Maharashtra Breaking News LIVE Updates: सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 30 Nov 2021 08:14 PM
सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती

नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.


 

सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती

नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.


 

पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 84 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496772 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 824 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3869 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.


 

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला कारभार पाहण्याची परवानगी

राज्य सरकारनं नेमलेल्या मंडळाचे उच्च न्यायालयानं अधिकार गोठवले होते. या विरोधात अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनेक दिवसापासून निवड होऊनही कारभार करता येत नसल्याचं त्यांनी याचिकेतून म्हटलं होतं. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज दाखल सुनावणी झाली. साई संस्थानचा कारभार पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायलायने दिला निर्णय

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना मुदतवाढ नाही

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना मुदतवाढ नाही. राज्य सरकारनं पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय कमिटीनं नाकराला आहे.  सनदी अधिकारी देबाशिश चक्रवर्ती यांना अतिरिक्त चार्ज दिला आहे. 


 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहचल्या आहेत.

पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आले चार प्रवासी, त्यातील एक प्रवासी पॉझिटिव्ह

पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल  पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

Police Vehicle Accident: उदगीर येथे पोलिसांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

पेट्रोलिंगसाठी बाहेर गेलेल्या उदगीर पोलीस ठाण्यातील वाहनाला अपघात घडलाय. तिरुका या गावाजवळ मध्यरात्री पोलिसांचं वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्यानं हा अपघात घडला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मात्र, यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर, एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

पुण्यातील शाळा उद्यापासून नव्हे 15 डिसेंबरपासून सुरू होणार

राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी पुण्यात  मात्र, 15 डिसेंबरपासून  पहिली ते सातवीच्या सुरू होणार आहेत. 

स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक.

कापूस सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक.


बुलढाणा शहर पोलोसांनी थोड्या वेळापूर्वी केली अटक.


रविकांत तुपकर , त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर व इतर पाच जणांना केली अटक.


दुपारी सर्वाना न्यायालयात केले जाणार हजर.


अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास जावे लागणार कारागृहात.

मुंबई: वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट; चार जखमी

 मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून भरणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात दाखल

LIVE UPDATES : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात दाखल #ParamBirSingh #SachinVaze #Mumbai



परमबीर सिंह यांना दिलासा! मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडनं जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द

#BREAKING परमबीर सिंह यांना दिलासा! मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडनं जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द, मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकांत मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बजावला होता वॉरंट



या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात - महापौर मुरलीधर मोहोळ

तीन पक्षाच्या राज्य सरकार मध्ये विसंवाद . अजित पवारांचा निर्णय राज्य सरकारने ने बदलला. नाट्यगृह ,सिनेमागृह पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता. मात्र त्याच दिवशी राज्य सरकारने अजित पवारांचा निर्णय डावलून 50 टक्के क्षमता ठेवण्याचा निर्णय घेतला. असं सारखं होतंय ,या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात, शाळा सुरू करण्याबाबत ही संभ्रम, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्या बैठका घेऊन निर्णय घेऊ असं पुण्याची महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमैया अमरावतीत दाखल.. 

भाजप नेते किरीट सोमैया अमरावतीत दाखल.. आज दिवसभर ते अमरावती शहरात राहणार आहेत. आत्ता ते सकाळी ८ वाजता अमरावती स्टेशनवर आगमन झाले असून त्यांचं भाजप कडून स्वागत करण्यात आले.. सकाळी 11 वाजता किरीट सोमय्या शहरातील शनी मंदिर आणि काही भागात ते पाहणी करून चर्चा करतील.. दुपारी 12 वाजता श्रमिक पत्रकार संघ याठिकाणी ते पत्रकार परिषद घेणार.. सायंकाळी 5 वाजता बडनेरा वरून मुंबई साठी रवाना होतील...

भाजप नेते किरीट सोमैया अमरावतीत दाखल.. 

भाजप नेते किरीट सोमैया अमरावतीत दाखल.. आज दिवसभर ते अमरावती शहरात राहणार आहेत. आत्ता ते सकाळी ८ वाजता अमरावती स्टेशनवर आगमन झाले असून त्यांचं भाजप कडून स्वागत करण्यात आले.. सकाळी 11 वाजता किरीट सोमय्या शहरातील शनी मंदिर आणि काही भागात ते पाहणी करून चर्चा करतील.. दुपारी 12 वाजता श्रमिक पत्रकार संघ याठिकाणी ते पत्रकार परिषद घेणार.. सायंकाळी 5 वाजता बडनेरा वरून मुंबई साठी रवाना होतील...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर

West Bengal CM Mamata Banerjee Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्या त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishekh Banerjee) यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. ममता बनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तर उद्या ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

पार्श्वभूमी

6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाचे अनुयायांना आवाहन
6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाने अनुयायांना आवाहन केले आहे. ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येण्यास निर्बंध घातले जाऊ शकतात. महापालिकेकडून महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्क येथे अनुयायांकरता व्यवस्था केली जाते मात्र,यंदा ती केली जाणार नाही. अनुयायांनी गेल्यावर्षीचे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. 


ST strike Updates : आज19 हजार 163 एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती
एसटी महामंडळाच्या संपात सहभागी कर्मचारी हळू हळू कामावर परतू लागले. आज 19 हजार 163 कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. यामध्ये प्रशासकिय विभागातील 8 हजार 922, कार्यशाळेत काम करणारे 5 हजार 442, चालक 2 हजार 549 तर वाहक 2 हजार 250 पुन्हा एकदा कामावर परतले आहेत. 


मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा, माझगाव कोर्टाकडून 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर, मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार


मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा,
माझगाव कोर्टाकडनं 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर,
भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार,
पुढील सुनावणी 30 डिसेंबरला


पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार
पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार, चाइल्ड टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर आज किंवा उद्या मध्ये पहिली ते सातवी च्या शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती, चाइल्ड टास्क फोर्स सुद्धा पुढील बैठकीत नव्या मर्गदर्शक सूचना देणार, मात्र सध्यातरी चाइल्ड टास्क  सदस्य सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक.


निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर
Vidhan Parishad Election Nagpur : नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule) उमेदवारी जाहीर केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.