Maharashtra Breaking News LIVE Updates: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
31 डिसेंबरच्या पाश्वभूमीवर आज सायंकाळपासूनच कल्याण शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौकात नाकांबदीसाठी कार्यरत असलेल्या पोलिसांनी एका तरुणाला अडविले. तो मद्यधुंद अवस्थेत होते. त्याने ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करण्यास नकार दिला. तसेच पोलिसांना उलट प्रश्न विचारुन गोंधळ घातला.आपण काय करतोय ,कुणाशी बोलतोय याच भान या महाभागाला राहील नव्हतं .पोलिसांचीच परेड घेत15 ते 20 मिनिटे त्याचा गोंधळ सुरूच होता .अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने टेस्ट केली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 31 डिसेंबरला नववर्षचा स्वागताचा आनंद शिगेला पोहचण्यापूर्वीच ही रात्री नऊ वाजता घडली.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच मात्र चांगलंच मनोरंजन झालं .दरम्यान रात्री नाकाबंदी सुरुच राहणार असून तळीरामांची विरोधात कारवाई केली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं .
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. स्वत: यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलीय. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय.
दौंड मधील व्यापाऱ्याला दोघा जणांनी संमोहित करून 1 लाख 16 हजार रुपये लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअर मध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत संमोहित केले आणि त्यानंतर स्वतः गल्ल्यात हात घालून 1 लाख 16 हजार रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या आणि CCTV कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरिक्षकाची आत्महत्या...
पुण्यातील विश्रांतवाडी येथील रहात्या घरात केली आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट..पुणे पोलीस घटनास्थळी दाखल..
4 मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या, जालन्यातील घुंगर्डे हादगाव येथील घटना, आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये 1 मुलगा 3 मुलींचा समावेश, गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी वय 32 असे आईचे नाव, तर भक्ती ज्ञानेश्वर अडाणी (13), ईश्वरी ज्ञानेश्वर अडाणी (11), आक्षरा ज्ञानेश्वर अडाणी ( 09) युवराज ज्ञानेश्वर अडाणी (06) अशी मुलांची नावं, घटनास्थळी पोलीस दाखल
सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप)- विजयी
सुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत
अतुल काळसेकर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजयी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं
पहिल्या राऊंडमध्ये विकास सोसायटीच्या 8 जागांची मतमोजणी
महाविकास आघाडी - 4
भाजप - 3
एक टाय
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक :
कुडाळ
विद्याप्रसाद बांडेकर - काँगेस - 20 मतं घेत विजयी
प्रकाश मोर्ये - भाजप - 15 पराभूत
शुभाष मडव - अपक्ष - 1 पराभूत
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी तर दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय
पुष्पराज जैन प्रकरणात मुंबईमध्ये इन्कम टॅक्सचे धाड सत्र सुरू, मुंबई मध्ये एकूण 14 ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू, यामध्ये 8 व्यवसायिक आणि 6 निवासी जागांवर या धाडी सुरू आहेत.
Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Corona New Guideline : नव्या नियमांसह नवीन वर्षात प्रवेश, 'ही' नियमावली पाळावीच लागणार
Maharashtra Covid Restrictions : सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. आज 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन वर्षाचा आरंभ होतोय. 2022 मध्ये प्रवेश करत असताना कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्याला नव्या निर्बंधांसह करावा लागणार आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.
सरकारकडून कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
पर्यटनस्थळावर जमावबंदी
कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.
नारायण राणे महाविकास आघाडीला धक्का देणार? सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची आज मतमोजणी
Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण 14 विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -