Maharashtra Breaking News LIVE Updates : नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे बंधन, दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
सांगली जिल्हा बँकेत प्रथमच महिला संचालकाची निवड झाली आहे. यावेळी अध्यक्षपदी आ. मानसिंगराव नाईक, तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन झालं आहे. यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असणारे गोडसे मागील 2 आठवड्यांपासून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. ते 65 वर्षांचे होते.
मुंबईमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केलाय. दोन रुग्णांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे.
नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने बंधनं घातलं असून ठेवीदारांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
ओबीसी आरक्षण मुद्द्यांवरुन छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अडचणी का येत आहेत? हे कळत नाही, हे सर्व एक राजकीय षडयंत्र असल्याचंही भुजबळ म्हणाले. तसंच या सर्वांवर मी फडणवीसांशी फोनवर बोलणार आसल्याचंही भुजबळांनी सांगितलं.
पुण्यात गेल्या 24 तासात 38 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 497278 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 791 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4426 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
राज्यातील जवळपास एसटी महामंडळाचे 100 डेपो सुरू झाले आहे. डेपोची वाढती संख्या पाहता आगामी कारवाईसाठी मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक झाली आहे. बैठकीमध्ये मेस्मा लागू करायचा की नाही याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि अधिकारी उपस्थित आहे.
ओबीसींना निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहे.
आगामी महापालिका, जिल्हापरिषद, नगर पंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी आहे.
बैलगाडा शर्यती संदर्भात सुप्रीम कोर्टात आजही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. याबाबत इतरही राज्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक यावर्षी चांगलीच गाजली. 19 संचालक असणाऱ्या या बँकेत देशमुख गटाने 18 जागेवर ताबा मिळवत 1987 पासूनची सत्ता पुन्हा एकदा खेचून आणली आहे. भाजपाने प्रतिस्था पणाला लावली होती मात्र मतदारांनी कौल देशमुख गटाच्या बाजूने दिला आहे .आज सर्व संचालकांच्या उवस्थितीत अध्यक्षपदी धिरज देशमुख तर उप अध्यक्ष अॅड प्रमोद जाधव यांची निवड करण्यात आली आहे
Maharashtra Beed News : बीडमध्ये पैलवान ग्रुप कडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बीड मध्ये पाहिल्यांदाच महिला कुस्ती भरविण्यात आली होती. स्पर्धेत औरंगाबादची श्रुती ही महिला मल्ल विजयी झाली.पैलवान ग्रुप कडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला पैलवानांनी सहभाग नोंदविला होता. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानावर पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला बीडकरांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत तब्बल 351 महिला पैलवानांनी सहभाग नोंदवला. या कुस्ती स्पर्धेत राज्याच्या वेगळ्या भागातून महिला कुस्ती पटू आले होते त्यांना त्यांना 2 लाख 51 हजार रुपयांपर्यंतची बक्षीसे देण्यात आली. तर प्रथम विजेत्याला 2 किलो चांदीची गदा देण्यात आली.
कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये मालगाडीची एक बोगी उलटली, अपघातात 6 कामगार जखमी, चौघांची प्रकृती गंभीर, मालगाडीमधून सिमेंट उतरत असताना घडली दुर्घटना
शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने वीज बिल वसुली करणाऱ्या राज्य सरकार व महावितरणच्या कारभाराविरोधात भाजपचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत ,आमदार गोपीचंद पडळकर आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आक्रमक झाले असून या तिघांच्या नेतृत्वाखाली आटपाडी मध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे विज बिल 100% माफ झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणे थांबले पाहिजे, तोडलेली कनेक्शन तातडीने जोडावेत या मागणीसाठी आटपाडी स्टँड पासून ते महावितरण कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आटपाडी तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झालेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कालावल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे. आचरा मंडळ पथकाने आणि माळवण महसूल भरारी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 3 डंपर पकडले तर बेकायदा वाळू उपसा करणारे भगवंतगड येथील 4 व तेराई 7 एकूण 11 रॅम्प तोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक करणारे डंपर चालकांचे धाबे दणाणले आहेत.
भांड्यांच्या दुकानातून महिलांनी गॅसच्या शेगड्या चोरून नेल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात राहणारे गुरुनाथ पावसे यांचं द्वारली गावात आई गावदेवी स्टील सेंटर नावाचं भांड्यांचं दुकान आहे. या दुकानात शनिवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास एक महिलांची टोळी आली. यापैकी एक महिला दुकानातल्या वस्तू पाहण्याचा बहाणा करून दुकानात गेली, तर इतर महिलांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या दोन लोखंडी शेगड्या लंपास केल्या. ही सगळी घटना शेजारच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली. या चोरीप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्या महिलांच्या टोळीचा शोध घेतायत.
'डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य, सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारं ध्येयनिष्ठ, कृतीशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. विद्यार्थी, युवक चळवळीचा मार्गदर्शक आपण गमावला आहे. साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार म्हणाले की, डॉ. उल्हास उढाण हे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे पाईक होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. युवक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या बरोबरीनं जनजागृती निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय होतं. त्यांचं आकस्मिक निधन ही राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उभा असलेल्या रेल्वेच्या डब्याला रात्री आग लागली. या आगीचं कारण अस्पष्ट असून एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवली. आगीत रेल्वेचा डबा जळून खाक झाला आहे.
पार्श्वभूमी
द्राक्ष उत्पादकांना विशेष पॅकेज द्या; तर कर्जमाफी आणि द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करा... राजू शेट्टीची मागणी
नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी दरम्यान बोलत होते. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज,तासगाव,पलूस,जत,कवठेमहांका
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली होतीॉ. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती
Omicron Variant : जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -