Maharashtra Breaking News 30 May 2022 : राज्यसभेसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, अनेकांचा पत्ता कट

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2022 11:16 PM
राज्यसभेसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, अनेकांचा पत्ता कट

राज्यसभेसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर


भाजपकडून अनेक दिग्गजांचा, पक्षातल्या निष्ठावंतांचा पत्ता कट


केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेवर संधी नाही


पुढच्या सहा महिन्यात नक्वी यांना सदस्यत्व राखता आले नाही तर मंत्रीपदही गमवावे लागणार


महाराष्ट्रातून संघ विचारसरणीशी एकनिष्ठ असलेले विनय सहस्त्रबुद्धे यांचाही पत्ता कट

समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. आर्यन खानच्या आरोपपत्र प्रकरणात त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यांना करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आले आहे

धक्कादायक! महाड येथे  सहा चिमुकल्या मुलांची विहिरीत टाकून हत्या

महाड येथे  सहा चिमुकल्या मुलांची विहिरीत टाकून हत्या....


महाड तालुक्यातील ढालकाठी गावातील घटना..


सर्व मृतदेह बाहेर काढण्यात पोलीसांना यश...

सोलापुरात आई आणि मुलाने एकाचवेळी घेतला गळफास; कारण अद्याप अस्पष्ट

सोलापुरातील शेळगी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळगी परिसरात राहणाऱ्या एका आई आणि मुलाने एकाच वेळी साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या घटनेतील मृत आईचे वय हे 62 वर्ष असून मुलगा दिग्विजय याचे वय 42 वर्षे आहे. आज सकाळी ही उघडकीस आली असून यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृत पुराणिक यांच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी घरात सामसूम दिसत असल्याने  आत डोकावून पाहिले. यावेळी दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. दोन्ही मृतांवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली असून पोलिसांकडून कारणांचा शोध घेतला जात आहे.

टेम्पो खाली चिरडून दिड वर्षीय मुलीचा मृत्यू
गॅस टाक्या ने भरलेला टेम्पो पाठीमागे घेत असताना दीड वर्षीय मुलीचा टेम्पो खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना पुरुषोत्तम पुरी येथे रोजी  घडली.

 

योगायोग गॅस एजन्सी माजलगाव येथून गॅस टाक्या घरपोच करणाऱ्या टेम्पो पुरुषोत्तम पुरी येथे गेला होता त्या टेम्पोतून गॅस टाक्या खाली केल्यानंतर  टेम्पो  पाठीमागे घेत असताना टेम्पो च्या पाठीमागे किराणा दुकानावर जात असलेली कु.राजवी शिवाजी आळणे वय दीड वर्षे मुलगी टेम्पो चालकाला न दिसल्याने त्या मुलीचा टेम्पो क्र.एम.एच.४४ यु.११६६ खाली चिरडून  जागीच मृत्यू झाल्याची घटना पुरुषोत्तम पुरी येथे घडली
Nashik News : नाशिक शहरात पेट्रोल पंपावर तोबा गर्दी, उद्याच्या देशव्यापी संपाचा धसका

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कमी प्रमाणात इंधनाचा पुरवठा होत असल्याने उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र ग्राहकांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी दोन दिवसांचा साठा करावा असे आवाहन पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने पेट्रोल पंप चालकांना केले आहे. असे असताना मात्र नाशिक शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे.



राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी 


राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफीसला फोन करुन रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा अज्ञाताचा इशारा


राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाला धमकीचा फोन आल्याची माहिती


धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही


धमकीचा मागील काही दिवसांतील हा तिसरा फोन


'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती

Avinash Bhosle : अविनाश भोसलेंच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण, सीबीआय कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला

Avinash Bhosle : अविनाश भोसलेंच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे उद्या फैसला सुनावणार  आहे.  अविनाश भोसलेंची रवानगी पुन्हा नजरकैदेत केली आहे. 

