाडीलाही तीन जागा 


मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मत आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला.  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती.  या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


महत्वाच्या बातम्या: