Maharashtra Breaking News 27 July 2022 : वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूरः शहरातील मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडून चिखली फ्लायओव्हरवर बाईकवर येणाऱ्या दोघांनी 20 लाखांची रोकड पळविली. सिद्धार्थ रामटेके नावाचा मिरची व्यापाऱ्याचा कर्मचारी कळमना बाजारपेठेतून एका व्यापाऱ्याकडून वीस लाख रुपयांची रोकड घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. तो पाऊस येत असल्यामुळे थांबला. त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या दोन लुटारुंनी सिद्धार्थला मारहाण करत त्याच्याकडील रोकड पळविली. ही घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली फ्लायओव्हर घडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी समोर येत आहे. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना ही विषबाधा झाली आहे. काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज काही महत्त्वाच्या बैठका असल्यामुळे ते दिल्लीला जाणार नाहीत. त्याऐवजी ते उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता.
सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी विषबाधा झाली. काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाल्याची माहिती.
नागपूरः जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण म्हणजचे तब्बल 291 नव्या कोरोना बाधितांची नोंद बुधवारी प्राप्त अहवालानुसार करण्यात आली. बाधितांपैकी 108 ग्रामीणमधील तर 183 बाधित शहरातील आहेत. सध्या जिल्ह्यात 1644 कोरोना बाधित सक्रिय आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे.
Maharashtra Cabinet Meeting : लोणार सरोवर संवर्धनासाठी 370 कोटी रूपये निधी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Uddhav Thackeray Birthday : शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांचा आज पहिलाच वाढदिवस. त्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम यात्रा होर्डिंग्सबाजी केली जात आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देखील दिला जात आहेत. पण कोकणातील बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी शहरात मात्र उलट चित्र दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असला तरी शहरात ना कार्यक्रमाचे आयोजन केले गेले, ना होर्डिंग्स लावले गेलेत, ना वृत्तपत्रांमधून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. गेल्या वर्षी मात्र याच्या उलट चित्र आपणाला शहरात दिसून येत होतं.
Solapur News : सोलापुरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोलापूर की खड्डेपूर अशी अवस्था शहराची झाली आहे. एबीपी माझाने देखील काही दिवसांपूर्वीच सोलापूरची ही अवस्था दाखवली होती. आज खड्ड्यामुळे त्रस्त असणारा नागरिकांनी देखील या विरोधात आवाज उठवला. खड्ड्यामुळे त्रस्त असणाऱ्या सोलापूरकरांनी सह्यांची मोहीम घेतली. जड वाहतूक कृती समितीकडून ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवरती मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोख्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे. याला वाहनधारकांकडून हे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Solapur News : सोलापुरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोलापूर की खड्डेपूर अशी अवस्था शहराची झाली आहे. एबीपी माझाने देखील काही दिवसांपूर्वीच सोलापूरची ही अवस्था दाखवली होती. आज खड्ड्यामुळे त्रस्त असणारा नागरिकांनी देखील याविरोधात आवाज उठवला. खड्ड्यामुळे त्रस्त असणाऱ्या सोलापूरकरांनी सह्यांची मोहीम घेतली. जड वाहतूक कृती समितीकडून ही मोहीम राबवण्यात आली. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवरती मोठ मोठे खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोख्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे. याला वाहनधारकांकडून हे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Pandharpur News : शिवसेनेशी गद्दारी केलेल्या बंडखोरांना सुबुद्धी देऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याना उदंड दीर्घायुष्य लाभावे असे साकडे आज पंढरपूर विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विठुरायाच्या चरणी घातले . उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे , उपजिल्हा प्रमुख जयवंत माने , शहर प्रमुख रवी मुळे , तालुका प्रमुख संजय घोडके यांच्यासह विभागातील शेकडो पास अधिकाऱ्यांनी आज विठूरायाची तुळशीपूजा करून विठुरायाला साकडे घातले . यावेळी विठ्ठल मंदिराबाहेर देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पंढरपूर विभागातील केवळ दोन पदाधिकारी गेले असून बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत
नागपूरः गेल्या आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार सोडले तर दररोज काही न काही प्रमाणावर नागपुरात पावसाने हजेरी लावली. मात्र आज बुधवारी दुपारनंतर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.
Amravati News : मेळघाटात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात... टेम्ब्रूसोडा नजीक वळनावर क्रूझर वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळली.. अपघातात एकाचा जागीच मृत्यू, 15 जण गंभीर तर 17 ते 18 जण जखमी..
आदिवासी मजुरांना कामासाठी एकाच वाहनात 35 हुन अधिक मजूर होते..
जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल..
जीव धोक्यात टाकून 15 ची क्षमता असलेल्या वाहनात बसले होते 35 पेक्षा अधिक मजूर...
Mumbai News : औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे
Mumbai News : औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे
Mumbai News : औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे
मुंबईः मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड मधील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर पाच कैद्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. 23 जुलै रोजी रात्री ही घटना घडली. कैद्यांवर वचक बसविण्यासाठी पठाणने अनेकवेळा दादागिरी केल्याची माहिती आहे. त्यावरुन त्याच्याच बराकमधील पाच कैद्यांनी शाहरुख पठाणला चोप दिला. हल्ल्यानंतर सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर शिंदे यांना शिवसेनेच्या डोंबिवली मधील पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिलं होतं .या पार्शवभूमीवर शिंदे गटाला शिवसेनेने कल्याण पाठोपाठ डोंबिवलीत देखील धक्का दिला आहे . शिवसेना जिल्हा प्रमुख पदी सदानंद थरवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर डोंबिवली शहर प्रमुख पदी विवेक खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष राज्यभरात पाहायला मिळतोय .शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेकडून उचलबांगडी करण्यात येत आहे. शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने काही दिवसांपूर्वी कल्याण शहर प्रमुख व आमदार विश्वनाथ भोईर यांची शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी करत कल्याण शहर प्रमुख पदी सचिन बासरे यांना संधी देण्यात आहे.डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिलाय तर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदे गटाची वाट धरली होती .या पार्शवभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बांधणीवर जोर दिलाय .शिवसेना जिल्हा प्रमुख पदी कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले सदानंद थरवळ यांची नियुक्ती करण्यात आली .थरवळ यांच्यावर डोंबिवली,कल्याण ग्रामीण विधानसभेची जबाबदरी देण्यात आली आहे .तर डोंबिवली शहर प्रमुख पदी विवेक खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .विवेक खामकर यांनी याआधी उपशाखा प्रमुख ,शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ,उपशहर प्रमुख , शिवसेनेच्या युनियनमध्ये विविध पदावर कार्य केलं आहे .कल्याण पूर्व शहर प्रमुख पदी शरद पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे .
Pune News : पुण्यात महिला वकिलाकडे पाहून गाणं म्हणणं एका वकिलाला चांगलंच महागात पडले आहे. आपल्या ज्युनिअर वकिलाच्या विनयभंगाप्रकरणी अॅड. धर्मराज विनायक जाधव (वय 40 वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने केलेल्या आरोपानुसार, "जाधव हे फिर्यादीकडे पाहून मौसम मस्ताना है गाणे म्हणत किस मागतला. तसेच आरोपीने फिर्यादीच्या छातीला हात लावून मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं."
Yavatmal News : यवतमाळ लगत असलेल्या करळगाव येथे गिट्टी खदानीच्या डबक्यात बुडाल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपाली शिंदे आणि भोला असे मृत मायलेकाचे नाव आहे. मूळचे नांदेडच्या इस्लामपूर येथील हे कुटुंब करळगाव येथे एका शेतात कामासाठी वास्तव्यास आले होते. रुपाली शेतालगत असलेल्या गिट्टी खदानीच्या डबक्यात कपडे धुण्यासाठी नेहमीप्रमाणे मुलगा भोला याच्यासोबत गेली. यावेळी मुलगा आंघोळीसाठी जातो असे म्हणून पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो डबक्यात बुडू लागला. त्याला डबक्यात बुडताना पाहून रुपालीने पाण्यात उडी घेतली. मात्र तीही पाण्यात बुडाली असा कयास बांधला जात आहे. पत्नी घरी आली नाही म्हणून पती शिवाजी शिंदे याने शोध घेतला असता रुपालीचा मृतदेह डबक्यात दिसला तेथेच भोलाचाही मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर हल्ला, मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पाच जणांकडून मारहाण, आरोपी शाहरुख पठाण याच्यावर तुरुंगात हल्ला
Indapur News : पुणे ग्रामीण जिल्ह्यासह, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी, वाहन चोरी करणारी शिकलकर टोळी भिगवण पोलिसांनी जेरबंद केली आहे. जीतसिंह टाक लकीसिंग टाक आणि एक अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली. भिगवण पोलिसांसह तुळजापूर पोलिसांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे संयुक्तरित्या सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींवर पुणे शहरात 30, पिंपरी चिंचवडमध्ये सात आणि पुणे जिल्ह्यात दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे.
ED: PMLA कायद्याविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ईडीचे अधिकार कायम
Mumbai News :मुंबई: सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ बोरिवली स्थानकात युवक काँग्रेसने रेल रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सौराष्ट्र एक्स्प्रेस काही मिनिटांसाठी थांबवली. यावेळी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
गोवंडी येथे रुळला तडे गेले आहेत. त्यामुळं हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 8 वाजून 27 मिनीटांनी बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. सीएसएमटी वरुन येणाऱ्या मार्गिकेवर तडा गेला होता. मात्र, अजूनही लोकल प्रचंड उशिराने सुरु आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Pune News : मेट्रोच्या कामामुळे गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री समाधान चौकापासुन रस्ता बंद, वाहतुक पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन, मध्यरात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील समाधान चौकापासून ते स्वारगेटपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन विश्रामबाग वाहतुक विभागातर्फे करण्यात आली आहे
शुक्रवारी व शनिवारी रात्री संबंधित परिसरात महत्वाचे काम करण्यात येणार आहे
संबंधित वाहने रामेश्वर चौकाकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
27th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 27 जुलै 1761 साली माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले. तसेच याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन सुद्धा आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 जुलैचे दिनविशेष.
27 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
1761 : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले.
मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब आणि गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा. त्याचा जन्म सावनूर (धारवाड जिल्हा) येथे झाला. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली. माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव आणि त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम आणि मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी आणि प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो.
1949 : पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
2001 : सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
1921 : रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -