Bhandara News : मार्क वाढवायचे असेल तर परीक्षार्थींना चक्क 80 हजारांची मागणी केली जातेय, नियुक्ती पत्रासाठी द्यावे लागेल 2 लाख? भंडाऱ्यात आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना गुण वाढवून देण्यासाठी कॉल येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम वाढत आहे. फोन करणारा मोठ्या अधिकाऱ्यांचा असिस्टंट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा कॉल फेक आहे की खरोखर, आरोग्य विभागाची माहिती लीक झाली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमका प्रकार काय?


आरोग्य विभागातून विद्यार्थ्यांना गुण वाढवण्यासाठी फोन?
भंडाऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे,  आरोग्य विभागातून विद्यार्थ्यांना एक फोन येत आहे, परीक्षेत गुण वाढ़वायचे असेल तर पैसे द्या, पण हा फोन फेक असल्याची माहिती समजत आहे. मागिल काही दिवसापासून भंडाऱ्यातिल आरोग्य विभागातील परीक्षार्थीना असे गुण वाढवून देण्यासाठी पैशाची मागणी करणारे फोन कॉल येऊ लागले आहे।याची तक्रार भंडारा शहरात केली गेली असून त्यांमुळे तुम्हालाही असे फेक कॉल येऊ शकत असल्याने वेळीच सतर्क वा???


10 गुण वाढवायचे असेल तर 80 हजार रुपये द्या..
राज्य आरोग्य विभागाची D (चतुर्थ कर्मचारी) ग्रुपची परीक्षा मागील नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेत भंडारा येथील विवेक आगळे या परीक्षार्थीने आरोग्य विभागाचा पेपर दिला, मात्र त्यांना सतत एक कॉल येत असून तुम्ही मेरीट लिस्ट मध्ये येण्यासाठी 10 गुण कमी पड़त आहेत, त्यामुळे तुम्हाला 10 गुण वाढवायचं असेल तर तुम्ही 80 हजार रुपये द्यावे लागतील व नियुक्ती पत्र पाहिजे असल्यास 2 लाख रुपये द्यावे लागतील असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तसेच त्याने विवेक यांचा परिक्षा सेंटर, पेपर सेट नंबर, OMRनंबर सुद्धा सांगितले. त्याने त्याचे नाव सत्यप्रकाश असे सांगितले असून आरोग्य विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्यांचा असिस्टंट असल्याचे सांगितले. तर ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहे, त्याची बँक डिटेल सुद्धा विवेक यांना व्हाट्सऐप पाठवले आहे. यामुळे आरोग्य भरतीची माहिती लीक झाली की काय? असा प्रश्न आता पडू लागला आहे. 


फोन मुळे परीक्षार्थी संभ्रमात
या फेक फोन मुळे परीक्षार्थी संभ्रमात सापडले असून त्यानी भंडारा शहर पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे, विशेष म्हणजे आता हा फेक कॉल असेल तर संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती या सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीकडे पोहचली कशी? किंवा खरोखर आरोग्य विभागाच्या परीक्षेची माहीत लीक झाली कि काय? असे प्रश्न उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात पोलिस चौकशी झाल्यावरच कोणते सत्य पुढे येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान भंडारा पोलिस या घटनेची चौकशी करीत आहे