Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 26 Nov 2021 10:53 PM
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात घडलाय. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रस्ता ओलंडणाऱ्या नागरिकांना अज्ञात वाहनानं धडक दिलीय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींवर दौंड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक मुलगा, एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे. 

परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी

वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे  आले आहेत 50 लाख रुपये द्या अन्यथा आर .डी .एक्स ने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र  मुख्य विश्वस्त च्या नावाने  आले आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत.  त्यांना एक पत्र मिळालं ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे  आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर डी एक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.

एमपीएससीच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती  निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही  नमूद करण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 37 अंशतः डेपो सुरू

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.  राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय. याचपार्श्वभूमीवर राज्यातील 37 अंशतः डेपो आता सुरू झाल्याची माहिती समोर आलीय. 


 

91 टक्के ठाणेकर नागरिकांमध्ये आढळली प्रतिपिंडे

कोविड 19 च्या लसीकरणानंतर नागरिकांमध्ये प्रतिपिंडे (ॲण्टीबॉडीज) तयार झाल्या आहेत किंवा नाहीत याचे सिरोसर्व्हिलन्स सर्वेक्षण प्रातिनिधीक स्वरुपात महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार 91 टक्के ठाणेकर नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जरी नागरिकांमध्ये समाधानकारक प्रतिपिंडे तयार झाली असली तरी देखील नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर लावणे, वारंवार हात स्वच्छ करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे तसेच घरामध्ये व ऑफिसमध्ये खेळती हवा ठेवणे याचे पालन करण्याचे आवाहन महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत

राज्यात कोरोनामुळे निधन झालेल्या  मृत व्यक्तीच्या  नातेवाईकांना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यास  शासनाने मान्यता दिली आहे.

राज्य सरकारी दूध संघाचे दर वाढले, 1 डिसेंबरपासून दूध दरात वाढ


राज्य सरकारच्या आरे भूषण दुधाचे दर वाढले असून नवे दर 1 डिसेंबरपासून लागू होतील. 


आरे भूषण टोन दूध पुर्वीच एक लिटरसाठी 38 रुपये - नवीन दर 39 रुपये असेल
गाईंचे दुध 38 ऐवजी 39
आरे शक्ती गाय दूध 42 च्या ऐवजी 43 रुपये
फुल क्रिम दूध 47 ऐवजी 48

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात टाकण्यात आली नोटांची बंडले

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालया नोटांची बंडले टाकण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये घडला आहे. संबंधित अधिकार्‍याकडे लोक असेल ते सर्व, असं म्हणत अधिकार्‍याचे आणखी शंभर मध्ये गेला आणि त्याने तिथे नोटांची बंडले टाकले हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे प्रवीण कोरगंटीवार हे कार्यालयातून बाहेर निघून आले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. 

 अर्जुन खोतकरांच्या घरी आठ तासापासून ईडीची छापेमारी सुरू

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून ईडीची झाडाझडती सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून 12 जणांचे पथक अर्जुन खोतकर यांच्या दर्शना बंगल्यावर तपासणी करतंय. तर, दुसरीकडे खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये देखील छापासत्र सुरु आहे. जालना येथील रामनगर कारखान्याच्या व्यवहारा संबंधी ईडी कडून खोतकरांची विचारपूस होत असल्याची देखील माहिती मिळतेय. 

पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

पुण्यातील देहूमध्ये दोन सख्खे भाऊ पाण्यात बुडाले आहेत. इंद्रायणी नदीमध्ये ते पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. साहिल विजय गौड (वय 10)  आणि अखिल विजय गौड (वय 8) असे बुडालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मित्रांसोबत ही सख्खी भावंडं नेहमी नदी परिसरात खेळायला यायची. आज देखील वडील कामावर गेल्यानंतर ते मित्रांसोबत नदीलगत पोहचले. काही वेळाने पाण्यात उतरले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडाले. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु आहे. 

परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द

परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले. परंतु कोर्टाने दोन अटी देखील  घातल्या आहेत. जेव्हा जेव्हा तपस अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि 15 हजाराचा पर्सनल बॉण्ड भरावा लागणार आहे.  त्यामुळे परमवीर यांना सध्या तरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 

नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास

विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूरमधून काँग्रेसचा विजय होणार असल्याचा विश्वास काँग्रेस प्रवक्ते नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

कोल्हापूर: भाजप उमेदवार अमल महाडिक यांची विधान परिषद निवडणुूकीत माघार

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांची बिनविरोध निश्चित आहे. 

विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडीक उमेदवारी अर्ज मागे घेणार?अर्ज माघारीसाठी थेट दिल्ली वरून महाडिक कुटुंबीयांना फोन आल्याची सूत्रांची माहिती

विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडीक उमेदवारी अर्ज मागे घेणार?


अर्ज माघारीसाठी थेट दिल्ली वरून महाडिक कुटुंबीयांना फोन आल्याची सूत्रांची माहिती


राजकीय हालचाली गतिमान


निर्णयाबाबत महाडिक कुटुंबियांमध्ये महत्त्वाची बैठक सुरु


महाडिक कुटुंबीय काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष

Maharashtra ST Workers Strike Update : एसटी महामंडळ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा नांदेड जिल्ह्यात फोल 

एसटी महामंडळचे दहा हजार कर्मचारी वेतनवाढी नंतर कामावर रुजू झाल्याचा दावा राज्य सरकारने केला होता.त्यानंतर राज्यातील प्रत्येक आगरातून कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या पोलीस बंदोबस्तात सोडल्या गेल्याचा दावा सरकारने केला होता. परंतु सरकारने केलेला दावा नांदेड जिल्ह्यात फोल ठरल्याचे चित्र आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील नऊ आगारातील एकही एसटी महामंडळ कर्मचारी व तीन हजार दोनशे एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील डेपोतुन एकही एसटी अद्याप तरी बाहेर पडून रस्त्यावर धावली नाहीये. तसेच एसटी पोलीस बंदोबस्तात बाहेर सोडण्यासाठी कोणताही पोलीस बंदोबस्त नांदेड जिल्ह्यातील आगारात अद्याप तरी नाहीये .त्यामुळे एसटी कर्मचारी वेतनवाढी नंतर कामावर परतले हा सरकारचा दावा नांदेड जिल्ह्यात फोल ठरलाय.

ParamBir Singh Case Update: परमबीर सिंहांच्या वकिलाचा किला कोर्टात अर्ज, फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करण्यासाठी अर्ज

शिवसेना खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट प्रकरणी ईडीकडनं आरोपपत्र दाखल

शिवसेना खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट प्रकरणी ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत. 


ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं हे विचारपूर्वक रचलेलं षडयंत्र होतं. ट्रस्टमधून पैशांचा फेरफार करण्यासाठी हे करण्यात आलं होतं. जप्त करण्यात आलेली प्रॅापर्टी ट्रस्टमधून फेरफार करण्यात आलेल्या पैशातून विकत घेण्यात आली होती. 


ईडीने 11 मे रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधित लोकांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी भावना गवळी यांना तीन समन्स बजावण्यात आलीत. पण त्या चौकशीसाठी अद्याप हजर झालेल्या नाहीत.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद

बुलढाणा : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद. मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधाचा परिणाम. 80% व्यापाऱ्यांचे व्यवहार मलकापूर अर्बन बँकेवर अवलंबून असल्याची माहिती. निर्बंधांचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका. पुढील 30 तारखेपर्यंत बाजार समिती राहणार बंद.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (गुरुवारी) अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. चंद्रकांत पाटील मागे दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अमित शाह यांची भेट झाली नव्हती. पण काल चंद्रकांत पाटलांनी अमित शाह ायांची भेट घेतली. 


26 नोव्हेंबर 2008... मुंबईसाठी काळरात्र ठरलेला दिवस!

26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहे. तरिदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.


स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे. याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस?

Constitution Day : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...


1946 मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला. ब्रिटीश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटीश सरकार आणि भारताच्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने, संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत-बांग्लादेश सीमेवर भूकंपाचे धक्के

Earthquake : भारत आणि बांगलादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या आसपास भूकंपाचे धक्का बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. युरोपीयन-भूमध्य भूकंप केंद्राने (ईएमएससी) याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर पडली होती. हादरा जाणवल्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अनेक लोक रस्त्यावर येऊन थांबले होते. काही लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याचेही समोर आलेय. 


 





पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस; थरारक, वेदनादायी आठवणी कायम


26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहे. तरिदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.


स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे. याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.


26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.



Constitution Day : आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस? इतिहास आणि रंजक गोष्टी


Constitution Day : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...


1946 मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला. ब्रिटीश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटीश सरकार आणि भारताच्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने, संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.