Expensive Homes in Metro Cities : मेट्रो शहरात घर खरेदी (homes) करण्याचा विचार करत असाल तर ही बातम्या तुमच्यासाठी आहे, कारण राज्यातील मेट्रो शहरांमध्ये घरं महागणार असल्याची चिन्हे दिसत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना मेट्रो शहरांमध्ये घर खरेदी करणं थोडं आवाक्याबाहेर पडू शकतं, जाणून घ्या सविस्तर..


एक टक्का मेट्रो अधिभार लागण्याची शक्यता
मेट्रो असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये एक टक्का मेट्रो अधिभार लागण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. दोन वर्षांपूर्वी एक टक्का मेट्रो अधिभार लावण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र यावर आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती 31 मार्चला संपत असल्याने एक एप्रिलपासून १ टक्का मेट्रो अधिभार या शहरांमध्ये लागण्याची शक्यता आहे. 31 मार्च नंतर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मुंबई शहरात सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि इतर शहरांमध्ये सात टक्के मुद्रांक शुल्क होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला राज्य सरकार पुन्हा एकदा स्थगिती देणार की याची क्ष अंमलबजावणी होणार याकडे सगळ्यांचे ललागलंय. अधिभार स्थगितीची अंमलबजावणी झाली नाही तर घर महागणार असल्याचं बोललं जातंय,


अंमलबजावणीकडे सगळ्यांचे लक्ष


मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या महानगरांमधील दस्तखरेदी, गहाणखताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात एक टक्का मेट्रो अधिभार न घेण्याची सवलत कोरोना काळात म्हणजे सन 2020 मध्ये देण्यात आली होती. पुढील दोन वर्षे मेट्रो अधिभार लागू करण्यात येणार नसल्याचा निर्णय त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांना मेट्रो अधिभारातून सवलत देण्यात आली होती. त्यामुळे या शहरांत सातऐवजी सहा टक्केच मुद्रांक शुल्क आकारले जात होते. मात्र एक टक्का मेट्रो अधिभाराच्या सवलतीची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. ती वाढवण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षांपासून एमएमआर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये आता दस्तनोंदणी, गहाणखत यांवर एक टक्का मेट्रो अधिभारासह एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: