Beed News : एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्याचे आई-वडील एचआयव्ही (HIV Positive) बाधित म्हणून निगेटिव्ह असलेल्या मुलाला प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed) पाली येथे समोर आली आहे. इन्फ्रंट इंडिया या संस्थेचे संचालक दत्ता आणि संध्या बारगजे यांनी यासंदर्भात आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापन आणि समाज आजही एचआयव्ही बाधित मुलांच्या संदर्भात चुकीची भूमिका घेत असल्याचं समोर आलं आहे.


मुलाला शाळेत पाठवू नका, शाळा व्यवस्थापनाने अचानक घेतला निर्णय
पाली मधल्या इंग्लिश स्कूलमध्ये आपला मुलगा शिकावा यासाठी आई आणि वडील दोघांनी प्रयत्न केले. परिवर्तन या इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला, फी भरली, दीड महिना शाळेने शिकवले मात्र अचानक शाळेत पाठवू नका अस सांगितल्याचा आरोप पीडित आईने केला. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अमृत महोत्सव साजरा करताना पाठवता आलं नाही, याची खंत देखील बोलून दाखवली.


विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष
बीड शहराजवळच्या इन्फंट्र इंडिया या संस्थेमध्ये एचआयव्ही बाधित तरुण-तरुणी आणि विद्यार्थी राहतात. यापूर्वी सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्याच संघर्षाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसत आहे.


तर आमची मुलं पाठवणार नाही, इतर पालकांचा पवित्रा
घडलेल्या प्रकारासंदर्भात परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलने या विद्यार्थ्याला कोणतीही वेगळी वागणूक दिली नसल्यास म्हटलंय. मात्र इतर पालक आक्रमक झाल्यामुळे तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. म्हणून शासन आणि प्रशासनाने माझी मदत करावी. अशी विनंती शाळेचे संचालक अशोक शिंदे आणि सह शिक्षिका श्रद्धा मस्के यांनी केली.


शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश
घडलेल्या प्रकारानंतर बीडच्या शिक्षण विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. केवळ शाळेची चौकशी नाही, तर यासोबत इतर विद्यार्थ्यांच्या पालका सोबत बैठक घेणार असल्याचे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे गावातील पालक भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवत नाहीत. म्हणून संस्थाचालक देखील अडचणीत आहेत, तर मुलाला शिक्षण मिळावं म्हणून एचआयव्ही बाधित पालक देखील आग्रही आहेत. या वादात एचआयव्ही संदर्भात कोट्यावधी रुपये खर्च करून आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती करत आहे. मात्र प्रत्यक्ष लोकांचे गैरसमज दूर झाले नाहीत, म्हणून जनजागृती कमी पडत असल्याच यावरून दिसून येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज रॅपिड फायर सुनावण्या; अवघ्या देशाचं लक्ष लागलेली तीन प्रकरण सुनावणीला


Todays Headline 25th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या