Nashik : हनुमान जन्मस्थान वाद, गोविंदनंद सरस्वती यांच्या शोभयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली

गोविंदनंद सरस्वती यांच्या शोभयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली. नाशिकच्या मुक्तीधाम मंदिरापासून महर्षी पंचायतन सिद्ध पिठापर्यंत ही शोभायात्रा निघणार होती. शहरात 144 कलम लागू आसल्याने 12 जून पर्यंत मोर्चे, आंदोलनं, शोभायात्रेला परवानगी नाही.  गोविंदनंद यांचे स्वागत पंचायतन सिद्धपिठाजवळ होणार आहे, मात्र शोभायात्रा निघणार नाही.

Nanded: अयोध्येत ही खोदले, पण बौद्धांचेच अवशेष सापडलेत: चंद्रशेखर आझाद

ज्ञानव्यापी मशीदीवरून  देशात सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनीही उडी घेतली असून देशात कुठेही कितीही खोदा, जिकडे तिकडे तुम्हाला बुद्धच सापडेल. जर भाजपाने हे वेळीच थांबवलं नाही, तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत न्यायालयात जाऊ, असा सज्जड दम चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारला दिलाय. तर तिरुपती येथील मंदीर असो, अथवा शिरधामपूर असो या मंदिरावर दावा करीत आम्ही न्यायालयात जाऊ, इथेही बुद्ध वारसा मिळेल, असे मत चंद्रशेखर आझाद म्हणाले. तर हनुमान चालीसावर वाद घालणारे व स्वतःला दलित म्हणून घेणाऱ्या खासदार यांचे जातीचे प्रमाणपत्र ही बोगस असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

BJP : शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्या विरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा

BJP : भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे यांच्याकडून महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दीपाली सय्यद यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी अशी भाजपची मागणी आहे.

UPSC  2021 परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

UPSC Result : UPSC  2021 परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

Hanuman Birth Place Controversy : हनुमान जन्मस्थळावरून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर साधू महंतांचे रास्ता रोको आंदोलन

Hanuman Birth Place Controversy : नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर येथील साधू महंतांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. अंजनेरी फाट्यावर नाशिक मधील साधू महंत आणि एकत्र आले असून त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. हनुमानाचा जन्म अंजनेरी मध्येच झाल्याचा दावा नाशिकमधील गावकरी आणि साधू महंत करीत आहेत. 

Mumbai News : ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, ठाण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा

Mumbai News : ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी. ठाण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा. कांजूरमार्ग ते मुलुंड वाहतुकीचा खोळंबा. जेव्हीएलआर जाणारी मार्गिका मेट्रोच्या कामाकरीता बंद केल्याने आठवड्यांच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी.

Maharashtra News : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क वाहनधरकाला कानशिलात लागावली

Maharashtra News : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क वाहनधरकाला कानशिलात लागावली. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर हा प्रकार घडला.आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी आले होते.यावेळी ते ट्राफिक मध्ये अडकले त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करून देताना पोलिसांना  चांगलाच घाम फुटला.त्यामुळे संतप्त झलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट कानशिलातच लागावली.

कोल्हापुरात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रस्ता मोकळा करुन देताना पोलिसाने वाहनचालकाच्या कानशिलात लगावली

Kolhapur News : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रस्ता मोकळा करुन देताना एका पोलिसाने चक्क वाहनधरकाला कानशिलात लागावली. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर हा प्रकार घडला. जितेंद्र आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी आले होते. यावेळी ते ट्रॅफिकमध्ये अडकले. त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करुन देताना पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे संतप्त झलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट कानशिलातच लगावली.

Pandharpur Wari 2022 : आषाढीपूर्वी वाखरीमधील 100हून अधिक स्वच्छतागृहांवर चोरांचा डल्ला

Pandharpur Wari 2022 : दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी वारीला (Ashadhi Ekadashi 2022) विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. महिनाभर आधीपासूनच तयारीला लागणाऱ्या प्रशासनाला चोरट्यांनी दणका दिला असून वाखरी येथील सर्वात मोठ्या पालखी तळावर वारकऱ्यांसाठी असलेल्या 100 पेक्षा जास्त स्वच्छतागृहांची दारंच चोरट्यांनी पळवल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वाखरी येथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका यांच्यासह अनेक मानाच्या पालख्यांचा अखेरचा मुक्काम असल्यानं येथे जवळपास 10 लाख भाविक मुक्कामाला असतात. या भाविकांची सोय होण्यासाठी येथे जवळपास 750 पक्की स्वच्छतागृहं उभारण्यात आलेली आहेत. मात्र प्रशासन वारकऱ्यांच्या सुविधेची तयारी करत असताना अज्ञात चोरट्यांनी जवळपास 100 स्वच्छतागृहांची लोखंडी दारं गॅस कटरच्या सहाय्यानं कापून नेल्यानं आता याची पुन्हा नव्यानं उभारणी करावी लागणार आहे. एका बाजूला नवीन चार पदरी रस्त्यामुळं पालखी मार्गावर अनेक अडचणी सोडवताना प्रशासन मेटाकुटीला आलं आहे. यातच आता वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहांच्या दारांची चोरी झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पिंपरीतील रावेत परिसरात भरधाव ट्रकने रस्त्यावर पट्टे मारत असलेल्या कामगारांना उडवलं; एकाचा मृत्यू, चार जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने रस्त्यावर पट्टे मारत असलेल्या कामगारांना उडवलं. ही घटना पहाटेच्या सुमारास रावेतच्या समीर लॉन्सजवळ घडली. यामध्ये एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व कामगार राजस्थानमधील आहेत. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत. साजीद खान असं 25 वर्षीय मृताचं नाव असून संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी जखमींची नाव आहेत. यातील काहींच्या अंगावर मार्गांवर पट्टे मारण्याचे गरम रंग सांडल्याने त्यांना अनेक ठिकाणी चटके बसले आहेत.

शहापूरमधल्या कसारा खदाणीत मायलेकी बुडल्या; नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू, बचावलेल्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु

Shahapur News : शहापूर तालुक्यातील कसारा इथल्या खदानीत मायलेकी बुडाल्या. आईला वाचवण्या यश आले असून नऊ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औढानागनाथ इथलं कुटुंब मोलमजुरीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील कसारा सावरवाडी इथे आलं होतं. कपडे धुण्यासाठी खदानीत गेले असता पाय घसरुन काजल ज्ञानेश्वर पवार ही नऊ वर्षीय मुलगी बुडत होती. तिला वाचवण्यासाठी गेलेले तिची आई वर्षा ज्ञानेश्वर पवार ही देखील खदाणीच्या पाण्यात बुडाली. आरडाओरड झाल्याने पाड्यातील लोकांनी मायलेकीला पाण्याबाहेर काढलं. तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने काजल पवार या नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. आईवर उपचारासाठी शहापूर इथल्या जिल्हा उपरुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

ज्वेलरी शॉपमधून हातचालाखीने सोने लंपास करणाऱ्या दोन महिलांना अटक, 300 CCTV कॅमेऱ्यांचं फूटेज तपासल्यानंतर दोघींना बेड्या

Aurangabad News : औरंगाबाद शहरातील नामांकित ज्वेलरी शॉपमधून हातचालाखीने सोने लंपास करणाऱ्या दोन महिलांना औरंगाबाद शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. चोरी करुन सिनेस्टाईल फरार होणाऱ्या या महिलांचा पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरु होता. मात्र एखाद्या चित्रपटातील चोराप्रमाणे त्या सिनेस्टाईल फरार होत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यांनतर पोलिसांनी तब्ब्ल तीनशे सीसीटीव्ही कॅमरे तपासात सखोल तपासाअंती या दोन्ही महिलांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. बुशरा परवीन शेख नईम, मुन्नी बेगम हुसेन खान असे आरोपी महिलांची नावं असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Maharashtra 11th Admission 2022 : अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात

Maharashtra 11th Admission 2022 : अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भाग 1 भरायला सुरवात होणार.  मुंबई महानगर, पुणे , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.

Maharashtra News : परिचारिकांची बेमुदत संपाची हाक

Maharashtra News : परिचारिकांच्या आंदोलनाची धार आता आणखी तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. कारण आंदोलकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळें मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या पूढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या परिचारिकांची संख्या रोडावली असल्यामुळे मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांत हीच परिस्थिती पाहिला मिळतं आहे. या सर्व परिचारिकांनी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास विरोध केला आहे.

Rajya Sabha Election 2022 : काँग्रेसकडून पुन्हा आयात उमेदवाराला संधी, इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी

Rajya Sabha Election 2022 : कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसने  विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यसभेकरता तरुणांना संधी देण्याचा कॉंग्रेसचा मानस आहे. उदयपूर चिंतन शिबिरात देखील तरूणांना संधी देण्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. इम्रान प्रतापगडींसोबत कन्हैय्या कुमार, बी.व्ही श्रीनिवास यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, कॉंग्रेसच्या गोटातून महाराष्ट्रातील जागेसाठी इम्रान प्रतापगडींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 




 


Rajya Sabha 2022 : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक अर्ज भरणार

Rajya Sabha 2022 : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे आपल्या उमेदवारीचे अर्ज आज भरणार आहेत. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप हे आमने-सामने आले असून शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार आहेत. 

Somvati Amavasya 2022 : आज सोमवती आमावस्या, जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा

Somvati Amavasya 2022 : जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती आमावस्याला भरते. आज आमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक कालपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील. दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल. सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती. पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा भरणार आहे. यात्रेला 4 ते 5 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज सोमवती आमावस्या, जेजुरीच्या खंडेरायाची मोठी यात्रा
जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती आमावस्याला भरते. आज आमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक कालपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील. दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल. सोमवती आमवास्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. गेली दोन वर्षे ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती. पंरतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा भरणार आहे. यात्रेला 4 ते 5 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक अर्ज भरणार
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे आपल्या उमेदवारीचे अर्ज आज भरणार आहेत. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप हे आमने-सामने आले असून शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार आहेत. 


काँग्रेसकडून पुन्हा आयात उमेदवाराला संधी, इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी
कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेसने  विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यसभेकरता तरुणांना संधी देण्याचा कॉंग्रेसचा मानस आहे. उदयपूर चिंतन शिबिरात देखील तरूणांना संधी देण्याबाबत प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. इम्रान प्रतापगडींसोबत कन्हैय्या कुमार, बी.व्ही श्रीनिवास यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, कॉंग्रेसच्या गोटातून महाराष्ट्रातील जागेसाठी इम्रान प्रतापगडींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 


अविनाश भोसलेंना जेल की बेल? रीमांडला विरोध करणाऱ्या याचिकेवर सीबीआय बाजू मांडणार
सीबीआयच्या नजरकैदेत ठेवलेल्या अविनाश भोसलेंना आज पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. भोसले सध्य् सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात आहेत. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रीमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्यावतीनं रीमांडला विरोध करण्यात आलाय. भोसलेंच्या रीमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआय आज कोर्टात आपली भुमिका मांडणार.


परिचारिकांची बेमुदत संपाची हाक
परिचारिकांच्या आंदोलनाची धार आता आणखी तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. कारण आंदोलकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळें मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील ज्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या पूढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या परिचारिकांची संख्या रोडावली असल्यामुळे मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांत हीच परिस्थिती पाहिला मिळतं आहे. या सर्व परिचारिकांनी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास विरोध केला आहे.


अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात
अकरावी प्रवेशसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भाग 1 भरायला सुरवात होणार.  मुंबई महानगर, पुणे , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी व अर्जाचा भाग एक भरण्यासाठी सुरवात होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळवायचा आहे तसेच अकरावी प्रवेशाचा भाग 1, ऑनलाइन शुल्क व अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.