Maharashtra Breaking News LIVE Updates: अकोल्यात उद्यापासून दोन दिवस संचारबंदी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 24 Nov 2021 09:22 PM
अकोल्यात उद्यापासून दोन दिवस संचारबंदी

अकोल्यात 25 ते 27 नोव्हेंबरपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे.

साईभक्तांना आनंदाची बातमी, 26 नोव्हेंबर पासून प्रसादालाय होणार सुरू

साईभक्तांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आलीय. जिल्हा प्रशासनानं परवानगीनंतर शिर्डीतील साईमंदिराचे येत्या 26 नोव्हेंबरपासून प्रसादालाय होणार सुरू होणार आहे.

अकोल्यातील 'ईगल इन्फ्रा कंपनी'ला भिषण आग, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू 

अकोला शहरालगतच्या रिधोरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील 'ईगल इन्फ्रा कंपनी'ला भिषण आग लागल्याची माहिती समोर आलीय. आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू. तीन जण गंभीर जखमी. कंपनीत तयार काँक्रीट तयार करण्याचं काम चालतं. कंपनीतील डांबर आणि ऑईलच्या साठ्याला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. वेल्डिंग करतांना वेल्डिंग मशिनमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

झारखंड एटीएसची बुलढाणा जिल्ह्यातील टूनकी येथे मोठी कारवाई

झारखंड एटीएस च्या पथकाने केलेल्या गोपनीय कारवाईत 14 देशी पिस्टल व 160 जिवंत काडतुस जप्त. झारखंड एटीएसच्या आयपीएस विश्वजित कुमार यांच्या पथकाची कारवाईत मध्यप्रदेशातील पाचोरी येथील तीन युवक अटक झालीय. एटीएस तीन युवकांना अटक करून झारखंडला गेलीय. बनावट ग्राहक पाठवून मध्यप्रदेशातील तिघांना शस्त्र घेऊन बुलढाण्यातील टूनकी येथे बोलावून कारवाई करण्यात आलीय. 

चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर महिलेचा मृत्यू

चंद्रपूरच्या पोंभूर्ण तालुक्यातील कसरगट्टा येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. देवीबाई हनमंतु धोढरे (वय, 50) असे मृत महिलेचं नाव आहे. देवीबाई या शेतात कापूस वेचणीच्या कामसाठी गेली होती. त्यावेळी वाघानं तिच्यावर हल्ला केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरलीय. 

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुदतीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईत २३६ वॉर्डच्या पुर्नरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार वाढीव 9 वॉर्डच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्याची प्रतिक्षा आहे. राज्यपालांच्या सहीला वेळ लागला तरी आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करुन मुंबईतल्या वॉर्डची संख्या 227 वरुन 236 वर नेता येणार आहे. 


मुंबईतले नवे नऊ वॉर्ड कोणते?


पश्चिम उपनगरे येथे 4 ते 5 वॉर्ड वाढणार


पूर्व उपनगरांत 3 ते 4 वॉर्ड वाढणार


मुंबई शहरात एक वॉर्ड वाढणार


ज्या ठिकाणी नव्या इमारती, वस्त्या ,तसेच लोकसंख्येची घनता वाढलीय त्या ठिकाणी नवे वॉर्ड तयार होणार...


ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न मुंबई महापालिका निवडणूकीत मात्र अडथळा ठरु शकत नाही...कारण, मुंबईत ओबीसींकरता राखिव सीटची संख्या मर्यादित आहे...

चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असेल. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल. 
पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी: धुळे- 5ब,  अहमदनगर- 9क, नांदेड वाघाळा- 13अ आणि सांगली मिरज कुपवाड- 16अ

पुण्यात दिवसाढवळ्या धाडसी दरोडा

पुण्यात आणखी एक दिवसाढवळ्या धाडसी दरोडा पडलाय. दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात एक गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. अनंत पतसंस्थेत दोन अज्ञात घुसले, मॅनेजरकडे पैश्याची मागणी केली. नकार देताच त्यांच्यावर गोळीबार केला आणि दोन ते अडीच लाखांची रोकड लंपास केली. जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात ही धक्कादायक घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. नारायणगाव पोलीस त्या चोरट्यांच्या शोधात आहेत, तर जखमीला रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या महिन्यात शिरूर तालुक्यातील एका बँकेत दिवसाढवळ्या दरोडा पडला होता.

Cabinet Meeting: तीन कृषि कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर, केंद्रीय कॅबिनेटमध्ये निर्णय

Cabinet Meeting: तीन कृषि कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर, केंद्रीय कॅबिनेटमध्ये निर्णय

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या नव्या घरी जाणार, पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व


विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या नव्या घरी जाणार, शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्यावर घेणार राज ठाकरेंची भेट 


आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व, राज ठाकरेनी हिंदुत्वाची कास पकडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस त्यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेत असल्याने चर्चेला उधाण

कोविड मृतांच्या प्रत्येक कुटुंबियाला चार लाख रुपये द्या, काँग्रेसची केंद्र सरकारकडे मागणी

कोविड मृतांच्या प्रत्येक कुटुंबियाला चार लाख रुपये द्या, काँग्रेसची केंद्र सरकारकडे मागणी, सुप्रीम कोर्टाने प्रत्येक कुटुंबाला मदत शक्य नाही असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारला फटकारत किमान 50 हजार रूपये दिलेच पाहिजे असं म्हटलं होतं

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिवाजी पार्कवर व्हर्चुअल संवाद,संवादाला परवानगी नाकारुन भाजपची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिवाजी पार्कवर व्हर्चुअल संवाद


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त शिवाजी पार्कवर स्क्रीन लावुन साधला जाणार व्हर्चुअल संवाद


मात्र, महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या  व्हर्चुअल संवादावरुन सेना-भाजप मध्ये राजकारण तापण्यास सुरुवात


शिवाजी पार्क वर मोदींच्या व्हर्चुअल संवादाला परवानगी नाकारुन भाजपची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न...


