Maharashtra Breaking News LIVE Updates : पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 08 Dec 2021 10:09 PM
पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना पुणे पोलीसांच्या सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे.  डॉक्टर बोटले यांच्याकडेआरोग्य विभागाच्या 31 ऑक्टोबरला झालेल्या परिक्षेची प्रश्नपत्रिका सेट करण्याची जबाबदारी होती.  डॉक्टर बोटले यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत प्रियंका गांधी यांची घेणार भेट

शिवसेना खासदार संजय राऊत संध्याकाळी सात वाजता प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. 10  जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. प्रियंका उत्तर प्रदेश महासचिव आहेत, त्यामुळे यूपी निवडणुकांबाबत काही खलबतं होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी माहूरच्या रेणुकामातेचे घेतले दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज माहूर गडावरील साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असणाऱ्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. आज दुपारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेणुकामाता मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून महाआरती केली.

गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण

रोहयो राज्यमंत्री संदिपान घुमरे यांचे बंधू राजू आसाराम घुमरे यांनी पाचोड मधील बबलू उर्फ रंजीत नरवडे यांना बेदम मारहाण केली .आहे राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. रणजीत नरोडे हे बीड हायवे क्रमांक 211 ते साजगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह करत होते त्याच वेळी राजू घुमरे यांच्यासह काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि शिवीगाळ करत रणजीत यांना बेदम मारहाण केली आहे रणजीत यांच्या पाठीवर मारहाण केवळ म्हटले आहेत त्यांच्या हातावर देखील मारहाण केल्याच्या खुना आहेत. हायवे क्रमांक 211  साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवाडे यांचा यांचा आरोप आहे. 

यशोमती ठाकूर यांना निवेदन देतांना धमकी

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देतांना धमकी दिल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप...


ओबीसी महासभाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण गाढवे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांना एसटी संपाबाबत निवेदन देण्यासाठी आले असता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत बोलाचाली झाली. बघून घेऊ अशी धमकी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिली असा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिथं उपस्थित पोलिसांना सांगितले की, मी तक्रार देते याच्यावर कारवाई करा असे निर्देश दिले...

इंदुरीकर यांना दिलासा

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आज होणारी अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ६ जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून, तोपर्यंत इंदुरीकर यांना दिलासा मिळाला आहे

एनआयएला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणातील आरोपी नरेश गौरची सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश

एनआयएला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणातील आरोपी नरेश गौरची सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश


नरेश गौरला जामीन मंजूर करत एनआयए कोर्टानं निकालाला दिली होती 25 दिवसांची स्थगिती


अँटालिया प्रकरणातील या पहिल्या जामीनाला स्थगिती देण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द


गुणवत्तेच्या आधारावर दिलेल्या जामीनाला स्थगिती देण्याची गरजच काय?, हायकोर्टाचा सवाल

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

आज 8 डिसेंबर 2021 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात


• नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी  (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


• कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार. 
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


• महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय. 
(कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)


• महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)


•बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)


• शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप 

ऊटीमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश; हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत असल्याची माहिती

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर जाणार, ओबीसी राजकीय आरक्षण मुद्यावर दिल्लीत भेटीगाठी, दिल्लीतील वरिष्ठ कायदे तज्ञ यांची घेणार भेट

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर जाणार, ओबीसी राजकीय आरक्षण मुद्यावर दिल्लीत भेटीगाठी, दिल्लीतील वरिष्ठ कायदे तज्ञ यांची घेणार भेट

सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ सुरेश जाधव यांचं दीर्घ आजाराने निधन

सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ सुरेश जाधव यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय.  डॉक्टर जाधव हे 72 वर्षांंचे होते. सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड लस तयार करण्यात डॉ जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  अखेर आज पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनमजुराचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनमजुराचा मृत्यू....बिबट्याला जेरबंद करताना केला होता बिबट्याने हल्ला... श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत झालेले बिबट्या हल्ला प्रकरण...वनमजुर किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू..श्रीरामपूर शहरात भरवस्तीत केलेला बिबट्याने अनेकावर हल्ला... हल्ल्यात वनमजुरासह 7 जण झाले होते जखमी..राहुरी येथील वनमजुर लक्ष्मण किनकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू...मांडीला चावा घेतल्याने त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी केले होते दाखल...

सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे तडीपार, दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यातूनही तडीपार

सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे तडीपार


दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तर इंदापूर तालुक्यातून तडीपार


भाजपचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत राजेश काळे


शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप होते काळे यांच्यावर


स्वतः राजेश काळे यांच्याकडून तडीपारीचे आदेश प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा


निवडणूका तोंडावर असताना राजकीय द्वेशापोटी कारवाई झाल्याचा टीका


तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची काळे यांची माहिती

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील ED कार्यालयात हजर

सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील ED कार्यालयात हजर झाली.


 





पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


भारताच्या ताफ्यातील 'किलर्स स्क्वॉड्रन'; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन'


 Killer Squadron : भारतीय नौदलात शौर्य गाजविणाऱ्या 22 व्या 'किलर्स स्क्वॉड्रन'ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन' मिळालं. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यादाच अशाप्रकारे एका तुकडीला सर्वोच्च राष्ट्रपती मानांकन मिळालं आहे.


1971 भारत पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला 50 वर्ष पूर्ण होतयेत. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्वाची कामगिरी करत या ताफ्याने पाकिस्तानच्या पाक सागरी हद्दीत जाऊन कंबरडे मोडले. त्यानंतर या नौदलाच्या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे नाव देण्यात आला आणि याच 'किलर्स स्क्वॉड्रन'च्या शौर्याला सलाम म्हणून हे राष्ट्रपती मानांकन ताफ्याला मिळतंय. या ताफ्यातील प्रबळ वर्गाच्या दोन युद्धनौका यामध्ये प्रबळ प्रलय युद्धनौका तर वीर वर्गाच्या सहा यामध्ये विनाश, निःशंक, नाशक, विद्युत, विपुल, विभूती अशा एकूण 8 युद्धनौका 'किलर्स स्क्वॉड्रन'मध्ये आहेत. 


1971 भारत पाकिस्तान युद्धातील भरताच्या विजयला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने जी भूमिका बजावली जी कामगिरी केली. त्याचं जगभर कौतुक झालं शिवाय विशेष नोंद घेण्यात आली. पाकिस्तनाच्या सागरी हद्दीत घुसून पाकचं कंबरडं मोडण्याचं काम नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यांनी केलं. म्हणूनच या भारतीय नौदलातील या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे बिरुद मिळालं. याच किलर्स स्क्वॉड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात येणार असून राष्ट्रपती मानांकन मिळतंय. 



3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून अमृतसर, पठाणकोठ, श्रीनगर, अवंतीपूर, अमृतसर, जोधपूर, अंबाला, आग्रा, उत्तरलाय येथे हल्ला चढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या दिवशी राष्ट्राला उद्देश केलेल्या नभोवाणीवरील भाषणात हे भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे सांगून भारत कडवे उत्तर देईल, असं जाहीर केलं. सैन्यदलांना तसे आदेशही दिले. पंतप्रधानांच्या आदेशानंतर नौदलप्रमुख असलेल्या अ‍ॅडमिरल एस. एम. नंदा यांनी नौदलातील सर्वात तरुण ताफा कराची मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेला नाव दिले 'ऑपरेशन ट्रायडेंट'.

 


 


Needle Free Vaccine : लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लशीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 'झायकोव -डी' या लशीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार आहेत. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक आणि जळगावला जवळपास 8 लाख डोस मिळणार आहेत. 


झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते. काही दिवसांपूर्वी भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस, ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरामध्ये (EUA) 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता दिली होती. 


ZyCoV-D ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 69% लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि 25% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.