Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिलं फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डर लॉन्च

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 25 Nov 2021 10:11 PM
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिलं फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डर लॉन्च

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिल्या फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डरचे लॉंचिंग आज करण्यात आले. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कास्टिंग यार्डमध्ये हे महत्वपूर्ण काम आज केले गेले. 40 मीटर लांबीचा हा अखंड तुकडा उचलून बुलेट ट्रेन साठी उभारण्यात आलेल्या पिलरवर आज ठेवण्यात आला. या प्रिकास्ट गर्डरचे वजन 970 मेट्रिक टन असून त्यामध्ये 390 घनमीटर काँक्रीट आणि 42 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार केलेला हा बॉक्स गर्डर आजपर्यंतचा भारतात बनवण्यात आलेला सगळ्यात जास्त वजनाचा गर्डर आहे. हा संपूर्ण गर्डर एकसंध असून त्याचा कोणताही भाग जोडण्यात आलेल्या नाही. येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन साठी अशाच प्रकारे पीलर्स उभारून त्यावर प्रिकास्ट बॉक्स गर्डर ठेवण्यात येतील.


 


 

लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती, त्रास होऊ लागल्यानं 17 कर्मचारी रुग्णालयात दाखल

लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती समोर आलीय. गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यामुळं 17 कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनानं घराडा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. तर कर्मचाऱ्यांपैकी एकाला चिपळूण मधील लाईफ केअर मध्ये केलं दाखल. रुग्णालयात दाखल झालेले सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 

लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती, त्रास होऊ लागल्यानं 17 कर्मचारी रुग्णालयात दाखल

लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती समोर आलीय. गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यामुळं 17 कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनानं घराडा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. तर कर्मचाऱ्यांपैकी एकाला चिपळूण मधील लाईफ केअर मध्ये केलं दाखल. रुग्णालयात दाखल झालेले सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 

बुलढाणा: चिखली येथील इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाच्या हत्या प्रकरणी तिघांना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मालकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय. जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी मोठ्या शिताफीने तापस चक्र फिरवून घटनेतील आरोपीना अटक करण्यात यश मिळविले आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया यांनी ही माहिती दिलीय.

पुण्यात गेल्या 24 तासात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुण्यात गेल्या 24 तासात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 4,96,326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 864 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4411 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

गेवराई पोलिसांनी पकडल्या एकाच नंबरच्या आठ रिक्षा, गुन्हा दाखल

गेवराई शहरातील रस्त्यावर एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. या आठही रिक्षांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईची प्रक्रिया गेवराई पोलीस ठाण्यात चालू आहे. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. याची कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे दिसून आले. परंतु डीपी पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत असून त्यांनी केलेल्या कारवाईत (एमएच-23,टीआर-311) क्रमांकाच्या आठही रिक्षा पकडण्यात आल्या आहेत. या एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज कुंद्रासह सहाजणांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला

राज कुंद्रासह सहाजणांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला. सहा जणांत शर्लिन चोप्रासह पूनम पांडेचाही समावेश आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवडे अटकेपासून संरक्षण. पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं  साल 2020 मधील गुन्हा नोंदवलेला आहे, 

माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे, परमबीर सिंह यांची एबीपीला माहिती

परमबीर सिंहांनी एबीपी माझाशी  बोलताना सांगितलं की, "न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल."

अण्णा हजारे रुग्णालयात भरती, हृदयात छोटेसे ब्लॉकेज आढळून आले

अण्णा हजारेंना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे भरती करण्यात आलं आहे . अॅंजिओग्राफीसह त्यांच्या इतर तपासण्या करण्यात आल्या असून अण्णांच्या हृदयात छोटेसे ब्लॉकेज आढळून आलं आहे.  मात्र अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसून औषधांनी ते ब्लॉकेज दूर करण्यात येणार असल्याचं रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रांट यांनी सांगितलं आहे.

एसटी प्रवासासाठी मिळणार पोलिसांचा बंदोबस्त, नाशिकमध्ये 600 हून अधिक पोलीस होमगार्ड तैनात 

एसटी प्रवासासाठी मिळणार पोलिसांचा बंदोबस्त, नाशिकमध्ये 600 हून अधिक पोलीस होमगार्ड तैनात 


- जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गांवर उद्यापासून पोलीस तैनात राहणार


प्रमुख मार्गावर राहणार पोलिसांची गस्त


- नाशिक जिल्ह्यातील st च्या सुरक्षेसाठी 600 हुन अधिक पोलीस होमगार्ड  तैनात 


- कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा इशारा

अंबरनाथच्या पालेगाव परिसरात आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह

अंबरनाथ: आनंद सागर रिसॉर्टजवळ पाईपलाईनजवळ एका अज्ञात महिलेच्या मृत कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलाय. पोलिसांकडून मृतदेह कुणाचा आहे, तसंच ही हत्या आहे की आत्महत्या आहे? याचा तपास सुरू आहे. 

एक डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरू होणार आहे. 

एक डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरू होणार आहे. 

मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांचा अर्ज मागे घेतला आहे.  मुंबईतून भाजपचे राजहंस सिंग, तर सेनेचे सुनील शिंदेंची यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार

आर्थिक दृष्ट्या दुर्बल आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार आहे. सध्या ही मर्यादा ईडब्ल्यूएस गटासाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची आहे.  पुढच्या चार आठवड्यात याबाबतची नवी मर्यादा केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला कळवणार  मोदी सरकारने मेडिकल प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा मध्ये 27 टक्के ओबीसी आणि 10टक्के  आर्थिक आरक्षण लागू केलं आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणांकडून पराग समूहाच्या दूध डेअरीवर छापा, दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची डेअरी असल्याची माहिती

केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा पुण्यात दाखल झालेत. यावेळी पराग समूहाच्या दूध डेअरीवर हा छापा पडलाय. आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन दूध डेअरी आणि पराग दूध डेअरीची तपास यंत्रणांकडून तपासणी सुरू आहे. या डेअरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार; खासदार संभाजीराजे यांची माहिती

President Ramnath Kovind Raigad Visit : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. 


राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."


आरबीआयकडून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवहारावर निर्बंध

बुलढाणा : आरबीआयकडून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवहारावर निर्बंध लावण्यात आले आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने ग्राहकांना खात्याकडून 10 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई, सेविंग आणि करन्ट खात्यांसाठी निर्णय लागू करण्यात आला आहे. रिझर्व बॅंकेकडून पुढील 6 महिन्यांपर्यंत निर्बंध आणत असल्याचं परिपत्रक जारी आहेत. 



राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार, खासदार संभाजीराजेंची ट्विटरवरुन माहिती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे. 





पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 25 November : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्रानं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करत सर्वसामान्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर दिलासा दिला होता. त्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी ऐतिहासिक उंची गाठली असून देशातील सर्व महानगरांतील किमती स्थिर आहेत. 


IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.  महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 


ST Workers Strike : एसटी संपाबाबत सरकारची घोषणा; एबीपी माझाचा अंदाज ठरला खरा, संप मिटणार?


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात आला असून एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारणतः ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. एबीपी माझानं यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच वृत्त प्रकाशित केलं होतं. गेल्या बऱ्याच काळापासून एबीपी माझानं एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. अखेर एबीपी माझानं दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु, असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र अद्याप संप मागे घेतलेला नाही. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असं आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय, अनिल परबांची घोषणा


एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारण: ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.