Navi Mumbai Accident : ऐरोलीमध्ये दिवा सर्कल जवळ एका ट्रकचा टायर फुटून झालेल्या आपघातात रिक्षा चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वाशी कडून मुंबईत जाणाऱ्या ट्रकचे टायर ऐरोली दिवा सर्कल जवळ फुटले. आणि हा अपघात झाला. 


रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू
याबाबत माहिती अशी की,  ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात चवळीच्या गोणी भरण्यात आल्याने ट्रक एका बाजूला कोलमडला. यावेळी रस्त्या लगत उभा असलेल्या रिक्षावर ट्रक पडल्याने रिक्षा पूर्णपणे चेपली. रिक्षात बसलेल्या चालकाचा ट्रक खाली येवून जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक मध्ये प्रमाणाच्या बाहेर गोणी भरण्यात आल्याने हा ट्र्क कोलमडला असल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान या मध्ये ट्र्क चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या :