Nitin Gadkari Speech In Nagpur : अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari vajpeyee), लालकृष्ण आडवाणी (Lalkrishna Adwani), दीनदयाल उपाध्याय (deendyal Upadhyal) आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली, त्यानंतर आज नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली, असं वक्तव्य नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
ते नागपुरातील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने त्यांच्या एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी हे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते.
गडकरी म्हणाले की, काही काळापूर्वी पक्षाची स्थिती खूप बिकट होती. मात्र अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता असल्याचे गडकरी यांनी म्हणाले. गडकरी म्हणाले की, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईतील भाजप कार्यालयात गेलो होतो तेव्हा कार्यालयाची दयनीय अवस्था होती. तेव्हा मावळत्या सूर्याला पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा" असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले की, जसे कार्य आपण राजकीय क्षेत्रात केले आहे. तसेच कार्य सामाजिक क्षेत्रातही करण्याची गरज आहे आणि संघ प्रणित एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक या नात्याने तुम्ही सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार असा विश्वास असल्याचे गडकरी म्हणाले.
शिक्षकांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, आपल्या प्रयत्नातून आपण गरीबी, भूखबळी, बेरोजगारीतून आपण मुक्त होऊ. आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनू. आदर्श समाजाचं एक अंग आपण बनाल. तसेच देशाचे जबाबदार नागरिक बनून कार्य कराल. निश्चितपणे आपण देशाच्या नागरिकांना अभिमान वाटेल असं काम कराल. आता तो दिवस दूर नाही, लवकरच हा दिवस येईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
मुंबईहून दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करा - गडकरी