Maharashtra Breaking News LIVE Updates : गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 09 Dec 2021 09:14 PM
गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव

महापौरांबाबत अपानास्पद वक्तव्य दाखल केल्याप्रकरणी दाखल गुन्हा


मरिन लाईन्स पोलीस स्थानकांत हजेरी लावत शेलारांनी मिळवला नियमित जामीन

नाशिक मनपा हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा 13 डिसेंबरपासून सुरू होणार

नाशिक मनपा हद्दीतील 1 ते 7 वी च्या शाळा 13 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.  शिक्षण विभागाने  निर्णय घेतला. 10 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची काय स्थिति आहे ते बघून निर्णय घेण्याचे मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते.  त्यानुसार सर्व नियम पाळून शाळा सुरू होणार आहे. 

भाजप नेते आशिष शेलार दिल्लीला रवाना, हिवाळी अधिवेशनापूर्वी बारा आमदारांचे निलंबन रद्द व्हावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू

भाजप नेते आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहे. 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रकरणात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी बारा आमदारांचे निलंबन रद्द व्हावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत

चर्चगेट स्टेशन गेट नंबर 3 जवळ आग 

 


चर्गगेट स्टेशनच्या गेट नंबर 3 जवळ, आहिल्याबाई होळकर चौकासमोर आग लागली आहे. जवळ असलेल्या कचऱ्याला आग लागल्यानंतर ही आग पसरल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

39 दिवसानंतर भंडारा आगारातून निघाली बस

भंडारा विभागातील साकोली आगारानंतर भंडारा आगाराने धाडसी निर्णय घेत आपली बस सेवा सुरु केली  आहे.  भंडारा आगारातून दोन बस सुटल्या आहे. मागील 39 दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्यात आली असून सुद्धा एस कर्मचारी विलगिकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर काही आगारातील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत

अंबरनाथमध्ये सहा दिवसात परदेशातून आले 163 प्रवासी, प्रवाशांना संपर्क साधून टेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू

अंबरनाथ शहरात गेल्या नऊ दिवसात परदेशातून 163 प्रवासी आले आहेत. त्यामुळे शहरात काहीसं काळजीचं वातावरण आहे. या सगळ्या प्रवाशांना शोधून त्यांची तपासणी करण्याचं काम नगरपालिकेकडून सुरू आहे.

बीआरटी बस थांब्याला चार चाकी गाडीचा अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

पुण्यात नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बस थांब्याला चार चाकी गाडीचा अपघात या अपघातात  दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे नगर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर दोघे जखमी झाले आहेत..संकेत भुजबळ (वय 22) व त्याच्या शेजारी बसलेला ओम राहुल पवळे (वय 17) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये मागे बसलेले गौरव साठे प्रफुल अंकमनची हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात पुण्याकडून नगरच्या दिशेने येणाऱ्या कारने मद्यधुंद चालकामुळे भरधाव वेगात येऊन बीआरटी बसथांब्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की  कार बीआरटी बस स्टॉपच्या मध्यभागी असणाऱ्या जागेत जाऊन अडकली. या अपघातात चालक संकेत भुजबळ व त्याच्या शेजारी बसलेला राहुल पवळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले  हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशन अधिक तपास पोलीस करत आहेत.

डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती 

डॉ प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आले आहे.


राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सध्या ओ.पी.जिंदाल विद्यापीठ, रायगड, छत्तीसगड येथील स्कुल ऑफ इंजिनीअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.   डॉ प्रशांत बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. 


दिनांक  ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 


डॉ प्रशांत बोकारे (जन्म २३ नोव्हेंबर १९६३) यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम. ई. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व आयआयटी  गुवाहाटी येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे.
 
डॉ बोकारे यांनी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय सेवाग्राम वर्धा येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे.  


कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालय येथील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते.  


समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ प्रशांत बोकारे यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

'एक तर निवडणूक पूर्णपणे घ्या किंवा निवडणूक थांबवा'ही मागणी घेऊन राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात- छगन भुजबळ

'एक तर निवडणूक पूर्णपणे घ्या किंवा निवडणूक थांबवा' ही मागणी घेऊन राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. 13 डिसेंबरला पुन्हा सुनावणी 

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशातच आज भाजप आमदार आशिष शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तसेच आशिष शेलारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. 

iPhone आणि iPad चा होणार तुटवडा?

iPhone Production Stop :  अ‍ॅप्पल कंपनीच्या फोन आणि आयपॅड्ला अनेकांची पसंती मिळाली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच आयफोन (iPhone) आणि आयपॅड (iPad) चे उत्पादन  अ‍ॅप्पल कंपनीने बंद केले आहे. कंपनीने हे करण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. कंपनीने सांगितले की,  पार्ट्सची कमतरता, सप्लाय चेनमध्ये व्यत्यय आणि चीनमध्ये मर्यादित वीजेचा वापर या सर्व कारणांमुळे प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं  अ‍ॅप्पल कंपनीने एका रिपोर्टमध्ये सांगितलं. एका रिपोर्टनुसार, उत्पादन बंद केल्याने कंपनीचा लेटेस्ट फोन आयफोन 13 सीरिजचे उत्पादन देखील ठप्प झाले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 09 December : आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 35 व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मोदी सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

2015 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमधून सुखरुप बचावले होते बिपिन रावत; काय होती ती दुर्घटना?

Tamil Nadu Helicopter Crash : बुधवारी सकाळी तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. ज्यामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताला बळी पडण्याची ही बिपीन रावत यांची पहिली वेळ नाही, 2015 मध्ये ते हलिकॉप्टर क्रॅशमधून थोडक्यात बचावले होते. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?


CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.


देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झाली आहे की, देशाचे पुढचे सीडीएस कोण? सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल एमएम नरवणे(Manoj Naravane) हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तिनही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. अशातच नौदलाचे अधिकारी एडमिरल करमवीर सिंह सर्वात ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे आहेत. जर या दोघांमध्ये अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा विचार केला तर, एमएम नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. नरवणे हे 60 वर्षांचे आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.


'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा


कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरांतून सीडीएस जनरल रावत यांच्यासह मृत्यू पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय या घटनेनंतर याआधीच्या काही घटनांवर देखील बोललं जात आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.
 
'त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. वाऱ्याचा वेगही जास्त होता.  ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.'

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.