Maharashtra Breaking News LIVE Updates: भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
जुना मुंबई -पुणे मार्गावर खालापूर जवळ एक अपघात झाला आहे. रिक्षा, टेम्पो आणि कारचा हा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. महड फाटानजीक रिक्षा टेम्पो पलटी झाल्याने वाहने बाजूला करण्यात आली. जखमींना खालापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. उमराणेजवळ 3 एसटी बसेस फोडल्या. मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ 3 एसटी बसेस फोडल्या. एक चालक जखमी, सर्व प्रवासी सुरक्षित आहे. नाशिकहून मालेगावकडे जाताना, धुळेहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून ग्रामीण पोलिसांनी 600 पोलिसांचा बंदोबस्त देऊनही दगडफेक करण्यात आली आहे. नाशिकच्या 1 नंबर डेपोतून दिवसभरात 33 बस बाहेर पडल्या. दिवसभरात 106 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
राज्यातील ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता उद्या मुख्यमंत्री सर्व विभागाची बैठक करणार आहेत. राज्यातील शाळा सुरु करायच्या की नाही यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
31 ऑक्टोबरला झालेला आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. आरोग्य विभागाच्या गट ड परिक्षेचा पेपर परिक्षेआधी फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 845 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4569 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
मुंबईच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एक जरी रुग्ण सापडला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. तसा निर्णय पालिकेने घेतला आहे.
अभिनेता सलमान खानचा अंतिम चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान मालेगावच्या सुभाष चित्रपट गृहात हा चित्रपट लागला असता शुक्रवारी रात्री शेवटच्या शो दरम्यान काही सलमान चाहत्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
सलग सुटीमुळे शेगाव येथे भाविकांची गर्दी
तीन दिवसांचे ऑनलाइन दर्शन पासेस हाऊसफुल्ल.
शेगावात भाविकांच्या गर्दीने स्थानिक व्यावसायिक आनंदात.
ऑनलाइन दर्शन पास बंधनकारक , दररोज फक्त नऊ हजार भाविकानाच दर्शन व महाप्रसादाचा लाभ.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सवाई गंधर्व संगीत महोत्सव भरवण्यास राज्य सरकारची परवानगी असल्याचं स्पष्ट केलय. त्याचबरोबर एक डिसेंबर पासून नाट्य आणि चित्रपटगृहांमधे प्रेक्षक संख्येचे कोणतेही बंधन असणार नाही, म्हणजे शंभर टक्के क्षमतेने सभागृहात लोकांना प्रवेश देता येईल असंही स्पष्ट केलंय.
अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सवाई गंधर्व संगीत महोत्सव भरवण्यास राज्य सरकारची परवानगी असल्याच स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर एक डिसेंबर पासून नाट्य आणि चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षक संख्येचे कोणतेही बंधन असणार नाही. म्हणजे शंभर टक्के क्षमतेने सभागृहात लोकांना प्रवेश देता येईल असही स्पष्ट केलं आहे.
29 नोव्हेंबरला धिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवरचा ट्रॅक्टर मार्च किसान मोर्चाकडून तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत, सन्मानजनक पद्धतीने सरकारने चर्चा पुन्हा सुरू करावी, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा यावर सरकारला वेळ द्यावा. 4 डिसेंबरला पुढचं धोरण ठरवण्यात येणार आहे.
ओमीक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज. राज्याला अधिकार नसल्याने केंद्राकडे आम्ही यासंदर्भात मागणी देखील केलीय. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दरहिन्याला 100 सॅम्पल घेऊन म्युटेशनची तपासणी करण्यात येते. ओमीक्रोनला घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घ्यावी लागेल. ओमीक्रोनचे महाराष्ट्रात तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे. मात्र उद्या सायंकाळी मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.
बंगलोर - पाटणा गो एअरवेजचे फ्लाईट तांत्रिक बिघाडामुळे नागपूर विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लँड केले, विमानाचे सुखरूप लँडिंग, विमानात चालक दलासह 135 प्रवाशी होते, सर्व प्रवाशी सुरक्षित...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने अजून निर्णय बदलावा ....बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत. अडीच वर्षाचा जो फॉर्मूला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही... अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प, कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प, वाहन चालक यांमधून नाराजीने संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय
कुर्ला परिसरात वीस वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या, कुर्ल्याच्या HDIL कंपाउंडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर मृतदेह सापडला, पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
मावळ तालुक्यात आज सकाळी दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला. खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती. तेंव्हा कान्हे फाटा येथे हा अपघात झाला. या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप गाडी घुसल्याने 15 ते 20 वारकरी जखमी झालेत. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडगाव मावळ पोलीस तपास करतायेत.
देगलूर तालुक्यातील कामाजीवाडी येथे भूगर्भातून गूढ आवाजामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण. देगलूर तालुक्यातील कामाजीवाडी येथे काल संध्याकाळी भूगर्भातून आवाज येत असल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊन रात्र रस्त्यावर काढावी लागलीय .या बाबत गावकऱ्यांनी नियंत्रण कक्षास कळविले असून,भूकंपमापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 1.5 रिष्टर स्केल एवढी असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. विजयकुमार यांनी नियंत्रण कक्षास कळविले आहे.
नागपूर पोलिसांचा हवाला व्यवसाय करणाऱ्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक...
नागपूरच्या इतवारी परिसरातील मस्कासाथ बाजारात नागपूर पोलिसांनी टाकली धाड...
भुतडा बिल्डिंग तसेच गणेश टावर या दोन इमारतींमध्ये जोन 3 चे डीसीपी गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात सध्या धाड कारवाई सुरू आहे...
या इमारतीमध्ये काही खाजगी लॉकर्स असून त्यामध्ये हवाला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने रोकड लपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...
त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली आहे...
आतापर्यंत दोन लॉकर्स उघडण्यात आले असून त्यामधून 44 लाख रुपयांची रक्कम जप्त झाली आहे.. तर त्याठिकाणी असलेले इतर अनेक खाजगी लॉकर्स उघडल्यानंतर हवाला व्यवसायाची ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे..
ही सर्व रक्कम बेहिशेबी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिली आहे...
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावरील ED ची कारवाई प्रकरण
पथकाकडून 18 तास तपासणी केल्यानंतर मध्यरात्री पथक 2 वाजता रवाना.
आज पुन्हा ED चे पथक चौकशी करणार, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पथक चौकशी साठी येणार
रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरून ED चे काल सकाळी 8 वाजल्या पासून अर्जुन खोतकर यांच्या दर्शना निवस्थानी तसेच ते सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती छापा टाकला होता...
या तपासणी मध्ये अर्जुन खोतकर यांची रात्री ED अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली..
12 जणांच्या पथकाने काल छापा टाकला होता..
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात घडलाय. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रस्ता ओलंडणाऱ्या नागरिकांना अज्ञात वाहनानं धडक दिलीय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींवर दौंड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक मुलगा, एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे.
परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी
वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत 50 लाख रुपये द्या अन्यथा आर .डी .एक्स ने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्त च्या नावाने आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर डी एक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.
राज्यात आतापर्यंत 37 अंशतः डेपो सुरू
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय. याचपार्श्वभूमीवर राज्यातील 37 अंशतः डेपो आता सुरू झाल्याची माहिती समोर आलीय.
कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
राज्यात कोरोनामुळे निधन झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द
परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले. परंतु कोर्टाने दोन अटी देखील घातल्या आहेत. जेव्हा जेव्हा तपस अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि 15 हजाराचा पर्सनल बॉण्ड भरावा लागणार आहे. त्यामुळे परमवीर यांना सध्या तरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -