Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 23 Nov 2021 08:15 AM
तुम्हाला लाज वाटत नाही का? ओवेसींचा हल्लाबोल

शिवसेनेला तुम्ही सेक्युलर बनवलं आणि आम्हाला जातीयवादी म्हणतात. तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात आणि म्हणतात सेक्युलरिझम वाचवायचे आहे. उद्धव ठाकरे विधानसभामध्ये मंदिर आणि मशिदीबद्दल बोलतात. तुम्हाला लाज वाटत नाही? मुसलमानानी आता तरी किमान यांच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्या ऐका, आपल्या मताचा योग्य वापर करा. आता तरी यांना ओळखा. उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मस्जिद आम्ही पडली तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही? आपला परिवार वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी यांनी शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन केली. आणि सेक्युलॅरीजमला जमिनीत पुरून टाकलं, असं ओवेसी म्हणाले.  

शिवसेना भाजपसारखी जातीवादी - ओवेसी

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हला भाजपचीची बी टीम म्हटलं. जेव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेव्हा हेच लोक एकत्र आले, आणि म्हटले आपण सगळे एक आहोत. यांनी मुसलमानांना धोका दिला. शिवसेना सेक्युलर पक्ष नाही. शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजप सारखेच जातीयवादी आहे. शिवसेना खरेच सेक्युलर आहे का?  राहुल गांधी आणि शरद पवार यांनी उत्तर द्यावं.


1992 मध्ये काय झालं हे तुम्ही विसरलात का? केवळ तुमचं परिवार आणि कुटुंब वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत अजित पवार 48 तासाचे नवरदेव देखील झाले होते. फडणवीस आणि अजित पवार यांनी लग्न केलं, आता यांच्यात वधू कोण माहिती नाही, हे शरद पवार सांगतील.  फाईल्स गायब होतात आणि मग पुन्हा सेक्युलर होतात. उद्धव ठाकरे छान आहेत म्हणून त्यांच्या सोबत जातात. असं ओवेसी म्हणाले.

11 डिसेंबर रोजी मुंबईत जाणार आहोत - असदुद्दीन ओवेसी

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्हाला मैदानात आणि हॉलमध्ये परवानगी दिली नाही. पण येणाऱ्या काळात आम्ही मैदानावर सभा घेऊ. 11 डिसेंबर रोजी मुंबईत अरक्षणासाठी तसेच वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहे. याआधी कोरोनाचं कारण देत सभेला परवानगी नाकारली. पण 11 डिसेंबर रोजी मुंबईत जाणार आहे.  लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एसआयएसला मत देऊ नका, भाजपला मत देण्यासारखे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणयाचे एमआयएमला मत देऊ नका शिवसेना आणि भाजपला फायदा होईल. त्याचा परिणाम देखील झाला, सोलापुरात काहींनी त्याला खरं समजलं, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले. 

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश.

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाशिक जलसंपदा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भोम्बरे यांची दोन दिवसांची केली जाणार पगार कपात. बच्चू कडु यांच्या झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. रजिस्टरवर सह्या आहेत मात्र अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसून आलेय. कामांच्या, हजेरीच्या नीट नोंदी ठेवल्या जात नाहीत,  आमदार खासदारांच्या अनेक कामांमध्येही गैरकारभार होत असल्याच समोर आलं आहे.

Angarki Sankashti : अंगारकी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वर गणपतीला गर्दी

Angarki Sankashti : आज अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजुरेश्वर गणपतीला दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. गणपतीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेला राजूरचा राजुरेश्वर गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मध्यरात्री पासून विदर्भ मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येऊ लागलेत, यावेळी बस बंद असल्याने पंचक्रोशितील गणेश भक्त पायी पायी दर्शनासाठी येत आहेत. 

सोलापुरात ओवेसींना 200 रुपयांचा दंड

एमआयएमचे खासदार असुद्दुदीन ओवेसी विनानंबर प्लेटच्या गाडीतून सोलापूरात आले, सोलापुर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना नियमांप्रमाणे 200 रुपयांचा दंड ठोठावला. गाडीच्या समोरच्या भागाला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांची ही कारवाई केली. सेंट्रल मोटार व्हेईकल रुल 50/177 नुसार दंडात्मक कारवाई

साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या पराभवामुळे समर्थकांनी कार्यालय फोडलं

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला पराबवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध निवडून आल्या तर 10 जागांवर झालेल्या मतदानाची मोजणी आज पार पडतेय. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं पॅनल आहे. तर महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत.

एसटी संप पुण्यात PMPML च्या पथ्यावर; उत्पन्नात भरगोस वाढ

एसटी कर्मचारी संपामुळे पुण्यात पीएमपीएमएल बस सेवेला चांगला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे... कारण PMPML च्या उत्पन्नात मोठी वाढ झालीय... गेल्या पंचवीस दिवसात पीएमपीएलने ग्रामीण भागातील मार्गांवर तब्बल सव्वा कोटी रुपये कमावलेत... पुणे शहरासह विशेषतः ग्रामीण भागात पीएमपीएल सेवेला मोठा प्रतिसाद मिळतोय... शिवाय एसटी संप सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बस सोडल्या जात आहेत... विशेष म्हणजे पुणे जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांपैकी ११ तालुक्यात बससेवा पुरवली जात आहे.

रिलायन्स पीक विमा कंपनीच्या राज्य समन्वयकांना अटक करा,  काँग्रेसची मागणी 

परभणीसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या २ राज्य समन्वयकांवर गुन्हा दाखल झाला असुन दोन्ही समन्वयकांना तात्काळ अटक करण्याची मागणी परभणी जिल्हा  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची भेट घेत जिल्ह्यातील खरीप पिकांच्या विमा रक्कमेच्या संदर्भात प्रशासनाने बोलावलेल्या बैठकांना
रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी गैरहजर राहतात तसेच पीक विम्याच्या वितरणा संदर्भातही निष्काळजीपणा केला आहे.परभणी जिल्ह्यात ५२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतरही मुजोर रिलायन्स विमा कंपनीने विमा रक्कम वर्ग करण्यासाठी टाळाटाळ केली.या प्रकरणात प्रशासनाने कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तेव्हा गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही राज्य समन्वयकांना अटक करून शेतकऱ्यांची विमा रक्कम अदा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली आहे.

मनमाडचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बोधक यांना मारहाण

मनमाडचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बोधक आणि त्यांच्या कुटुंबियांना मागील भांडणाची कुरापत काढून शाकुंतल नगर भागात राहणाऱ्या 14 जणांनी लाथा-बुक्यांसह लाठ्या -काठ्या, लोखंडी गजाने जबर मारहाण केली.या मारहाणीत बोधक यांचा हात  फ्रॅक्चर झाला तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यांच्या दोघा मुलांही जबर मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार करण्यात येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

सांगली जिल्हा बॅंक निवडणूक निकाल

सांगली जिल्हा बॅंक : 


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक कपबशी चिन्हावर तर  भाजपने शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून विमान चिन्हावर निवडणूक लढवली आहे. 


मिरज सोसायटी गटात महाआघाडीचे विशाल पाटील हे 52-16 विरुध्द मतांनी विजयी. भाजप पॅनेलचे उमेश पाटील पराभूत.


जत सोसायटी गटात काँग्रेसला धक्का. विद्यमान संचालक तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा पराभव. 45-40मतांनी भाजपचे प्रकाश जमदाडे विजयी. 


आटपाडी सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील 40-29 मतांनी विजयी. भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख पराभूत.


कवठेमहांकाळ सोसायटी गटात महाआघाडीतील शिवसेनेचे अजितराव घोरपडे 54-14 मतांनी विजयी.. अपक्ष विठ्ठल पाटील पराभूत 


तासगाव सोसायटी गटात महाआघाडीचे बी एस पाटील विजयी...41-23 मतांनी विजयी...भाजपचे  सुनिल जाधव व विद्यमान संचालक प्रताप पाटील पराभूत


सोसायटी अ गटातून महाविकास आघाडीचे काँगेसचे उमेदवार विशाल पाटील विजयी.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ऋषिकेश देशमुखचा सक्रिय सहभाग

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात माजी ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी  मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा आरोप सक्त अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीनं विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऋषीकेश यांनीही या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाला ईडीनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ऋषिकेशचाही सक्रिय सहभाग आहे. मनी लौण्ड्रिंगचा पैसा हा विविध कंपन्यांना दान म्हणून दाखविण्यात त्यानंच देशमुख यांना मार्गदर्शन केलंय, असा गंभीर आरोप यामध्ये केलेला आहे. जर त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला तर तो या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे प्रभावित करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला हा जामीन मंजूर करू नये, असं ईडीने यात म्हटलेलं आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जातात असं प्राथमिक चौकशीमध्ये उघड झालेलं आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक किंवा भागधारक आहे. या कंपन्यांचा व्यवहार संशयास्पद आहे, असा ईडीचा दावा आहे. मात्र ईडी जाणीवपूर्वक आपल्याला या प्रकरणात अडकवत आहे. तसेच तपासयंत्रणेचा पूर्वग्रहदूषित पध्दतीने तपास सुरू आहे असा दावा ऋषिकेश यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे. अर्जावर आता 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

बंडगार्डन पोलिसांकडून चोरट्यास अटक, 13 दुचाकी जप्त 

 "लॉकडाऊन'मध्ये हातचा रोजगार गेला, त्यानंतर पैसे कमाविण्यासाठी त्याने थेट वाहनचोरीचाच मार्ग निवडला. एवढेच नव्हे, तर ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्यानंतर त्याने दुचाकी चोरीला सुरूवात केली. या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातुन 13 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अख्तर चांद मुजावर (वय 44, रा.बनवडी, कोरेगाव, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस... पहाटे पासून विजांच्या कडकडाटासह सुरू झाला पाऊस, गेल्या 3-4 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते मात्र पाऊस होत नसल्याने होता प्रचंड उकाडा, या मुसळधार पावसाने काढणीस आलेलं धानपिक आणि तुरीला नुकसान होण्याची शक्यता

दोन गटात तलवारीने मारहाण, पाच ते सहा जण जखमी

हिंगोलीच्या कळमनुरी शहरात रात्री उशिरा नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने मारहाण झालीय, यामध्ये दोन्ही गटातील एकूण पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दंगलखोर शहरात नंग्या तलवारी हातात घेऊन  भर रस्त्यात दहशत निर्माण करत असल्यामुळे तेंव्हा   शहरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कळमनुरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. जखमींवर कळमनुरी येथील  उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Latest News : केडीएमसीत सेनेचा भाजपला धक्का; पाच ते सहा विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
केडीएमसीत सेनेचा भाजपला धक्का. 'मिशन लोटस'ला शिवसेनेच्या 'मिशन धनुष्यां'नं टक्कर दिली आहे. केडीएससीमध्ये शिवसेनेचं 'मिशन धनुष्य' सुरु झालं असून केडीएससीचे भाजपचे पाच ते सहा विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. केडीएमसी (Kalyan-Dombivli Municipal Corporation) निवडणुकांआधी नगरसेवकांचा भाजपला रामराम. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 



बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसासाठी 144 कलम लागू...
21 ते 23 तारखे दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या तीन दिवसात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, रैली, धरणे , आदी एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त जमा होता काम नये , हा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात करण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिखाधिकारी यांनी जिल्ह्यात 144 कलम लागून करण्यात आले असून जर आदेशाचे कोणी उलनघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Madhavi Gogate Passes Away : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसह अनेक हिंदी मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. याशिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. सध्या 'स्टार प्लस' या हिंदी वाहिनीवर गाजत असलेल्या 'अनुपमा' या मालिकेशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. 

 

पुसदमध्ये तरुणाची हत्या
पुसदच्या मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या खुल्या मैदानात घडले हत्याकांड. सैय्यद मोबीनोद्दीन खतीब (वय 34 वर्ष अंदाजे) रा. वसंत नगर,पु सद असे मृतकाचे नाव. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पुसद पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे





 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.