Maharashtra Breaking News 31 march 2022: राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध एकमतानं हटवले, मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Mar 2022 10:49 PM
Sangli News Update : सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या खिशातील 50  हजाराचा बंडल चोरणाऱ्या चोरट्याला अटक

Sangli News Update :  सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या खिशातील 50  हजाराचा बंडल चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. सांगोला येथून 21 वर्षीय चोरट्यास मिरज पोलिसानी केली अटक केली आहे.  सांगलीत चार दिवसांपूर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात स्टेजवर जाऊन या चोरट्याने 50 हजार रूपयांची चोरी केली होती.  

Yavatmal News Update : यवतमाळमधील महागाव तालुक्यातील जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई-क्लासच्या जमिनीवरील जंगलाला आग 

Yavatmal News Update : यवतमाळमधील महागाव तालुक्यातील जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई-क्लासच्या जमिनीवरील जंगलाला आग लागली आहे.  शेतकऱ्यांनी शेतातला कचरा पेटवल्याने हा वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. या भागातील शेतकऱ्यांना शेतातील गुरे, आणि गोठ्यातील साहित्य हलवण्याच्या तहसीलदार विश्वंभर राणे यांनी सूचना दिल्या आहेत.  

अंबरनाथ येथील मलंगगड येथील खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग 

अंबरनाथ येथील मलंगगड येथील खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग लागली आहे. या आगीत वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

Ratnagiri News Update : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील राजापूर नजीक भीषण अपघात, दोन जण ठार

Ratnagiri News Update : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील राजापूर नजीक भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत अपघातानंतर  ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड तासांपासून ग्रामस्थांनी मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. 

Raigad News Update : उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग 

Raigad News Update : उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून  शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  

Pune : पुण्यात हेल्मेट सक्ती, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

पुण्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक असणार आहे. चार वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार असून हा आदेश 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.  जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाची सुरक्षितता, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये-जा करताना हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

School : राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून ही सुट्टी 12 जून पर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जुन पासून सुरु होणार आहे.

संपकरी ST कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातवेळा संधी दिली, आता यापुढे नाही - अनिल परब


Anil Parab : संपकरी ST कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातवेळा संधी दिली, आता यापुढे नाही. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरूवात करण्यात आलीय. कामावर न येणाऱ्यांना नोकरीला येण्याची गरज नाही असे परब म्हणाले.

Anil Parab : संपकरी कर्मचारी उद्यापासून कामावर रुजू न झाल्यास कारवाई करणार: अनिल परब

उद्यापासून जर संपकरी कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. 

  Gondia News Update :  थकित वेतनासाठी वन मजूराचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन

Gondia News Update : थकित वेतनासाठी वन मजूराने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले आहे. गोंदिया शहरातील कुवा येथील सामाजिक वनिकरणाच्या कार्यालय परिसरात हे आंदोलन केले आहे. गौरीशंकर चौहान असे आंदोलन करणाऱ्या वन मजूराचे नाव आहे.  

Washim News Update : वाशिमच्या चिखली गावाजळ जयपूर हैदराबाद एक्सप्रेसच्या एका डब्याला आग

Washim News Update :  वाशिमच्या चिखली गावाजळ जयपूर हैदराबाद एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली आहे. महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली  होती. अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली आहे.  

Rajesh Tope : उद्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले,  मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rajesh Tope :  उद्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली आहे. 

Dhule News Update :  सेवानिवृत्तीच्या दोन तास आधी गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

Dhule News Update : सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.  वाय. डी. शिंदे असे गटविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तर चुनीलाल देवरे असे सहाय्यक लेखा अधिकाऱ्याचे नाव आहे. धुळे जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.  

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एकमतानं हटवले, मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

Maharashra News :  राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एकमतानं हटवले अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे.

EV Vehicle : सोलापूरच्या प्रिसीजन कंपनीची इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात क्रांती

महाराष्ट्राच्या वाहन व्यवसायात मानाचा तुरा, सोलापूरच्या प्रिसीजन कंपनीची इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात क्रांती.


आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी प्रिसीजनकडून ड्रायव्हरलेस कंटेनरची निर्मिती, तब्बल 50 टन क्षमता असलेला कंटेनर पूर्णपणे ड्रायव्हर लेस.


नेदरलँडमध्ये प्रिसीजनने खरेदी केलेल्या ईमॉस कंपनीने या ड्रायवरलेस कंटेनरच्या इलेक्ट्रिफिकेशनचे केले संपूर्ण काम.


जगात पहिल्यांदाच 50 टन वजन क्षमता असलेली पहिलं ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कंटेनर असल्याचा प्रिसीजनचे कार्यकारी संचालक करण शाह यांचा दावा.


सध्यस्थितीत ईमॉच्या माध्यमातून 25 ड्रायव्हरलेस, रिमोट कंट्रोल गाड्यांची निर्मिती.


कामशाफ्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रिसीजन ग्रुपची इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती करणारे पाऊल.

Gadchiroli News Update : भरधाव ट्रकची स्कूलव्हॅनल धडक, दहा विद्यार्थी जखमी,  गडचिरोलीत नवेगाव येथील घटना 

Gadchiroli News Update : भरधाव ट्रकने विद्यार्यांच्या स्कूलव्हॅनल धडक दिली आहे. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.  गडचिरोलीत नवेगाव येथील एका खासगी शाळेची ही व्हॅन आहे. स्कूलव्हॅन दुरुस्तीसाठी उभी असताना, छत्तीसगडहून येणाऱ्या ट्रकने व्हॅनला धडक दिली. यामुळे स्कूलव्हॅन पलटी झाली. यात व्हॅनमधील दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.  

Nashik News : नाशिक करन्सी नोट प्रेसच्या आवारात आग, प्रेसच्या स्क्रॅप मटेरियलला आग लागल्याची प्राथमिक माहिती

Nashik News : नाशिकमधील करन्सी नोट प्रेसच्या आवारात दुपारी साडेबारा एकच्या सुमारास भीषण आग भडकली. प्रेसच्या मुख्य  इमारतीच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेततून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे  लोट आकाशाच्या दिशेने  उंचावत होते, प्रेसच्या स्क्रॅप मटेरियलला आग लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून अग्निशमन दलाचे जवान, उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

आर्यन खान प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं एनसीबीचा अर्ज अंशत: स्वीकारला

आर्यन खान प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं एनसीबीचा अर्ज अंशत: स्वीकारला


आरोपपत्र दाखल करण्यासाठी तपासयंत्रणेला 60  दिवसांची मुदतवाढ मंजूर


आरोपपत्र दाखल करण्याची मुदत येत्या शनिवारी संपणार होती


तपासात आणखी महत्त्वाच्या साक्षीदारांचा जवाब नोंदवणं बाकी असल्यानं एनसीबीनं मुदतवाढ मागितली होती


या प्रकरणात आर्यन खान सह 20 आरोपींना अटक करण्यात आली होती

Bhiwandi Mahapalika Budget : भिवंडी महापालिकेचा 842 कोटी 29 लाख 47 हजार रकमेचा अर्थसंकल्प महासभेत सादर

Bhiwandi Mahapalika Budget : भिवंडी महापालिकेचा सन 2022 - 23 या आर्थिक वर्षाचा 842 कोटी 29 लाख 47 हजार रुपये रक्कमेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत स्थायी समितीचे सभापती संजय म्हात्रे यांनी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मनपा आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या 822 कोटी  43 लाख 32 हजार रुपयाच्या  अर्थसंकल्पा मध्ये स्थायी समितीने तब्बल 20 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्या मध्ये महापौर निधी 2 कोटी , उपमहापौर व स्थायी समिती सभापती निधी प्रत्येकी 50 लाख, पाच प्रभाग समिती निहाय सभापतींना प्रत्येकी एक कोटी निधी , नगरसेवक निधी 8 कोटी 95 लाख 16 हजार तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुनर्बांधणी व सुशोभीकरणा साठी 3 कोटी रुपयांचा निधी अशी 20 कोटी रुपयांच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा हा अर्थसंकल्प महासभेत मंजूर करण्यात आला .तब्बल दोन वर्षांनी होणारी ऑफलाईन महासभा सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आली होती परंतु नगरसेवकांच्या अनुपस्थिमुळे तब्बल पावणे दोन तास उशिराने सभा सुरू झाली.

रत्नागिरीतील पर्सेसिन मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, चार ते पाच हजार मच्छीमार सहभागी

राज्य सरकारने काढलेला नवा मच्छीमारी कायदा हा मच्छीमारांसाठी मारक आहे. या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसिन मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छीमार सहभागी झाले होते. आम्हाला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महिने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छीमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारने फेरविचार करावा. अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत मंत्रालयावर धडकू असा थेट इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

यवतमाळमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 52 वर्षीय महिलेचा गुदमरुन मृत्यू
यवतमाळ शहरातील लोखंडी पूल परिसरात मध्यरात्री दरम्यान एका शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. या आगीमध्ये एका 52 वर्षीय महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला. रेखा विनोद पुट्टेवार असे मृत महिलेचे नाव आहे. पहाटे चारच्या सुमारास आग लागली. घराला लागून असलेल्या डीपीमुळे आग असल्याचे बोललं जात आहे. घटनेची माहिती पडताच नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. 
Nashik News : नवाब मलिक यांच्या संदर्भात नाशिकमध्ये ईडीने चौकशी केल्याची चर्चा 

Nashik News : नवाब मलिक यांच्या संदर्भात नाशिकमध्ये ईडीने चौकशी केल्याची चर्चा 


नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या भंगार मार्केट मधील काही व्यावसायिकांची काही दिवसांपूर्वी झाली चौकशी?


अंबड सातपूर लिंक रोडवर वसालाय भंगार व्यवसाय , या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांचे मलिक यांच्याशी संबंध आहेत का? याची चौकशी झाल्याची चर्चा


स्थानिक पोलीस यंत्रणांना माहिती नाही

Nagpur Bus Fire : नागपूरच्या मेडिकल चौकाजवळ महापालिकेच्या 'आपली बस' सेवेतील एका बसला आग

नागपूरच्या मेडिकल चौकाजवळ महापालिकेच्या आपली बस सेवेतील एका बसला आज सकाळी आग लागली....


उमरेड रोड वरील तीतुर येथून सिताबर्डी ला जाणारी ही बस संगम हॉटेल समोरून जात असताना अचानकच ड्रायव्हरच्या केबिनमध्ये धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले...


जेव्हा ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आग लागली तेव्हा बसमध्ये 45 प्रवासी होते... 


ड्रायव्हर सह सर्व प्रवासी लगेच खाली उतरले... त्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही, कोणतीही जीवित हानी झालेली नाही...


अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले....


विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसात नागपुरात महापालिकेच्या आपली बस सेवेतील बसला आग लागून बस जळून खाक झाल्याची ही दुसरी घटना आहे... सुमारे दहा दिवसांपूर्वी गित्तीखदान परिसरातही आपली बस सेवेतील एक बस अशाच पद्धतीने जळून खाक झाली होती...

Kolhapur News : धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याविरोधात महिलांचे आंदोलन

Kolhapur News : धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याविरोधात महिलांचे आंदोलन


कोल्हापूरच्या ताराराणी चौकात काळे झेंडे घेऊन महिला रस्त्यावर


महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले होते

Ratnagiri News : रत्नागिरी- नवीन मच्छीमारी कायद्याविरोधात पर्ससीन मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी- नवीन मच्छीमारी कायद्याविरोधात पर्ससीन मच्छिमार आक्रमक


नवीन मच्छिमारी कायद्याला विरोध करण्यासाठी पर्ससीन मच्छिमार रस्त्यावर


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


हजारोंच्या संख्येने मच्छिमार रस्त्यावर

धुळे : ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यास वाहनाचा परवाना रद्द होणार, जिल्हा पोलीस कठोर कारवाई करणार
ड्रिंक अँड ड्राईव्ह करुन वाहने चालवणाऱ्यांवर धुळे जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. मद्य पिऊन वाहन चालवताना आढळून आल्यास खटले दाखल करुन त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी राज्य परिवहन विभागास प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात 2021-22 या कालावधीत अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यात आतापर्यंत 350 हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामध्ये 370 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांच्या तपासाअंती वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जानेवारी ते मार्च तीन महिन्यात तब्बल 76 अपघात झाले असून  हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांचा वाहन परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली 
Satisj Uke : वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची छापेमारी

नागपूरचे वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यावर एका 60 वर्षीय वृद्ध महिला शोभाराणी नलोडे यांना धमकावून त्यांची दीड एकर जमीन स्वतःच्या आणि स्वतच्या भावाच्या नावावर केल्याचा आरोप आहे... नागपुरात मौजा बाबुलखेडा याठिकाणी असलेली ही दीड एकर जागा कोट्यवधी रुपयांची आहे... काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने एडवोकेट सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती... सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले..  अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलं होतं.. मात्र सतीश उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती....

Buldhana Mehkar News : मेहकरमधील उपविभागीय अधिकारी शासकीय कार्यालयाला आग; निवडणूक विभाग, निबंधक विभाग जळून खाक 

Buldhana Mehkar News : जिल्ह्यातील मेहकर येथील आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी शासकीय कार्यालयाला अचानक आग लागली.   अग्निशामन वाहन येईपर्यंत कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असल्याची माहिती आहे. तसेच याच इमारतीमध्ये अनेक विभाग असल्याने उपनिबंधक विभाग, आपत्ती व्यवस्थानपन विभाग व निवडणूक विभागातील सर्व फाईल्स व कागदपत्रे जळून गेली आहेत.  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

हिंगोलीतील वसमतमधील तीन पंपावरील पेट्रोल साठा संपला, उर्वरित पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी
हिंगोली : वसमत शहरात चार पेट्रोल पंप आहेत त्यापैकी तीन पेट्रोल पंपावरील पेट्रोल आज संपले. त्यामुळे उर्वरित एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी बुधवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसायिकांना मोठी आर्थिक तरबेज करुन पेट्रोल खरेदी करावी लागत आहे. त्यामध्ये पेट्रोल खरेदी करत असताना काही वेळा उशीर होत असल्याने पेट्रोल पंपावरच पेट्रोलचा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी अशापद्धतीने पेट्रोल खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच वसमत शहरामध्ये पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी देखील पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी केली आहे. 
Petrol Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच

Petrol Diesel Price Today 31th March : देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीचं सत्र सरु आहे. आजही देशात पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. 

DA Hike : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता राज्यांनेही त्याचं अनुकरण केलं आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरु तो 31 टक्क्यांवर नेला आहे. 

Aadhaar-PAN Link: आजच पॅन कार्ड करा आधारशी लिंक, एक एप्रिलनंतर भरावा लागेल मोठा भुर्दंड

आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar-PAN Link) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी नक्की करा, अन्यथा तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


सरिस्कातील आग नियंत्रणात, आगीकडे दुर्लक्ष करुन अंजली तेंडुलकरांना जंगल सफारी घडवणारे सीसीएफ मीणा निलंबित


जयपूर: राजस्थानमधील सरिस्का अभयारण्यात गेल्या चार दिवसांपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 700 हेक्टरहून जास्त जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ही आग वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पसरली असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या आगीकडे दुर्लक्ष करत अंजली तेंडुलकरांच्या गाडीचे ड्रायव्हिंग करणाऱ्या सीसीएफ आर एन मीणा या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. 


रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास या जंगलात आग लागली होती. या आगीची माहिती काही वेळेतच वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. परंतु या दरम्यान सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या व्हीआयपी पाहुण्याच्या सेवेत सर्व अधिकाऱ्यांचा लवाजमा उतरला होता. त्यामुळे या आगीची तीव्रता या अधिकाऱ्यांना समजली नसेल किंवा त्यांनी सोपस्कररित्या याकडे दुर्लक्ष केलं असेल. व्हीआयपी पाहुण्याचे सेवेमध्ये लागलेले हे अधिकारी जंगलातील आग विझवायला विसरले. 


Aadhaar-PAN Link: आजच पॅन कार्ड करा आधारशी लिंक, एक एप्रिलनंतर भरावा लागेल मोठा भुर्दंड


आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar-PAN Link) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी नक्की करा, अन्यथा तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे.


दंड भरून 31 मार्चनंतरही लिंक करू शकता आधार-पॅन कार्ड


पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मात्र त्यानंतरही तुम्ही दंड भरून आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. सीबीडीटीने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, 31 मार्चनंतरही आधार आणि पॅन लिंक करता येईल, मात्र त्यानंतर दंड भरावा लागेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.