Maharashtra Breaking News LIVE Updates : नितेश राणेंच्या जामिनावर उद्या 11 वाजता निर्णय

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 08 Feb 2022 05:32 PM
भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर

भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर. नितेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा 

किरीट सोमय्या मारहाण प्रकरणात दिल्लीचे लक्ष, सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल

किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी पुण्यात दाखल झाले . या अधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली त्यामुळे किरीट सोमय्या त्यांच्यावर पुढे महानगरपालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्लीनेही लक्ष घातल्या..

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पोस्ट तिकीट जारी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी ही घोषणा केली. सध्या यावर काम सुरू आहे. 

दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगडच्या तळइये गावच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारची मंजुरी

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील तळइये गावच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. या गावासह आणखी दोन वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 13 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळईये गावासह दोन वाड्यांच्या पुनर्विकासाच्या भूसंपादनासाठी 3 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक सोयीसुविधांसाठी 9 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ही मोठी दुर्घटना घडली होती.

नितेश राणेंच्या जामिनावर उद्या 11 वाजता निर्णय

भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत उद्या 11 वाजता निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं. 

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला


विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं अर्ज फेटाळला  आहे.  तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं जामीनाला मुंबई पोलीसांनी  विरोध  केला होता. 

शिक्षकांनी शनिवारी आणि रविवारी शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे; अजित पवारांचे आवाहन

मुलांची शाळेची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत, त्या अभ्यासक्रमाची भरपाई झाली पाहिजे. शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राज्यातील शिक्षकांना केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेला स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम अभिनंदनीय असून तो राज्यभरात राबवला गेला पाहिजे असंही ते म्हणाले.

हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पुण्यात हडपसरमधील गाडीतळ येथील उड्डाणपूल धोकादायक झाल्याने त्या पुलावरून तीनही बाजूने  जाणारी वाहतूक पुलाखालून वळविण्यात आली आहे.यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हडपसर उड्डाणपूलाच्या बेअरिंग नादुरुस्त आहे तसेच पुलाला क्रॅक झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी हा पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.मात्र,त्याचे योग्य नियोजन न झाल्याने पुलावरून पुन्हा सर्व वाहने सर्रास प्रवास करीत होती. मात्र पूलाबाबतच्या तज्ञ पथकाने मागील आठवड्यात पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने स्थानिक पोलिसांना कल्पना न देता तात्काळ पूलावरून होणारी वाहतूक बंद करा असे सांगितले.ही संपूर्ण वाहतूक पुलाखालील मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नितेश राणे यांच्या जामिन अर्जाची सुनावणीसाठी न्यायाधीश बदलण्याची मागणी रद्द

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करता, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्या समोरच घ्यावी असा अर्ज केला होता.  दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा अर्ज रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.


 

किरीट सोमय्यांसोबत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना जामीन मंजूर  

भाजप नेते किरीट सोमय्यांसोबत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तीन हजारांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजूर    

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्राची पालिकेकडून दखल

मुंबई महापालिकेकडून मनसेच्या मागणीला हिरवा कंदील 


मनसेनं BEST च्या कारभारावर निर्माण केलं होतं प्रश्नचिन्ह 


विद्युत दर निश्चित करण्यासाठी विद्युत नियामक मंडळास सादर केलेले दर हे फसवे असल्याचा 
आरोप मनसेनं केला होता.


याविरोधात पालिकेनं तातडीनं समिती गठित करून अहवाल सादर करण्याची केली होती मागणी 


या मागणीची दखल घेत पालिकेनं पाच सदस्यीय समिती गठीत करून आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत

औरंगाबादमधील सोयगाव नगर पंचायतीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पद शिवसेनेकडेच

अध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी तर उपाध्यक्ष पदी सुरेखाताई प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपच्या ताब्यातील ही नगर पंचायत आपल्या ताब्यात घेऊन अब्दुल सत्तार यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला.

कोल्हापुरात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर मुलीच्या कुटुंबाकडून हल्ला 

कोल्हापुरात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर मुलीच्या कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून मुलाच्या घरातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी गोकुळ शिरगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना डोंगर खाली सरकला,महामार्ग बंद

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना डोंगर खाली सरकला आहे. त्यामुळे पुर्ण महामार्ग बंद आहे.


मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एका भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने बारा वर्षाच्या मुलाला उडवलं, अपघातात मुलाचा जागीच मृत्यू

रविवारी पहाटे पाच सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वर असलेला सारीपुत नगर जवळ अक्ष वय बारा वर्ष त्यांचा मित्र आलोक व मीतेश असे सर्व सायकलिंग करत पवईच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटून अक्षयाचे सायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन अक्ष चा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन बारा वर्षाच्या मुलाचा बॉडी आपल्या ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात पीएमसाठी पाठवण्यात आला. रस्त्यावर असलेला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ट्रॅक चालक प्रेमलाल वर्मा वय 40 वर्ष याला राम मंदिर रेल्वे स्टेशन परिसरामधून अटक करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकाचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज सादर होणार




नाशिक महापालिकाचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज सादर होणार आहे. महापालिका आयुक्त स्थायी समितीच्या अंदाजपत्रक सादर करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर य 2300 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. महापालिकेवर आर्थिक बोजा वाढतोय कोरोनामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे नवीन कामांना किती निधी मिळतो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेसाठी जादा निधीची तरतूद केली जाते का? ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय घोषणा करणार का? तसेच करवाढ लादली जाते का? याकडे लक्ष सत्ताधारी विरोधकांसह नाशिककरांचर लक्ष लागलं आहे.

 

 



 


दिवसभरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा लाईव्ह

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र म्हणून इमारती देण्यास मुंबई आणि विदर्भ शिक्षण संस्था महामंडळाचा नकार

दहावी बारावीच्या परीक्षेला अवघा महिना उरला आहे. मात्र त्यापूर्वी मुंबई आणि विदर्भातील शिक्षण संस्था महामंडळानं घेतलेल्या निर्णयामुळं शिक्षण विभागाचीच परीक्षा सुरु झालीय. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र म्हणून इमारती देण्यास मुंबई आणि विदर्भातील शिक्षण संस्था महामंडळांनी नकारघंटा वाजवली आहे. अनुदानित शाळांना वेतनाव्यतिरिक्त मिळणारं अनुदान मिळत नसल्यानं दोन्ही विभागाच्या शिक्षण संस्था महामंडळानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळं ऐनवेळी परीक्षांसाठी केंद्राची सोय कशी करायची असा प्रश्न शिक्षण विभागासमोर असणार आहे.

ओबीसीसंदर्भात राज्य सरकारनं दिलेला डेटा वैध असल्याचा मागासवर्ग आयोगाचा निष्कर्ष, आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळण्याची चिन्हं निर्माण झालीत आणि त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मागासवर्ग आयोगानं बनवलेल्या अहवालात ओबीसींची ३२ टक्के लोकसंख्या वैध ठरवण्यात आलीय. आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे ओबीसींना 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू

मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या मार्गिंकांसाठी गेले काही आठवडे मेगाब्लॉक घेण्यात आला, त्या ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू होत आहेत. त्याचा फायदा जलद लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना होणार आहे. या मार्गिकांअभावी आधी मध्य रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत होत होतं. आता हा प्रवास विनाअडथळा होणार असल्यानं प्रवाशांना होणारा मनस्ताप टळणार आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे संकेत

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आयआयटी मुंबईमध्ये भारतातील पहिलं कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशनचं राष्ट्रीय केंद्र


आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (NCoE-CCU) चे  राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे केंद्र भारत सरकारद्वारे अनुदानित देशातील पहिलं, असं केंद्र आहे. ज्याला डिसेंबर 2021 मध्ये औपचारिकपणे मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या संशोधनाच्या प्राथमिक महत्व हे जागतिक हवामानातील कार्बनडाय ऑक्सईड (CO2) ची भूमिका समजून घेणे. सोबतच, औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातून उत्सर्जित होणारे CO2 कमी करण्याच्या धोरणांचा समावेश असेल.  CO2 कॅप्चर, वाहतूक,वर्धित पेट्रोलियम पुनर्प्राप्तीमध्ये वापर आणि बायोमासमध्ये रूपांतरण हे कार्य केंद्राच्या प्रमुख उपक्रमांपैकी असतील. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अ‍ॅण्ड स्टोरेज (CCUS) हा हवामानातील बदल कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय असल्याचे समोर आले आहे.


गेल्या वर्षी ग्लासगो, यूके येथे झालेल्या COP-26 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन राष्ट्र बनण्याच्या वचनबद्धतेसह, हवामानाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी  'पंचामृत'  घटक समोर आणले. CCUS अनेकदा सद्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या ऊर्जा-केंद्रित उद्योगांना डीकार्बोनाइज करण्यासाठी योग्य तांत्रिक उपाय म्हणून निर्धारित केले गेले आहे. .


हे राष्ट्रीय केंद्र कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशन वापराच्या क्षेत्रात एक मल्टी-डीसीप्लिनरी, दीर्घकालीन संशोधन, विकास, सहयोग व निर्मिती केंद्र म्हणून काम करेल. NCoE द्वारे क्रॉस-डिसिप्लिनरी प्रशिक्षण पुढील पिढीच्या संशोधकांमध्ये  समस्या-केंद्रित दृष्टीकोन विकसित करेल. नॅशनल सेंटर डोमेनमधील सध्याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोबत नावीन्यपूर्ण कार्याचा कॅप्चरिंग आणि मॅपिंग सुलभ करेल. 


अभिमानास्पद! 'लोणार ते लंडन' पोहोचलेल्या राजू केंद्रेची नवी भरारी! 'फोर्ब्स'च्या यादीत झळकला


फोर्ब्स या नामांकित पत्रिकेच्या वेगवेगळ्या याद्यांची प्रतीक्षा अनेकांना असते. या यादीत आता  बुलढाण्यातील लोणार येथील एका युवकांनं स्थान मिळवलं आहे. राजू केंद्रे असं या युवकाचं नाव आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली असून यामध्ये राजू केंद्रेवर एक स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे.


राजू केंद्रे सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. 2022 च्या "Forbes 30 Under 30" यादीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झाली आहे. या आठवड्यातच.  यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल. नक्कीच माझ्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या व पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी ही आनंदासोबत मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे असं राजू केंद्रेनं म्हटलं आहे.


राजूनं सांगितलं की, आज क्षमता असतानाही  संधीला मुकणारी अशी भरपूर लेकरं आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आहेत. म्हणून संघर्षाच आणि जमिनीवरच्या क्षमतेच प्रतीक असलेल्या 'एकलव्य'चं नाव घेऊन प्लॅटफॉर्म तयार करावा वाटला, हे नावही आपसूकच सुचलं. पुढच्या पिढीच्या ठेचा कमी व्हाव्यात; जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी, बहुजन समाजातील युवक कसे घेऊन शकतील हीच त्यामागची मुख्य प्रेरणा-हेतू-उद्देश आहे असं राजू सांगतो. 



राजूला काही महिन्यांपूर्वीच चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली आहे. यासाठी तो लंडनला गेला आहे. असं असलं तरी त्याचं काम मात्र सुरू आहे. "भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता" यावर तो संशोधन करत आहे. आता डिग्री झाली की लगेच परत येऊन नव्या दमाने काम सुरू करायचं आहे. परत आल्यावर परत एकदा काही महिने ग्राऊंडवर पिंजून काढायचेत असं राजू म्हणाला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.