UPSC : यूपीएससीची परीक्षा पास करून आयएएस किंवा आयपीएस होण्यासाठी परीक्षार्थींना अत्यंत कठीण मुलाखतीच्या अग्निदिव्यातून जावे लागते. यूपीएससीच्या परीक्षेत देशातून आठवा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या योगेश कुंभेजकर यांना मात्र यूपीएससी पेक्षाही कठीण मुलाखत द्यावी लागली. आणि ही मुलाखत घेतली नागपूर जिल्ह्यातील थुगाव निपाणी या अत्यंत दूरस्थ खेड्यातील काही चिमुकल्यांनी... 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल


योगेश कुंभेजकर सध्या नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून ते ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून नागपूर पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या थुगाव निपाणी गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनेक नवीन शैक्षणिक प्रयोग सुरू केले आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक सकारात्मक बदल झाले आहे.


न्यूनगंड दूर होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला


विद्यार्थ्यांच्या मनातला न्यूनगंड दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा ग्रामीण विद्यार्थी कुठे ही कमी नाही, हेच जगासमोर आणण्यासाठी आज योगेश कुंभेजकर यांनी एक आगळा वेगळा प्रयोग राबविला. त्यांनी थुगाव निपाणी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःची मुलाखत घेण्याची संधी दिली. मग काय गावातील चिमुकल्यांनी ही कसलेल्या पत्रकारांचा सारखे प्रश्न विचारत एका आयएएसला बोलतं केलं... ग्रामीण शिक्षण, शिक्षक, जिल्हा परिषदेतील प्रशासन, कार्पोरेट जगतातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचं कारण काय? असे अनेक प्रश्न विचारत खेड्यातील शाळेतल्या चिमुकल्यांनी आपल्या आत्मविश्वासाने आयएएस असलेल्या कुंभेजकर यांना चकित केले.


संबंधित बातम्या :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI