Maharashtra Breaking News 28 July 2022 : बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती घेतली, मनोहर जोशींची भेट घेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोनिया गांधी स्मृती इराणींशी उद्धटपणे वागल्या. त्यांच्या नेत्याने चूक केल्यानंतर आम्ही त्यांच्या माफीची मागणी नाही का करणार? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा हल्लाबोल
बंगाली असल्यामुळे हिंदीत चूक झाली असं अधीर रंजन म्हणतात पण मग ही चूक काँग्रेस नेत्यांसोबत बोलताना कशी होत नाही..नेमकी आदिवासी महिलेसोबतच बोलताना चूक कशी होते भारती पवार यांचा खडा सवाल
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी 29 जुलै रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे सकाळी 11 वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाची सोडत काढल्यानंतर शनिवार 30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार 30 जुलै ते मंगळवार 2 ऑगस्ट या कालावधीत दुपारी 3 वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.
नागपूरः कोरोनाच्या चौथ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यावर पुन्हा दररोज अडीचशेवर रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. गुरुवारी जिल्ह्यात 269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यात शहरातील 164 तर ग्रामीणमधील 105 बाधितांचा समावेश आहे. आज 247 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सोबतच आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 78 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, जोशी यांना भेटून बाळासाहेबांना अपेक्षित योजनांची माहिती त्यांच्याकडून घेतली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सर्व्हर सकाळपासून डाऊन झालं होतं. ज्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. बराच वेळ सर्व्हरला प्रॉब्लेम आल्यामुळे एमसीए कार्यालयात व्हेरिफिकेशनसाठी पोहोचलेली मुलं आणि पालकांना दिवसभर खोळंबून रहावं लागलं. पण आता सर्व्हर पूर्वरत झालं आहे.
आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाजवळ प्रदर्शन करणाऱ्या 13-14 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरे कारशेड प्रकल्पात झाडांची कापणी सुरु झाल्यानंतर पर्यावरणवादी आणि आरे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांचा आरे मेट्रो प्रकल्पाजवळ मोठा बंदोबस्त आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर भागामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या भागात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा, पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आरे मेट्रो कारशेड संदर्भातील सुनावणी हायकोर्टाकडून तीन आठवड्यांसाठी तहकूब, सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार असल्यानं हायकोर्टाचे निर्देश, कारशेडची जागा, वृक्षतोड, वन्यजीव, पर्यावरण संवर्धन यासंह इतर काही मुद्यांवर पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतलीय धाव
सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा नकार, निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांना दुस-या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती, याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांच्याकडून मात्र आरोपांचं खंडन, सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच असल्याचा केंद्र सरकारचा दावा
Mumbai News : सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा नकार
निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश
याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती
याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांच्याकडून मात्र आरोपांचं खंडन
सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच असल्याचा केंद्र सरकारचा दावा
Mumbai News : सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा नकार
निवृत्त एसीपी राजेंद्रकुमार त्रिवेदी यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश
याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याची माहिती
याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांच्याकडून मात्र आरोपांचं खंडन
सीबीआय संचालकपदी झालेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीरच असल्याचा केंद्र सरकारचा दावा
आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते लीलाधर डाकेंची भेट, याआधी गजनान किर्तीकर यांच्या भेटीला मुख्यमंत्री घरी गेले होते. लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरेंपासूनचे शिवसैनिक आहेत. जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवार दिनांक 28 जुलै 2022 रोजीचे कार्यक्रम
दुपारी १२.३० वाजता:
मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासाबाबत आढावा बैठक
स्थळ: सह्यादी राज्य अतिथीगृह, मुंबई
दुपारी १.४५ वाजता:
ठाणे जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक
स्थळ: सह्यादी राज्य अतिथीगृह, मुंबई
सायंकाळी ४.३० वाजता:
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आयोजित 'उज्वल भारत उज्वल भविष्य पॉवर' ऊर्जा महोत्सव समारंभास दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थिती
स्थळ: सह्यादी राज्य अतिथीगृह, मुंबई
Parbhani News : राज्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा केव्हा सुधारणार असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा गावात पोषण आहारात अळ्या आणि किडे निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा गावातील अंगणवाडी क्रमांक दोनमध्ये मुलांना शालेय पोषण आहारात उकडलेले वाटाणे देण्यात आले होते. मात्र या वाटाण्यांमध्ये अळ्या आणि किडे निघालेले काही विद्यार्थ्यांना दिसले. त्यावेळी काही पालकांनाही बाब सांगितली. मात्र तोपर्यंत अनेक जणांनी हे वाटाणे खाल्ले होते. पालकांनी अंगणवाडीत जाऊन ही बाब पाहिली आणि त्याचे व्हिडीओ काढत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
Gondia News : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ काल (27 जुलै) रात्री झालेल्या अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे चारही तरुण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील आहेत. आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी एका चार चाकी वाहनाने गेले होते. हे सोलर फिटींगचे कामे आटोपून हे पाच तरुण रात्री परत येत असताना अचानक गाडी अनियंत्रित झाली. यावेळी गाडीमध्ये असलेल्या पाच तरुणापैकी चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात 24 वर्षीय प्रदीप बिसेन हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांमध्ये 24 वर्षीय रामकृष्ण बिसेन, 24 वर्षीय सचिन कटरे, 18 वर्षीय संदीप सोनवाने आणि 27 वर्षीय निलेश तुरकर यांचा समावेश आहे.
Sanjay Raut: संविधानाची सीमा ओलांडून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर धरणातील विसर्गही घटविण्यात आला आहे तर काही धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरणांच्या पाणलोट संक्षेत्रात पावसाने ब्रेक घेतल्याने विसर्ग घटविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. अनेक मंदिरे दिसू लागली आहेत.
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील विनापरवाना किटकनाशकांची विक्री करणाऱ्या साईरामा हार्डवेअरवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा घालला. या कारवाईत 5 लाख 83 हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचून साईरामा हार्डवेअर या दुकानावर छापा घातला. विनापरवाना आणि अवैधरित्या किटकनाशके विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. दुकान मालक रोशन गजानन पाटील याच्याविरुद्ध धामणगाव बढे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
28th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 जुलैचे दिनविशेष.
28 जुलै : कॉमनवेल्थ गेम्स.
2022 कॉमनवेल्थ गेम्स, अधिकृतपणे XXII कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखले जातात आणि सामान्यतः बर्मिंगहॅम 2022 म्हणून ओळखले जातात, हे कॉमनवेल्थच्या सदस्यांसाठी एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे जी 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहे. लंडन 1934 आणि मँचेस्टर 2002 नंतर इंग्लंडने तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवताना 21 डिसेंबर 2017 रोजी बर्मिंगहॅमला यजमान म्हणून घोषित केले.
28 जुलै : World Hepatitis Day
हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.
28 जुलै : आषाढी अमावस्या
या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिन :
दरवर्षी 28 जुलै रोजी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day)’ साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येतो.
1821 साली पेरू देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं.
1968 साली नोबल पारितोषिक विजेता रेडिओएक्टिव्हिटी आणि रेडिओकेमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हॅन(Otto Hahn) यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :
- 24th July 2022 Important Events : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
- Important Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -