Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 29 Nov 2021 07:35 PM
राज्यात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस


राज्यात पुन्हा पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अरबी समुद्रात 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे. 

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू, शासनाचा निर्णय

शिक्षण विभागाकडून अखेर 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यात येणार, असा शासनानं निर्णय घेतलाय.

भाजप नेते विनोद तावडे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

भाजप नेते विनोद तावडे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. तावडे यांची नुकतीच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पदोन्नती झालीय.

6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाचे अनुयायांना आवाहन

6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाने अनुयायांना आवाहन केले आहे. ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येण्यास निर्बंध घातले जाऊ शकतात. महापालिकेकडून महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्क येथे अनुयायांकरता व्यवस्था केली जाते मात्र,यंदा ती केली जाणार नाही. अनुयायांनी गेल्यावर्षीचे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. 

अमरावतीत कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चारजण जखमी

अमरावतीत बोलेरो  कारचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जखमी झाले आहेत. अमरावती ते दर्यापूर मार्गावरील म्हैसपूर फाट्याजवळ ही घटना घडली आहे.  या धडकेत नागपूर येथील शिक्षिका भारती गजभिये यांचा मृत्यू झाला असून  पत्रकार प्रेम गजभिये गंभीर जखमी आहेत. 

ST strike Updates : आज19 हजार 163 एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती

एसटी महामंडळाच्या संपात सहभागी कर्मचारी हळू हळू कामावर परतू लागले. आज 19 हजार 163 कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. यामध्ये प्रशासकिय विभागातील 8 हजार 922, कार्यशाळेत काम करणारे 5 हजार 442, चालक 2 हजार 549 तर वाहक 2 हजार 250 पुन्हा एकदा कामावर परतले आहेत

मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा, माझगाव कोर्टाकडून 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर, मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार


मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा,


माझगाव कोर्टाकडनं 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर,


भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार,


पुढील सुनावणी 30 डिसेंबरला

वकिल महिलेचा मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला रोखलं

पुण्याच्या दौंड येथील डीवायएसपीच्या विरोधात एक वकिल महिलेनं मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला..


पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्या महिलेला पोलिस स्टेशनला घेऊन गेले..


महिलेचा आरोप आहे की, एका डीवायएसपीने महिलेशी छेडछाड करत तिच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे...


आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे..


एका बाटलीमध्ये रॉकेल घेऊन आली होती सदर महिला..

ज्या घिसाडघाईने कृषी कायदे आणले होते त्याच घाईमध्ये कायदे माघारी घेतले-शिवसेना खासदार विनायक राऊत

बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीत सरकार चर्चेचं आश्वासन देतं आणि नंतर सभागृहात पळ काढतं ज्या घिसाडघाईने कृषी कायदे आणले होते त्याच घाईमध्ये कायदे माघारी घेतले-शिवसेना खासदार विनायक राऊत


700 हून अधिक शेतकऱ्यांचा बळी आंदोलनाने घेतला आहे त्यावर सरकार बोलू इच्छित नाही


शिवसेना एम एस पी च्या मुद्द्यावर आंदोलकांच्या बाजूने


आजच्या विरोधकांच्या बैठकीत फुटीचं चित्र दिसलं का, काँग्रेसच्या बैठकीत समाजवादी पक्ष, तृणमूलसह शिवसेना अनुपस्थित त्यावर:


काँग्रेस कडून काहीतरी मिस कम्युनिकेशन झालं


जेव्हा आम्हाला सुचित केलं जातं तेव्हा आम्ही काँग्रेस सोबतही बैठकीत उपस्थित राहिलो आहे, पुढेही राहू

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार
पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार, चाइल्ड टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर आज किंवा उद्या मध्ये पहिली ते सातवी च्या शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती, चाइल्ड टास्क फोर्स सुद्धा पुढील बैठकीत नव्या मर्गदर्शक सूचना देणार, मात्र सध्यातरी चाइल्ड टास्क  सदस्य सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक 
ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला अनुयायी येऊ शकणार का? यावर प्रश्नचिन्ह

ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला अनुयायी येऊ शकणार का? यावर प्रश्नचिन्ह


दुपारी ३ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार महापरिनिर्वाण दिनासंदर्भानं सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेणार


गेल्या वर्षीही कोविड संकटाच्या सावटामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले होते...


तसेच, आवाहन यावेळीही केले जाण्याची शक्यता...

अब्रुनुकसानीच्या प्रकरणात हायकोर्टानं दिलेला निकाल रद्द करण्यास, ज्ञानदेव वानखेडेंचीही सहमती

अब्रुनुकसानीच्या प्रकरणात हायकोर्टानं दिलेला निकाल रद्द करण्यास, ज्ञानदेव वानखेडेंचीही सहमती


नवाब मलिकांनी हायकोर्टात सादर केलेला अर्ज वानखेडेंनाही मान्य


ज्ञानदेव वानखेडे विरूद्ध नवाब मलिक खटल्यात दिलेला निकास रद्द होऊन पुन्हा नव्यानं सुनावणी  होणार


खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत वानखेडेंबाबत कुठलंही विधान करणार नाही, नवाब मलिकांची हमी


न्यायमूर्ती माधव जामदारांच्या निकालात वानखेडेंना दिलासा दिलेला नसला तरी ओढलेल्या ताशे-यांवर मलिकांचा आक्षेप

4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची माहिती

#BREAKING : हिवाळी अधिवेशनाविषयी मोठं अपडेट, 4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची माहिती

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये उभी फूट

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये उभी फूट, जिल्ह्यातील अनेक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर, मध्यवर्ती बसस्थानक वगळता जिल्ह्यातील इतर बस स्थानकावरील एसटी सेवा पुन्हा ठप्प


कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याने कागल बस स्थानकात शुकशुकाट, आंदोलनाची दिशा कोणती संघटना नाही तर एसटी कर्मचारी ठरवणार,कर्मचाऱ्यांची भावना

महानगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही जागा वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महानगरपालिकामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या प्रकारे जागा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही जागा वाढवण्याच्या संदर्भात आज निर्णय झाला. साधारणता 6 ते 7 टक्के जागा वाढणार

परभणी विभागातील एसटी महामंडळाचे 205 कर्मचारी निलंबित, कामावर रुजू होत नसल्याने कारवाई 

 एसटीचे शासनात विलगीकरण करावे  या मागणीसाठी जवळपास १ महिन्यापासून परभणी विभागातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.त्यामुळे परभणी विभागातून होणारी वाहतूक पुर्णपणे बंद आहे.शासनाने या आंदोलनाच्या अनुषंगाने एसटी कर्मचान्यांच्या वेतनामध्ये वाढ केली मात्र तरीही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने परभणीतील जवळपास 205 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.


राज्य शासनाने राज्यात होत असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन इतर पर्याय कर्मचाऱ्यांसमोर ठेवले आहेत मात्र तरीही कर्मचारी मात्र विलीगीकरणावर ठाम आहेत.काही केल्या एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत नसल्याने परभणी विभागातील २०५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.यामध्ये सात आगार, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.कार्यवाहीनंतरही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शासन आता काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुण्यातील नांदेड सिटी जवळील हॉटेल आगीत खाक, जीवितहानी नाही 



सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड सिटी सर्कल जवळील कारले प्लाझा या इमारतीतील हॉटेल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत हॉटेलच्या किचनमधील आठ ते दहा मोठे कमर्शिअल गॅस सिलिंडर बाहेर काढले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. एक तासाच्या आत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. हॉटेलचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून  शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांनी वर्तवला आहे. 


















 














साताऱ्यात तलाठ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिली 13 जणांची नावे

अपमानास्पद वागणूक देतात, कोणतीही कामे सांगतात, चुकीची कामे माझ्याकडूनच करून घेतात, अशी चिठ्ठी लिहून तलाठी लक्ष्मणह नामदेव बोराटे  गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी सुसाइड नोटमध्ये जवळपास तेरा जणांची नावे लिहिली आहेत.  पोलिसांनी नातेवाईकांना ही चिठ्ठीन दाखविल्याने संध्याकाळी सातारा ठाण्यात बराच गोंधळ झाला.


तलाठी लक्ष्मण बोराटे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर तहसील कार्यालयात तलाठी पदावर कार्यरत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागात त्यांची नेमणूक होती. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इतरही काही कामकाज वरिष्ठ देत होते. चुकीची कामे करायला लावणे, कार्यालयात अपमानास्पद बोलणे, असे प्रकार त्यांच्या बाबतीत होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे ..

निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर

Vidhan Parishad Election Nagpur : नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule) उमेदवारी जाहीर केली आहे.

नाशिकमधील 36 कर्मचारी पुन्हा एसटी संपात सहभागी

एकीकडे एसटी संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतांनाच नाशिकमध्ये शनिवारी कामावर रुजू झालेले 36 कर्मचारी कालपासून पुन्हा संपात सहभागी झाल्याने कालपासून नाशिक विभागात एकही बस रस्त्यावर धावू शकलेली नाही. आज सकाळपासून देखील महामंडळाची एकही बस आगारातून बाहेर पडलेली नसून बससेवा पूर्ण ठप्प झाली आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढतेय, पोलिसांना आव्हान देण्यारा अणखी एक व्हिडिओ

खून, हाणामाऱ्यानी हादरलेल्या नाशिक शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस अपयशी ठरत असतांनाच पोलिसांना आव्हान देण्यारा अणखी एक व्हिडिओ समोर आलाय,  सोनसाखळी, मोटार सायकल चोरट्यांनी आता मेडिकल स्टोअर्सकडे आपला मोर्चा वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात एकाचवेळी 5 मेडिकल स्टोअर्स  फोडण्यात आली होती, रात्रीच्या अंधारात चार ते पाच चोरटे दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश प्रवेश करत, रोकड लंपास  करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.  पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागपूरमधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

नागपूरमध्ये उप्पलवाडी परिसरातील प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे. सकाळी 6.24 वाजता सुमारास आग लागल्याचं समजेतय. आग विझवण्यासाठी अग्निशमीन दलाच्या 7 गाड्या पोहचल्या 

पार्श्वभूमी

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या प्रकरणाचे रुग्ण वाढू लागल्यानं जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आलेत. तसेच त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का? याचीही तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.



पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 852 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3926 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.



चर्चेला मला बोलवा, एसटी विलिनीकरण कसं करायचं ते मी सांगतो; प्रवीण दरेकरांचे आव्हान
एसटी संपाबाबत सरकारला मी आव्हान करतो, चर्चेला मला बोलवा विलनीकरण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. 



परळी वैजनाथनंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर देवस्थानला धमकी
चार दिवसांपूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला 50 लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. असेच पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे.. योगेश्वरी देवस्थान कमिटी च्या नावाने आलेल्या पत्रामध्ये पन्नास लाख रुपये द्या. नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे.



78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या
Nagpur Crime News : नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलंय. नागपूरात 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या टीबी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या. धक्कादायक म्हणजे मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि  तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.