Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवसेना आमादार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकर एवढ मेहरबान का?

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 11 Jan 2022 11:32 PM
शिवसेना आमादार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकर एवढ मेहरबान का?

प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीच्या दंड माफ करण्याचा प्रस्ताव उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे. फक्त दंडच माफ नाही तर महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेश ही मंत्रीमंडळ बैठकीतून महापालिकेतुन दिला जाणार आहे.  राज्य सरकारचा हा गजब निर्णय आहे. 

स्कूल बस मालकांना मोठा दिलासा, वार्षिक वाहन करात मिळणार 100 टक्के सवलत

स्कूल बस मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन काळातील वार्षिक वाहन करात 100 टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे.  मंत्रीमंडळ बैठकीत उद्या होणार निर्णय होणार आहे. 
गेल्या अनेक दिवसांपासून स्कूल बस बंद आहेत.

शरद पवारांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरील राष्ट्रवादीची बैठक संपली

पाचपैकी तीन राज्यांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एक बैठक सुरु होती. ती बैठक आता संपली असून निवडणुकीतील रणनीती काय असेल यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.


 

राजमाता जिजाऊंच्या 324 व्या जयंती निमित्त जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सवाचे आयोजन

राजमाता जिजाऊंच्या 324 व्या जयंती जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. दहा हजार दिव्यांची आरास करत जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजे सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई करण्यात आली आहे. दीपोत्सव कोरोनाचे नियम पाळून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. 

अमरावती जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

अमरावती जिल्ह्यात आज 91 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील एक आठवड्यापासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

सांगली जिल्ह्यात आज 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात आज 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या सांगलीत 955 सक्रिय रुग्ण आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक सुरू

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक सुरु आहे. अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित आहेत.

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 98 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 98 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या चंद्रपूरमध्ये 507 सक्रिय रुग्ण आहेत. 

यवतमाळ येथील उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गोळीबार

यवतमाळमधील उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हनुमंत धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. डॉ हनुमंत धर्मकारे यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वार व्यक्तीने गोळीबार केल्याने डॉक्टर धर्मकारे यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर उत्तरवार रुग्णालयात उपचार केले जात आहेत. 

गोव्यात भाजपच येणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीने जनमताची चोरी केली ती गोव्यात होऊ देणार नाही, गोव्यात भाजपची सत्ता येणार असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 


 

तळकोकणातील हापूस आंबा निसर्गाच्या अवकृपेने धोक्यात

कोकणची अर्थव्यवस्था असलेला हापूस आंबा संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील देवगडच्या किनारपट्टी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. किनारपट्टी भागांतील देवगड, मालवण, वेंगुर्ले हे तालुके सिंधुदुर्गातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे आंब्यावर केलेल्या औषध फवारण्या वाया गेल्या परिणामी खर्च वाढला आहे. 

आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर दोन दिवस बंद

पुण्यातील आळंदीचे संत ज्ञानेश्वर मंदिर दोन दिवस बंद राहणार. 14 जानेवारीच्या मकर संक्रातीला राज्यातील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, राज्यात पुन्हा कोरोना पसरू शकतो. म्हणून 13 जानेवारीच्या रात्री 8 पासून 15 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. परिपत्रक काढून आळंदी देवस्थानने तसं जाहीर केलंय.

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयत्न; शरद पवारांची घोषणा

गोव्यात भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवणार असून त्या ठिकाणी महाविकास आघाडीसारखा प्रयत्न करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. 

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावर आज न्यायालयात सुनावणीची शक्यता 

भाजपच्या 12 निलंबित आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, आमदारांच्या निलंबनावर आज न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे.

ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश

ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. 


`स्मार्ट सिटी मिशन'चे संचालक कुणालकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ६ जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. त्यात ठाणे स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची चौकशी करून २७ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


स्मार्ट सिटी योजनेतील काही कामांमध्ये गैरव्यवहार व बहुसंख्य कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपाने केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार करून विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती.


यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात आज सुनावणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. मनी लाँन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर देशमुख गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये आहेत. या प्रकरणात ईडीनं देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केलंय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांनी 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणात कारवाई करण्यात आलीय. 60 दिवसांत आरोपपत्र दाखल केल्यानं देशमुख यांची जामिनाचा मागणी बेकायदेशीर असल्याचा दावा ईडीनं केलाय. 

भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता

विधानसभेच्या 12 निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभाध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केल्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या प्रकरणी आज ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी असून हे प्रकरण 28 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी ठेवण्यात आलंय. 

नंदूरबार जिल्ह्यात काल रात्री ते आज पहाटे पर्यन्त 07 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद

नंदूरबार - जिल्ह्यात काल रात्री ते आज पहाटे पर्यन्त 07 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागात तापमान 6अंश सेल्सिअस पेक्षा कमी होते.  सातपुड्याच्या पर्वत रांगा मधील डाब परिसरात दवबिंदू गोठल्याचे आले समोर आले. आणखीन 2 दिवस गारठा असाच राहण्याची शक्यता

सोलापुरातील सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश, उद्या मध्यरात्रीपासून रविवार पर्यंत मंदिर परिसरात संचारबंदी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज्यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 जानेवारी रात्री बारा वाजल्यापासून ते रविवार दि. 16 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेवर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. विविध राज्यांतून भाविक सोलापुरात सिध्देश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यात्रेसाठी केवळ 50 मानकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.. या सर्व मानकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने पासेस देण्यात येणार आहेतच. तसेच मंदिर परिसराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना देखील पासेस देण्यात येणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हरिभाई देवकरण शाळेसमोरील रस्ता, भुईकोट किल्ला परिसर ते चार पुतळा असे चार ही बाजूने संचारबंदी लागू असणार आहे. त्यामुळे काळात सर्वसामान्य नागरिकांना या भागातील रस्त्यांचा वापर करता येणार नाहीये.

महाबळेश्वर पाठोपाठ आता वाईचे तापमान घसरले

महाबळेश्वर पाठोपाठ आता वाईचे तापमान घसरले आहे. संपूर्ण वाईला धुक्याची चादर.  तापमान घसरल्यामुळे आता वाई गारठली आहे. वाई चे तापमान 8 आंशावर गेले आहे. 

किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी; केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत आदेश जाहीर

किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत बंदी आदेश जाहीर करण्यात आले आहेत. 


  

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकारचं राज्यांना सतर्क राहण्यासाठी पत्र

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्यासाठी पत्र लिहिलंय. दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्णांपैकी 20 ते 23 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र सध्या सक्रीय रुग्णांपैकी 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलीय. मात्र ही परिस्थिती कधीही बदलू शकते असा इशारा केंद्र सरकारने राज्यांना दिलाय.. केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, हॉस्पिटलायझेशन प्रकरणे, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्राने राज्यांना दिलेत.

सरसकट कोरोना चाचण्यांना ICMRची कात्री, काय आहेत नवीन सूचना बघुयात

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार; देशातील स्थिती काय?

Petrol-Diesel Price Today, 11 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे इंधन दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Rates) स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तरीही गेल्या दोन महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. 


IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 11 जानेवारी 2022 : मंगळवार : ABP Majha

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


India Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली


संपूर्ण जगाची धाकधुक वाढवणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Covid-19) नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) देशातही आपले हातपाय पसरले आहेत. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून सोमवारी कोरोना चाचणीबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. 


कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत (Corona Test) आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.  एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.


Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये चढ-उतार; देशातील स्थिती काय?


भारतीय तेल कंपन्यांनी आजचे इंधन दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Rates) स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तरीही गेल्या दोन महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अशातच देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. 


IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.