Maharashtra Breaking News LIVE Updates : अखेर कलीचरण महराजाला जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 07 Jan 2022 08:43 PM
नागपूरात 698 नवे कोरोनाबाधित

नागपूर जिल्ह्यात 698 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 132 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 16 झाली आहे.  

पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एक हजार कोरोना रुग्णांनी नोंद

पिंपरी चिंचवडमध्ये आज तब्बल एक हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. बऱ्याच महिन्यानंतर कोरोनाने एक हजार रुग्णांचा आकडा पार केला. या आठवड्यात झपाट्याने आकडा वाढू लागल्याने, सध्या शहरात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 3135 वर पोहचला आहे.

अखेर कलीचरण महराजाला जामीन मंजूर

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कालीचरण महाराजाला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.२५००० हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत आलेल्या प्रसिद्ध कलीचरण महराजाला पुणे पोलीसांनी काल ताब्यात घेतलं होत. काल कोर्टात हजर केल्यानंतर कलीचरण महराजाला परवा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल एक दिवसाची पोलीस कोठीडी संपल्यानंतर कलीचरण  महराजाला काल पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होत. त्यात कलीचरण महाराजाला अगोदर ७ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्या नंतर lagechah वकिलांनी जामीनासाठी अर्ज माननीय न्यालयाकडे केला होता त्यानुसार आज कलीचरण महराजाला पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सांगलीतील पहिली ते आठवी शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय

 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी पर्यतच्या शाळा 10 जानेवारी पासून बंद करण्याचा निर्णय सांगली जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यत शाळा बंद राहणार आहेत. नववी,  दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम सुरू असल्याने या दोन वर्गाच्या शाळा सुरू राहतील. 


 

 नाशिकमध्ये 837 नवे कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात आज 837 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 138 रुग्ण बरे झाले आहेत. 

भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा फैसला सोमवारी

भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा  सोमवारी फैसला होणार आहे.  येत्या 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यापूर्वी निलंबन मागे घेतलं जाणार का? येत्या सोमवारी विधान भवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासात 2757 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 628 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 2757 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 628 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 519535 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 9792 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 18086 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पिकांना बसणार फटका

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंद गावात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याठिकाणी गारपीट देखील झाली आहे.

मुख्य सचिव देबाशीश चक्रवर्ती यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक सुरु

मुख्य सचिव देबाशीश चक्रवर्ती यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक सुरु झाली आहे. राज्यातील कोवीड संदर्भात आढावा सुरु आहे. हा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहे. 

भिवंडीत भीषण आगीत 2 कामगार गंभीर जखमी
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक मार्गावरील वडपा ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत रात्रीच्या सुमारास गोदामात झोपलेले दोन कामगार होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींवर उपचार सुरु असून पुढील तपास पोलिस करत आहेत.  
नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजप राज्यभर पोलीस ठाण्यात तक्रार करणार

नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजप राज्यभर पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे.  नाना पटोले यांच्या विरोधात कार्यकर्त्याना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश 

परीक्षा घोटाळ्यात अटक असलेलले आरोपी तुकाराम सुपे, शिवकुमार,आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण

परीक्षा घोटाळ्यात अटक असलेलले आरोपी तुकाराम सुपे, शिवकुमार,आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण;
यांच्या सोबत सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यासह एकूण 11 अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, सर्वांना सौम्य लक्षण

नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक

नवी मुंबई -


नवी मुंबईतील भाजपा  माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्य पोस्ट व्हाॅट्सअप ग्रुपवर टाकल्याप्रकरणी अटक


शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारी नंतर कोपरखैरणे पोलीसांकडून संदीप म्हात्रे यांना अटक

परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी लाल परी सुरु करण्यात प्रशासनाला 62 दिवसानंतर यश 
 गेले 62 दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद असलेली लाल परी अखेर परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी सुरु करण्यात प्रशासनाला यश आले असले तरी केवळ 5 बसेस कशातरी बाहेर पडू शकल्या आहेत . आजही एसटी कामगार बस स्टॅन्ड मध्ये आपल्या आंदोलनस्थळी बसून असून केवळ ७ चालक आणि १० वाहक कामावर हजार झाल्याने ५ फेऱ्या सुरु करता आलेल्या आहेत . यामध्येही दोन बसेस या शिवशाही असल्याने मंत्र्यांना दाखवण्यासाठी सुरु असलेल्या या धडपडीचा सर्वसामान्य प्रवासी आणि भाविकाला कोणताही फायदा होताना दिसत नाही . पंढरपूर आगारातून रोज १२५ फेऱ्या राज्यभर आणि कर्नाटक , आंध्रप्रदेश मध्ये होत असत . मात्र एसटी  कामगारांच्या आंदोलनामुळे गेले ६२ दिवस रोजचा १० लाखाचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला आहे . आज परिवहन मंत्री अनिल परब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज दुपारी ते विठ्ठल मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेणार आहेत . याचवेळी शिवसेनेचे संपर्क नेते आ तानाजी सावंत हे एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह परिवहन मंत्र्यांची भेटही घेणार आहेत . आता परिवहन मंत्री आणि या शिष्टमंडळाच्या भेटीत काही फलद्रुप चर्चा झाली तरच सर्वसामान्य प्रवासी आणि भाविकांना दिलासा मिळणार आहे . 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा,  21 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात कोरोनाचा विळखा, 


21 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह


आणखी १५ जणांचे रिपोर्ट येणं बाकी


वळसे-पाटील यांच्या खाजगी सचिवासह इतर कर्मचारी कोरोनाबाधीत

परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी घोषित केलेल्या रियाझ भाटीला हायकोर्टाचा दिलासा

परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी घोषित केलेल्या रियाझ भाटीला हायकोर्टाचा दिलासा. खंडणीच्या प्रकरणात फरार घोषित केल्याचा दंडाधिकारी कोर्टाचा आदेश रद्द. खंडणीच्या याच प्रकरणात यापूर्वी विनय सिंह यालाही फरार घोषित केल्याचा आदेश हायकोर्टानं केला होता रद्द.हे दोन्ही आरोपी परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणीच्या प्रकरणात फरार घोषित करण्यात आले होते

शहरी नक्षलवाद प्रकरणी वरवरा राव यांना दिलेला दिलासा कायम, तुरूंगात शरण येण्याची मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली

शहरी नक्षलवाद प्रकरणी वरवरा राव यांना दिलेला दिलासा कायम


तुरूंगात शरण येण्याची मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचा निर्णय


कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतेय - हायकोर्ट


डॉक्टर्स, पोलीस मोठ्याप्रमाणात बाधित होत असताना राव यांना अश्या परिस्थितीत परत जेलमध्ये पाठवणं योग्य ठरेल का?, हायकोर्टाचा एनआयएला सवाल

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब


नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब


तोपर्यंत नितेश राणेंविरोधात कठोर कारवाई न करण्याची दिलेली ग्वाही कायम

मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या, पत्नी व मुलीने हत्या केल्याचे उघड 

कल्याण कोळसेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार 


मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची हत्या 


पत्नी व मुलीने हत्या केल्याचे उघड 


मुलगी लग्न होऊन सासरी नांदत नाही म्हणून घरात सुरू होता वाद 


याच वादातून पत्नी ज्योती बोरसे व मुलगी भाग्यश्री  बोरसे यांनी खलबत्त्याने ठेचून केली हत्या 


दोघिना कोलशेवाडी पोलिसांनी केली अटक

पतसंस्था गटातून अर्जुन अबिटकर विजयी, सत्ताधारी गटाला धक्का, आमदार प्रकाश आवडे यांना केलं पराभूत

#BREAKING : कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणूक निकाल अपडेट : पतसंस्था गटातून अर्जुन अबिटकर विजयी, सत्ताधारी गटाला धक्का, आमदार प्रकाश आवडे यांना केलं पराभूत  

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी गटाचे भैय्या माने विजयी 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे भैय्या माने हे विजयी झाले आहेत. शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून ते विजयी झाले असून, त्यांनी विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. भैय्या माने यांना 2 हजार 266 तर क्रांतिसिंह पाटील यांना 1 हजार 655 मते मिळाली. 611 मतांनी माने यांचा विजय झाला आहे. भैय्या माने हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक,50 कोटींहून मोठा घोटाळा असल्याचा संशय

नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनीच 147 शेतकऱ्यांची केली फसवणूक, 50 कोटींहून अधिक घोटाळा असल्याचा संशय


- 16 कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल 


- यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि ईतर अधिकाऱ्यांचा सहभाग


- आरोप असलेले अनेक अधिकारी आता सेवानिवृत्त आहेत


- कंत्राटदार शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


- गुन्ह्याचा तपास नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व, आतापर्यंत 5 उमेदवार विजयी

जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व


आतापर्यंतच्या निकालात सत्ताधारी गटातील 5 उमेदवार विजयी


तर विरोधी गटातील 2 उमेदवारी विजयी


विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक आणि रणवीर गायकवाड विजयी


सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील विजयी

परभणी पोलीस दलातील श्वान जॉनीचा मृत्यू

परभणी पोलीस दलातील श्वान जॉनीचा मृत्यू 


परभणी पोलीस दलाच्या डॉग स्कॉडमधील अतिशय चाणाक्ष आणि हुशार डॉबरमॅन श्वान जॉनी याचा पोटाच्या आजारामुळे मृत्यू झाला.त्याला परभणी पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी जड अंतकरणाने निरोप दिलाय.जॉनीने 8 वर्षाच्या कार्यकाळात 25 गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते . शिवाय पोलिसांच्या नांदेड परिक्षेत्रातील कर्तव्य मेळाव्यात तो 2 वेळा तो प्रथम तर 1 वेळा द्वितीय आला होता.मागच्या काही दिवसांपासून त्याला पोटाचा त्रास होत त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असुन आज पोलीस मुख्यालयात मोठ्या जड अंतकरणाने परभणीचे डीवायएसपी अविनाश कुमार,डीवायएसपी राठोड यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी त्याला निरोप देत शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, पहिला निकाल हाती, सत्ताधारी गटानं खातं उघडलं

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, पहिला निकाल हाती


सत्ताधारी गटानं खातं उघडलं


आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी


विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा केला 


देसाई यांना 57 तर चराटी 48 मत

रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकीने अचानक घेतला पेट,गेवराई बायपासवरील घटना

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीने अचानक पेट घेतला.. गेवराई बायपास वर घडलेल्या या थरारक घटनेनंतर  या दुचाकीवरील व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. काल दुपारी वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पंकज पवार हा तरुण अहमदनगरहून शेवगावमार्गे गेवराईकडे येत असताना  गेवराई शहराजवळच्या बायपासवर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पंकजच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच बायपासवरील हॉटेलचालकांनी पंकजला गाडी पासून वेगळे केले

भिवंडीतील वडपा ग्रामपंचायत हद्दीत गोदामाला भीषण आग, दोन कर्मचारी भाजले

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्ग जवळ वडपा ग्रामपंचायत हद्दीत एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोदामात झोपलेले दोन कर्मचारी भाजले


गोदामात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले


या गोदामात मोठ्या प्रमाणात लाकूड ,कागदी पुठ्ठा तसेच लाकडाचे साहित्य साठवून ठेवण्यात आले होते


आगीचे कारण स्पष्ट असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहेत

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Omicron Variant : ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष नको, गांभीर्यानं घ्या; WHO चा इशारा


Omicron Variant : भारतात कोरोनाची त्सुनामी सुरु झाली आहे. तर जगभरातल्या अनेक देशांत ओमायक्रॉनची अशी लाट आधीच आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस  यांनी काल याबाबत माहिती दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडनॉम घेबियस यांनी गुरुवारी म्हटलं की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर आहे. विशेषतः लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांसाठी हा कमी गंभीर ठरतो. पण तरीही ओमायक्रॉनला सौम्य समजणं चूक असेल. 


Kolhapur : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, एका कैद्याचा मृत्यू 


कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात (Kolhapur Kalamba Jail) सातत्यानं काही ना काही घडत असतं. आता कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. निशिकांत बाबुराव कांबळे असं हाणामारीत मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे.  मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार निशिकांत आणि चार कैद्यांमधील वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली.  हाणामारीत निशिकांतला बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.


Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत, सध्याचे दर काय? 


Petrol-Diesel Price Today, 7th January 2022 : देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर भारतीय तेल (IOCL) कंपन्यांनी जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.