Nitin Gadkari On Road accident : देशात दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी मुंबईत एका कार्यक्रमात दिली. गडकरी म्हणाले, "एका सविस्तर अहवालात (DPR) देशात दरवर्षी 1.50 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावत असल्याचे समोर आले आहे." दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर रस्ते सुरक्षा हा मुद्दा जोर धरू लागला. दरम्यान आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून हंगामा होण्याची शक्यता आहे. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


"दरवर्षी पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात"
मुंबईत सिविल इंजिनिअर्सच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. नितीन गडकरी यांनी दावा केला की, "देशात दरवर्षी पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात होतात, ज्यात दीड लाखांहून अधिक लोक आपला जीव गमावतात. सल्लागारांच्या तपशीलवार अहवालात हे स्पष्ट आहे की, लोकांनी केलेल्या चुकांमुळेच मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.


"डीपीआर तयार करताना बदलाची गरज"
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यांवरील ब्लाइंड स्पॉट्स सुधारण्यावर भर देऊन डीपीआर तयार करताना गुणात्मक बदल करण्याची गरज आहे. असे गडकरी म्हणाले.


"अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली असेल"
विनायक मेटेंच्या अपघातावर नितीन गडकरींनी शोक व्यक्त म्हटले होते की, रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवं. या अपघाताचा नेमकं कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल.


"भाजप सत्तेवर येण्याचे श्रेय कोणाला?"
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari vajpeyee), लालकृष्ण आडवाणी (Lalkrishna Adwani), दीनदयाल उपाध्याय (deendyal Upadhyal) आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली, त्यानंतर आज नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली, असं वक्तव्य नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 


"आज अटलजींचे ते वक्तव्य खरे ठरले"


गडकरी म्हणाले की, काही काळापूर्वी पक्षाची स्थिती खूप बिकट होती. मात्र अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता असल्याचे गडकरी यांनी म्हणाले. गडकरी म्हणाले की, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईतील भाजप कार्यालयात गेलो होतो तेव्हा कार्यालयाची दयनीय अवस्था होती. तेव्हा मावळत्या सूर्याला पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा" असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असं गडकरी म्हणाले. 


संबंधित बातम्या


Nitin Gadkari : अटलजी-अडवाणींसारख्या नेत्यांमुळं आज मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी


Maharashtra Monsoon Session : अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार, 'या' मुद्द्यांवरुन होणार सत्ताधारी-विरोधकांचा 'सामना'