विधानपरिषद निवडणूकीच्या आचारसंहितेचं कारण पुढे करत व्हर्चुअल संवादाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता...

आमदार बाबाजानी दुराणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, स्थानिक गटबाजी वाढल्याने निर्णय 

आमदार बाबाजानी दुराणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे सोपवला राजीनामा 


स्थानिक गटबाजी वाढल्याने निर्णय 


बाबाजानी काही दिवसांपासुन पक्षातील काही लोकांवर नाराज

नकली नोटा छापण्याच्या कारखान्यावर धाड, मुंबईच्या पायधुनी परिसरात मोठी कारवाई

मुंबईच्या पायधुनी परिसरात मोठी कारवाई, नकली नोटा छापण्याच्या कारखान्यावर धाड, पोलिसांनी 1 लाख 60 रुपयांच्या नोटा केल्या जप्त, मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, आरोपी शब्बीर हासम कुरेशीला NDPS अंतर्गत अटक, प्रिंटर, कॉम्प्यूटर आणि नकली नोटा बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त 

हिंगोली जिल्ह्यात धुक्याची दाट चादर





हिंगोली जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवस लगातार बरसलेल्या हलक्या आणि मध्यम सरीनंतर आज बुधवारची सुरूवात पहाटेच्या दाट धुक्याने झाली. जिल्ह्याच्या बहुतांश ग्रामीण भागामध्ये धुक्याची चादर पसरली होती. शेतामधील उंच-उंच झाडे धुक्यावरून डोकावत होते. अनाहूतपणे आलेल्या या धुक्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जसा जसा सूर्य वर येऊ लागला तसतशी धुक्याची चादर अधिक ठळकपणे दिसू लागली. हे धुके एव्हढे दाट होते की त्या आड सूर्यनारायण ही दिसत नव्हते. आज नेहमीपेक्षा वातावरण आल्हाददायक जाणवत होते. पडलेल्या धुक्यामुळे भाजीपाला वर्गीय पिकासह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, काही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





आजपासून संचारबंदीतून अमरावतीकरांना मोठा दिलासा

आजपासून संचारबंदीतून अमरावतीकरांना मोठा दिलासा


अमरावती शहरातील आजपासून सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची मुभा...


रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार...


आधी सकाळी 7 ते रात्री 9 होती वेळ...


पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचा आदेश...

वाशिम जिल्ह्यात दाट धुक्याची चादर

वाशिम जिल्ह्यात आज सकाळी दाट धुक्याची चादर पहावयास मिळाली  गेल्या काही दिवसां पासून ढगाळ वातावरण आणि त्यात पडलेल्या अवकाळी पावसा नंतर  धुकं पडल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय पडलेल्या धुक्या मुळे तूर हरभरा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे   पडलेल्या धुक्या मुळे 30 फुटा च्या समोर काहीही दिसत नसल्याचं चित्र होत

शरद पवार आज कराड दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार आज कराड येथील प्रीतीसंगम घाटावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.. गुरुवारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 38 वी पुण्यतिथी आहे, मात्र आज ते सातारा दौऱ्यावर असल्याने ते आजच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर वेणूताई चव्हाण ट्रस्टच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. बैठकी नंतर दुपारी महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

पार्श्वभूमी

तुम्हाला लाज वाटत नाही का? ओवेसींचा हल्लाबोल
शिवसेनेला तुम्ही सेक्युलर बनवलं आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात आणि म्हणतात सेक्युलरिझम वाचवायचे आहे. उद्धव ठाकरे विधानसभामध्ये मंदिर आणि मशिदीबद्दल बोलतात. तुम्हाला लाज वाटत नाही? मुसलमानानी आता तरी किमान यांच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्या ऐका, आपल्या मताचा योग्य वापर करा. आता तरी यांना ओळखा. उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मस्जिद आम्ही पडली तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही? आपला परिवार वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी यांनी शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन केली. आणि सेक्युलॅरीजमला जमिनीत पुरून टाकलं, असं ओवेसी म्हणाले.  


राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाशिक जलसंपदा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भोम्बरे यांची दोन दिवसांची केली जाणार पगार कपात. बच्चू कडु यांच्या झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. रजिस्टरवर सह्या आहेत मात्र अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसून आलेय. कामांच्या, हजेरीच्या नीट नोंदी ठेवल्या जात नाहीत,  आमदार खासदारांच्या अनेक कामांमध्येही गैरकारभार होत असल्याच समोर आलं आहे.


साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या पराभवामुळे समर्थकांनी कार्यालय फोडलं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला पराबवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध निवडून आल्या तर 10 जागांवर झालेल्या मतदानाची मोजणी आज पार पडतेय. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं पॅनल आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.